Home » Unsolved Mystery : हिरव्या कातडीची ‘ही’ मुलं पृथ्वीवर आली तरी कुठून ?

Unsolved Mystery : हिरव्या कातडीची ‘ही’ मुलं पृथ्वीवर आली तरी कुठून ?

by Team Gajawaja
0 comment
Unsolved Mystery
Share

१२ व्या शतकात एक अशी विचित्र घटना घडली की, ज्याने लोकांना एलियन्स खरंच असतात या गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडलं. तर इंग्लंडमधल्या वूलपिट गावात शेतात कामं सुरू होतं, तेव्हा अचानक एका खड्ड्यातून रडायचा आवाज आला. लोकं खड्ड्याकडे गेले, खड्ड्यात वाकून पाहिलं तर त्या खड्ड्यात दोन मुलं होती. आता तुम्ही म्हणाल, मुलं सापडली तर त्यात काय मोठं? तर ही मुलं साधी सुधी मूलं नव्हती. त्यांची स्कीन, कपडे आणि भाषा, सगळंच इतकं विचित्र होतं, असं वाटेल की, ते या पृथ्वीवरचे नाहीच आहेत. त्यांची स्कीन चक्क हिरव्या रंगाची होती, कपडे हिरवे होते आणि ते एका अशा मटेरियलपासून बनले होते, ज्याबद्दल कोणालाच काही माहीत नव्हतं आणि भाषा… ती तर लोकांनी कधीच ऐकली नव्हती. पण इथे प्रश्न असा आहे की, ही दोन विचित्र हिरवी मूलं आली कुठून? ते खरंच एलियन्स होते का? नक्की काय रहस्य? जाणून घेऊ. (Unsolved Mystery)

१२ व्या शतकात वूलपिट गावात कोल्ह्यांची दहशत खूपच वाढली होती, लोकं इतके वैतागले होते की, त्यांना काही केल्या त्यांचा सोक्षमोक्ष लावायचा असं ठरवलं. म्हणून मग त्यांनी लांडगे पकडण्यासाठी मोठ्ठे खड्डे खणले होते आणि अशाच एका खड्ड्यात दोन हिरवी मूलं सापडली होती. ही घटना जरी सीरियस असली तरी गंमत म्हणजे ती मुलं आणि गावकरी घाबरून एकमेकांकडे बराच वेळ फक्त बघत बसले. पण मग थोड्या वेळाने त्यांनी त्या मुलांना खड्ड्यातून बाहेर काढलं. त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. ते कुठचे, त्यांचे आईवडील कुठेत? पण त्यांची भाषा यांना कळत नव्हती, यांची त्यांना कळत नव्हती. गावकऱ्यांना त्या मुलांचं काय करावं कळत नव्हतं. तरी गावकऱ्यांंनी त्यांचे आई वडील शोधायचा प्रयत्न केला, याच अंदाजवरून की, कदाचित त्यांचे आई वडील पण हिरव्या रंगाचे असतील. पण त्यांचे आई वडील सापडलेच नाही. (Top Stories)

Unsolved Mystery

शेवटी गावातल्या सर रिचर्ड डी कॅन या श्रीमंत माणसाने मुलांना आपल्या घरी ठेवलं. पण बरेच दिवस झाले त्या मुलांना सगळं खायला दिलं पण ते काहीच खायला तयार नव्हते. गावकरी टेंशनमध्ये आले, कारण जर मुलांंनी खाल्लंच नाही तर ते मरून जातील. पण एकदा त्या मुलांना कच्च्या शेंगा दिसल्या आणि ते त्यावर तुटून पडले. गावातली लोकंं त्यांच्याकडे बघतच राहिले, त्यांचं थोडं टेंशन कमी झालं कारण मुलांनी काहीतरी खाल्लं होतं. गावकरी त्या मुलांचं आणि त्यांच्या संस्कृतीचं रहस्य समजून घ्यायचा प्रयत्न करत राहिले, पण बरेच वर्षं गेली तरी त्यांना काहीच कळलं नाही. काही वर्षांनी वेगळीच गोष्ट घडली, म्हणजे त्या मुलांच्या अंगावरचा हिरवा रंग उतरायला सुरुवात झाली. हळूहळू ती मुलं गावकऱ्यांसारखं वागायला बोलायला लागली. गावकऱ्यांनी त्यांना आपलसं केलं. (Unsolved Mystery)

गावकऱ्यांनी दोन्ही मुलांचा बाप्तिस्म नावाचा विधी केला. पण त्याचदिवशी येत असताना तो मुलगा बेशुद्ध पडला आणि मरण पावला, पण ती मुलगी एकदम ठीक होती. लोकांनी तिचं नाव एग्नेस बेयर ठेवलं. हळूहळू ती त्या माणसांसारखं बोलायला आणि लिहायला शिकली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते कुठून आले होते याची तिने कथा सांगितली, ती म्हणाली, ती आणि तिचा भाऊ सेंट मार्टिन्स लँड नावाच्या जागेतून आले होते. तिथलं सगळं हिरवं होतं, सूर्य कधीच उगवायचा नाही आणि नेहमी अंधार असायचा. पण एकदा त्यांना चर्चच्या घंटांचा आवाज ऐकू आला. त्या आवाजाचा पाठलाग करताना ते एका गुहेत शिरले आणि तिथून भटकत भटकत वूलपिटला पोहोचले. परत जायचा रस्ता त्यांना सापडलाच नाही! (Top Stories)

आता वाटेल की, स्टोरीत काहीच रहस्य नाही, पण इथेच स्टोरीत ट्विस्ट येतो. कारण आज जरी या नावाने जागा अस्तित्वात असली तरी असं म्हणतात, तेव्हा सेंट मार्टिन्स लँड नावाची कोणतीच जागा नव्हती. मग प्रश्न असा, मग हे दोघे नक्की आले कुठून होते? आणि त्यात त्यांचा स्कीन कलर हिरव्या रंगाचा होता. म्हणजे मग हे एलियन्स होते का? आणि जर का ते सेंट मार्टिन्स लँड इथून आले होते ते परत का जाऊ शकले नाहीत असे बरेच प्रश्न उभे राहतात. इतकच काय असा एक प्रश्न तर नक्कीच उभा राहतो की ही बनावट स्टोरी आहे, पण विल्यम ऑफ न्यूबर्ग याने ११८९ मध्ये लिहिलेल्या Historia rerum Anglicarum या पुस्तकात आणि राल्फ ऑफ कोगेशॉल याने १२२० च्या दशकात लिहिलेल्या Chronicon Anglicanum मध्ये या घटनेचं वर्णन सापडतं. विल्यम वूलपिटपासून २०० मैल लांब राहायचा आणि असं म्हणतात, त्याने आपल्या पुस्तकात याचा एंड वाचकावर सोडलाय आणि राल्फने ही स्टोरी रिचर्ड कडून ऐकली होती, ज्याच्याकडे ही मुलं राहिली. आता यावरून ही गोष्ट तर लक्षात येईल की, घटना खरी आहे. (Unsolved Mystery)

आता ही घटना जर खरी आहे तर मग त्यांची स्कीन हिरवी असण्यामागचं कारण काय? मग याच्या काही थेअरीज पुढे आल्या. काही लोकांचं म्हणणं आहे की ही मुलं कदाचित फ्लेमिश म्हणजे आजच्या बेल्जियममधली होती. त्या काळात इंग्लंडच्या सफोकमध्ये फ्लेमिश लोक व्यापार आणि विणकामासाठी यायचे. पण त्या वेळी किंग स्टीफन आणि एम्प्रेस माटिल्डा यांच्यातल्या युद्धामुळे ३,००० पेक्षा जास्त फ्लेमिश मारले गेले आणि त्याच युद्धात अनाथ झालेली ही असतील. पण मग त्यांची स्कीन हिरवी कशी? तर iron च्या कमतरतेमुळे त्यांची स्कीन हिरवी झाली असेल, अशी शक्यता सांगितली जाते आणि आमच्या कडे सूर्य उगवत नाही याचा अर्थ कदाचित असा असेल की ते घनदाट जंगलात राहायचे. पण आता ही जी स्टोरी सांगितली ती तर्क लावून सांगितली गेलेली आहे आणि याबाबतीत कोणतच ठोस पुरावा नाही.(Top Stories)

=================

हे देखील वाचा : Water Therapy म्हणजे काय? ते कसे काम करते याबद्दल घ्या जाणून

=================

आणखी एक थिअरी अशी आहे की, त्या काळात इंग्लंडमध्ये सुपरनॅचरल पॉवर आणि जादूटोणा यावर खूप विश्वास होता. लोकांना वाटायचं की जमिनीखाली दुसरं जग आहे, जिथे फेरीज आणि डेमन्स राहतात. या मुलांचं गुहेतून अचानक येणं आणि त्यांचा हिरवा रंग यामुळे लोकांना वाटलं की ही मुलं त्या दुसऱ्या जगातून आली असावीत.

पण आता काही मॉडर्न थिअरीज सांगतात की, ही मुलं खरंच एलियन्स होती आणि त्यांच्या गोष्टीत UFO चा संबंध जोडला जातो! पण खरं काय, खोटं काय? ही मुलं खरंच दुसऱ्या जगातून आली होती, की युद्धात भटकलेली अनाथ होती? हे रहस्य आजही रहस्यच आहे आणि याची चर्चा इतकी झाली की, ही घटना, याचे उल्लेख आणि यावर आधारित कथानकं आजही बऱ्याच पुस्तकात, चित्रपट, डॉक्युमेंटरी आणि टीव्हीमध्ये नंतर पाहायला मिळाली.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.