Home » Dhanteras : धनतेरसला पुजल्या जाणाऱ्या कुबेर देवाची रंजक माहिती

Dhanteras : धनतेरसला पुजल्या जाणाऱ्या कुबेर देवाची रंजक माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dhanteras
Share

आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी वस्त्रालंकाराची खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी द्रव्य अलंकार आणि घरातील इतर मोठ्या महाग वस्तूंची पूजा केली जाते. मुख्य म्हणजे या दिवशी कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून त्यांना खिरीची नैवेद्य दाखवितात. धनत्रयोदशीला मुख्य पूजन केले जाते, धन्वंतरी, लक्ष्मी आणि कुबेर देवाचे. यात धन्वंतरी आणि लक्ष्मीबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. मात्र कुबेर देव धनाची देवता यापलीकडे आपल्याला त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाहीये, आज आपण धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेरांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. (Dhantrayodashi)

हिंदू पुराणांनुसार कुबेर हा यक्षांचा अधिपती समजला जातो. धनत्रयोदशी दिवशी कुबेराची पूजा केली तर धनसंपत्ती प्राप्त होते असे म्हणतात. लक्ष्मी- कुूबेर पूजन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. माता लक्ष्मी संपत्तीची प्रमुख देवता असून कुबेर हा देवतांच्या संपत्तीचा रक्षक मानला जातो. लक्ष्मी माता संपत्तीची देवी आहे पण संपत्तीचा हिशेब कुबेर ठेवतो.माता लक्ष्मीप्रमाणे कुबेराचे महत्त्व आहे. कुबेराबद्दल असे सांगितले जाते की त्याला पैसे, धनसंपत्ती असे काही वाहत नाहीत. कारण तोच भक्तांना धन देतो अशी लोकांची भावना आहे. मात्र कुबेर देवांच्या मंदिरात फुलं वल्ली जातात. कुबेराची दिशा ही उत्तर असून धनत्रयोदशीला त्याची पूजा केली जाते. पितळेच्या भांड्यांची खरेदी करतात. (Diwali 2025)

कुबेराची मूर्ती किंवा कुबेर यंत्राची स्थापना उत्तर दिशेला करतात. जो शुद्ध आणि संयमित राहतो त्याला धनपती कुबेर प्रसन्न होऊन धनासह सर्व गोष्टी प्रदान करतो असे मानले जाते. कुबेराची मूर्ती म्हणजे मांगल्य, भरभराट, ऐश्वर्य यांचं प्रतिक आहे. याच प्रतिकांमधून आपणास हाच बोध घ्यायचा आहे की, कोणतंही काम आपण श्रद्धेने, निष्ठेने, प्रामाणिकपणे करायचं आहे. तुम्ही चांगल्या मार्गाने धन कमावले तर ते तुमच्याकडे टिकून राहते आणि त्याची भरभराट होते. (Todays Marathi Headline)

Dhanteras

हिंदू पुराणांनुसार कुबेर भगवान यांना यक्षांचा अधिपति समजले गेले आहे. माता लक्ष्मीप्रमाणे कुबेर देव देखील धनाच्या पूजेसाठी महत्वाचे समजले जातात. हिमालयातली अलकापुरी ही कुबेर देवांची नगरी म्हणून ओळखली जाते. गोरा रंग, किरीट मुकुट धारण केलेला, विशाल उदर, पिवळी वस्त्रे आणि दागदागिने यांनी सजलेली असे कुबेर देवांचे स्वरूप आहे. सोने हे सर्वश्रेष्ठ धन मानले गेल्याने कुबेरांचे वस्त्र देखील पिवळे असते. त्याच्या हातात रत्न पात्र आणि मुंगुसाच्या आकाराची थैली तिला नकुली असे म्हणतात. (Top Stories)

कुबेरांची देवांचे खजिनदार अशी देखील ओळख आहे. साक्षात तिरुपती बालाजींनी विवाहासाठी कुबेरांकडूनच कर्ज घेतल्याची आख्यायिका प्रसिध्द आहे. तिरुपती म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार, याची परतफेड म्हणून तिरुपती बालाजीला सोने, चांदी, हिरे, मोती, आदी संपत्ती दान केले जातात. काही ठिकाणी असे म्हटले आहे की महालक्ष्मी मातेला कुबेर महाराजांकडून कर्ज घ्यावे लागले होते. कुबेर हे लक्ष्मी देवीचे कोषागार व्यवस्थापक आहे. शिवाय ते निस्सीम शिवाचे भक्त आणि रावणाचा चुलत भाऊ असल्याचेही दाखले पुराणात आहेत. (Top Marathi News)

कुबेर मुळात यक्ष आणि राक्षस या कुळातले आहेत, मात्र महादेवाने प्रसन्न होवून त्यांना सोन्याची लंका भेट म्हणून दिली होती. पुढे जाणून तीच लंका रावणाने कुबेरांकडे मागितली आणि त्यांनी देखील ती तत्काळ दान करून टाकले. याबद्दल महादेवांना कळताच त्यांनी कुबेराला बोलावून घेतले आणि म्हणाले, ‘तुला आता देवांचा मी खजिनदार करतो.’ महादेवाच्या विश्वासाला पात्र ठरल्याने कुबेरांना देवांच्या कोषागाराचा प्रमुख करण्यात आले. (Marathi Trending Headline)

कुबेरांना ब्रह्मदेवाची वर्षानुवर्षे उपासना केल्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला अमरत्व, लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान बहाल केले होते. पुढे रावणाने त्याच्यावर स्वारी केली आणि लंका तसेच पुष्पक विमान हे बळकावले. तेव्हा कुबेराने पळून जाऊन अलकापुरी येथे आपले नवे राज्य प्रस्थापित केले. कुबेरांचा चैत्राथ उपवन असा राजवाडाच होता, असं भागवत पुराणात सांगितलं आहे. कैलास पर्वतावर विश्वकर्माने बांधलेल्या भव्य राजवाड्यात कुबेर देव राहतात, असे सांगितले जाते. (Latest Marathi News)

कुबेरांच्या वडिलांचे नाव ‘विश्रवस्‌’ असल्याने कुबेर वैश्रवण या पैतृक नावाने आणि मातेचे नाव इडविडा असल्याने कुबेर ऐडविड या मातृक नावाने देखील ओळखले जातात. ‘विश्रवस्‌’ ऋषी यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कैकसी होते. त्यांच्या पुत्रांची नावे, रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण अशी होती तर शुर्पणखा नावाची एक कन्या होती. त्यामुळे रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण हे भगवान कुबेर यांचे सावत्र बंधू होते. (Top Marathi Headline)

=======

Temple : वर्षातून केवळ दिवाळीतच उघडले जाणारे रहस्यमयी मंदिर

Jageshwar Temple : जागेश्वर धाम मंदिराचे रहस्य आहे तरी काय ?

=======

कुबेर मुळात सुंदर देव म्हणून देखील ओळखले जायचे. पण एकदा त्याने पार्वतीकडे सभिलाष दृष्टीने पाहिल्यामुळे तिने त्यांना ‘तू कुरूप होशील’ असा शाप दिला आणि तेव्हापासून ते कुरूप झाला अशी कथा आहे. कौबेरी ही त्याची भार्या, मणिग्रीव किंवा वर्णकवी आणि नलकुबर किंवा मुयरज हे त्याचे पुत्र आणि मीनाक्षी ही त्याची कन्या होती. जैन आणि बौद्ध धर्मात कुबेराबद्दल विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. जैन धर्मात एकूण २४ तीर्थंकर आहेत. त्यापैकी एकोणिसावे तीर्थंकर म्हणजे श्रीमल्लिनाथ भगवान असून या श्री मल्लिनाथ भगवानांचे देव म्हणजेच श्री कुबेर आहेत. असे जैन धार्मिक ग्रंथामध्ये लिहिले आहे. (Top Trending News)

काही ग्रंथामध्ये कुबेर हा श्री नेमिनाथ भगवान या तीर्थंकरांचा यक्ष मानला आहे. त्यांच्या मते कुबेराला चार मस्तकं आणि आठ हात असतात. तर बौद्धांच्या मते, कुबेर हा धर्मपाल, पीतवर्ण आणि त्रिशूलधारी आहे. पुष्पक, हत्ती किंवा सिंह हे त्याचं वाहन, वसुंधरा ही शक्ती आणि मुंगुस हे त्याचं अभिज्ञानचिन्ह आहे. त्याने नागांवर विजय मिळवल्याने त्याचे एक प्रतिक म्हणा तो मुंगुस धारण करतो, असे लामा समाजाचे मत आहे. प्राचीनकाळी महाकोशकात कुबेरपूजा प्रचलित होती. कुबेराची तीन वाहने सांगितली जातात. कुबेराला जमिनीवरच्या धनाची माहिती मुंगूस देतो, पाण्यातल्या धनाची माहिती मासा, तर आकाशातल्या धनाची माहिती पांढरा अश्व देतो. (Social News)

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.