Home » Hilsa Fish : हिल्सा माशाला लष्कराचे संरक्षण

Hilsa Fish : हिल्सा माशाला लष्कराचे संरक्षण

by Team Gajawaja
0 comment
Hilsa Fish
Share

माशांची राणी म्हणून ओळखल्या जाणा-या हिल्सा माशांच्या संरक्षणासाठी बांगलादेशने 17 युद्धनौका तैनात केल्या आहेत, हे ऐकून आश्चर्य वाटेल.  पण सर्व माशांमध्ये या हिल्सा माशाची चव सर्वात चांगली असल्यानं हिल्सा माशाला जगभरातून सर्वाधिक मागणी असते. भारताच्या पश्चिम बंगालमध्ये तर हा हिल्सा मासा प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. याच हिल्सा माशाच्या संरक्षणासाठी बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारने युद्धनौका आणि गस्ती हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. हिल्सा माशांच्या बेकायदेशीर मासेमारीपासून वाचवण्यासाठी ही तैनाती करण्यात आली आहे. (Hilsa Fish)

हिल्सा माशांच्या प्रजनन स्थळांचे संरक्षण करण्यासाठी, त्यांच्या मासेमारीवर तीन आठवड्यांची बंदी घातली आहे.  या पंधरा दिवसाच्या काळात हिल्सा माशांच्या संरक्षणासाठी युद्धनौका आणि गस्ती हेलिकॉप्टर तैनात असणार आहेत.  या काळात या समुद्रीभागात कुठलीही मासेमारी बोट आढळून आली तर त्यातील मासेमारांना अटक करण्यात येणार आहे.  हा सर्व भाग भारताच्या समुद्री भागाला लागून आहे. त्यामुळे या काळात भारतीय मासेमारी बोटींनाही हिल्साची मासेमारी करु नका असा सल्ला देण्यात आला आहे.  (Marathi News)

बांगलादेशच्या समुद्रात सर्वाधिक आढळणारा हिल्सा हा फक्त मासा नाही, तर एक संस्कृती आहे. या हिल्सा माशावर अनेक दर्जेदार साहित्यकृती तयार झाल्या आहेत. भारत आणि बांगलादेशातील एक चविष्ट सेतू म्हणून या हिल्सा माशाला ओळखण्यात येतं.  हिल्सा हा बांगलादेशचा राष्ट्रीय मासा आहे. त्याला इलिश असेही म्हणतात. चांदीसारखा, चमकदार असलेल्या या माशाची चव अप्रतिम असते. त्यामुळेच त्याला समुद्राची राणी म्हणूनही ओळखले जाते. हा हिल्सा मासा दरवर्षी बंगालच्या उपसागरातून नद्यांमध्ये अंडी उगवण्यासाठी येतो.  बंगालच्या उपसागरात त्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु हवामान बदल आणि अतिमासेमारीमुळे त्याची संख्या झपाट्याने कमी होत आहे. जगभरातील हिल्सा माशाच्या उत्पादनामध्ये बांगलादेशाचे प्रमाण 70 टक्के होते ते आता 30 टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे या माशाच्या संवर्धनासाठी बांगलादेशकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.  (Hilsa Fish)

Hilsa Fish

बांगलादेशातील लाखो लोकांचे जीवन या हिल्सा माशावर अवलंबून आहे. बांगलादेशमध्ये हा हिल्सा मासा मोठी आर्थिक उलाढाल करतो.  या माशाची मागणी जास्त असल्यामुळे आणि त्याच्या जास्त किंमतीमुळे, मच्छीमार खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी जातात.  प्रजनन हंगामात जास्त मासेमारीमुळे त्यांचा साठा कमी होऊ शकतो.  हा धोका लक्षात घेऊन आता या हिल्सा माशांना वाचवण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात आली आहे.  ज्या समुद्री भागात हिल्सा माशे सर्वाधिक आढळतात, तिथे बांगलादेश लष्कराचे हेलिकॉप्टर गस्त घालणार आहे.  शिवाय नौदलाच्या बोटीही तैनात करण्यात आल्या आहेत.  या बोटी कोणी मच्छामार चोरुन हिल्साची शिकार करत असेल तर त्यांना अटकाव करणार आहेत.  बांगलादेश सरकारने प्रजनन हंगामात हिल्सा पकडण्यास बंदी घातल्याने मासेमारी थांबणार आहे.  मात्र यावर मासेमारीवर अवलंबून असणा-यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  त्यामुळे युनूस सरकारने प्रत्येक मच्छीमार कुटुंबाला 25 किलो तांदूळ वाटपही केले आहे. (Marathi News)

भारत आणि बांगलादेशमधील राजनैतिक वादातही हिल्सा माशाचा वापर सर्वाधिक होतो.  भारतातील पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा आणि लग्नाच्या हंगामात हिल्साची मागणी जास्त असते. त्यामुळे हिल्सा बांगलादेशपेक्षा भारतात चढ्या दरानं विकला जातो.  बांगलादेश भारतातल्या या हिल्साच्या मागणीचा राजकीय फायदा करुन घेतो.  तिस्ता नदीच्या पाण्यावरून दिल्ली आणि ढाका यांच्यातील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर, बांगलादेशने 2012 ते 2018 पर्यंत हिल्साच्या निर्यातीवर बंदी घातली होती. 

===============

हे देखील वाचा : The Dragon Triangle : पृथ्वीवरचं दूसरं रहस्यमयी बरमुडा ट्रायंगल ?

================

यामुळे पश्चिम बंगालमध्ये नाराजी व्यक्त झाली होती.  अर्थात भारतातही हिल्सा मिळतो.  पण कुठे मिळणारा हिल्सा अधिक चविष्ट आहे, यातही वाद आहेत.  बांगलादेशातील पद्मा नदीतून पकडलेला हिल्सा अधिक चविष्ट की पश्चिम बंगालमधील गंगा नदीतून पकडलेला हिल्सा चविष्ट यावर मोठा वाद आहे.   जेव्हा हा मासा समुद्रापासून वरच्या दिशेने जातो आणि नदीच्या पाण्यात पोहोचतो तेव्हा त्याची चव वाढते, असे सांगितले जाते.  हिल्सा माशाचा दबदबा बंगाली साहित्यातही आहे. रवींद्रनाथ टागोर आणि जीवनानंद दास यांसारख्या प्रसिद्ध कवींनी या माशाबद्दल लिहिले आहे. (Hilsa Fish)

आरोग्यासाठीही हा हिल्सा गुणकारी असल्याचे सांगितले जाते.  हिल्सा मासा जीवनसत्त्वे अ, ड, ई, कॅल्शियम, पोटॅशियम, जस्त, लोह, फॉस्फरस आणि सेलेनियम सारख्या महत्वाच्या जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे.  त्यामुळे या माशाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  त्यासाठी आता लष्कराची मदत घेण्यात आली आहे.  

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.