Organizing Tips For Home : प्रत्येक महिलेसाठी तिचं घर हे फक्त चार भिंतींचं नाव नसतं, ते तिच्या आयुष्याचा आरसा असतो. घर कितीही सुंदर सजवलं असलं तरी जर ते अव्यवस्थित असेल, तर मनालाच गोंधळल्यासारखं वाटतं. म्हणूनच घर नीटनेटके ठेवणे म्हणजे केवळ स्वच्छता नव्हे, तर मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा जपण्याचा मार्ग आहे. वर्किंग वुमन असोत किंवा गृहिणी, काही छोट्या सवयी आणि ट्रिक्स अंगीकारल्या, तर घर नेहमी सुंदर, स्वच्छ आणि सुव्यवस्थित राहू शकतं. अशातच घराची स्वच्छता करण्यासह ते व्यवस्थितीत लावण्यासाठी खालील काही ट्रिक्स जाणून घ्या.
कपाट – तुमचं व्यक्तिमत्त्व दाखवणारे ठिकाण

organizing tips for home
कपाट म्हणजे आपल्या दिनचर्येचं प्रतिबिंब. सकाळची तयारी सहज व्हावी यासाठी कपाट नीट ठेवणं फार गरजेचं आहे. दर दोन महिन्यांनी कपाटातील कपड्यांची वर्गवारी करा. वापरात नसलेले कपडे दान करा किंवा दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवा. ड्रॉवर ऑर्गनायझर आणि हँगर्सचा योग्य वापर केल्यास जागा वाचते आणि कपडे मोडतोड न होता राहतात. कपाटात सुगंधी सॅशे किंवा कपूर ठेवा, ज्यामुळे कपड्यांना ताजेपणा येतो आणि कीटक दूर राहतात.(Organizing Tips For Home)
किचन – स्वच्छ आणि स्मार्ट स्वयंपाकघर
स्वयंपाकघर हे प्रत्येक स्त्रीचं “वर्क झोन” असतं. म्हणूनच किचन स्वच्छ, सुलभ आणि व्यवस्थित असणं गरजेचं आहे. झोन पद्धत वापरा जसे की, कुकिंग झोन, स्टोरेज झोन आणि क्लिनिंग झोन. मसाले, धान्य आणि डाळींचे लेबल लावा, त्यामुळे वस्तू पटकन सापडतात. दर आठवड्याला एकदा फ्रीज आणि कपाट स्वच्छ करा. वापरात नसलेल्या भांड्यांना बाजूला ठेवा आणि रोजच्या वस्तू हाताशी ठेवा. किचनमध्ये सुगंध ठेवण्यासाठी लिंबू, वेलची किंवा दालचिनीचे नैसर्गिक डिफ्यूझर वापरता येतात.
घरात “वन इन, वन आऊट” नियम पाळा

organizing tips for home
महिलांना सजावट आणि खरेदीची आवड असते, पण त्यामुळे घरात वस्तूंचा ढीग जमतो. त्यामुळे हा साधा नियम लक्षात ठेवा एक नवीन वस्तू आणाल, तर एक जुनी वस्तू काढा. उदाहरणार्थ, नवीन कपडे घेतल्यास जुने दान करा किंवा न वापरणारे भांडे बाजूला ठेवा. यामुळे जागा मोकळी राहते आणि घरात गोंधळ होत नाही. हा नियम “मिनिमल लिव्हिंग” चा गुपित मंत्र आहे.
प्रत्येक वस्तूची ठरलेली जागा ठेवा

organizing tips for home
अनेक वेळा आपण वस्तू ठेवतो पण आठवत नाही कुठे ठेवल्या आणि मग सुरु होते शोधाशोध. हे टाळण्यासाठी घरात प्रत्येक वस्तूची एक ठरलेली जागा ठेवा. चावी, बिलं, मोबाईल चार्जर, मेकअपकिट या सगळ्यांसाठी छोटे ड्रॉवर किंवा बॉक्स ठेवा. घरातील सर्वांना ही सवय लावा. घरात नियम आणि शिस्त निर्माण झाली की घर आनंदी घर बनतं.(Organizing Tips For Home)
==================
हे देखील वाचा :
Diwali Decor 2025 : दिवाळीसाठी घरच्या घरी ५ बेस्ट DIY डेकोरेशन आयडिया
Walking Benefits : फिटनेससाठी रोज किती चालावे? तज्ज्ञ सांगतात योग्य अंतर
Water Therapy म्हणजे काय? ते कसे काम करते याबद्दल घ्या जाणून
=====================
दररोज १५ मिनिटांची स्वच्छतेची सवय लावा

organizing tips for home
अनेक स्त्रिया दिवसभरात वेळेअभावी सफाई पुढे ढकलतात, पण दररोज फक्त १५ मिनिटे दिलीत तरी मोठा फरक पडतो. सकाळी बेड नीट करणं, रात्री भांडी जागेवर ठेवणं, कपडे फोल्ड करणं या छोट्या सवयी घराला नेहमी ताजेतवाने ठेवतात. तज्ज्ञ सांगतात, घर स्वच्छ असेल, तर मनही शांत राहते. नीटनेटके घर म्हणजे आत्मविश्वास, सुसंस्कृती आणि सकारात्मक उर्जा यांचं प्रतीक आहे. थोडं नियोजन, थोडं वेळेचं व्यवस्थापन, आणि थोडा प्रेम एवढंच पुरेसं आहे तुमचं घर सुंदर, शांत आणि सुखकर बनवण्यासाठी.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics