आजच्या काळात मोबाईल ही मनुष्याची सर्वात मोठी आणि प्राथमिक गरज बनली आहे. समाजातील सर्वच लहान मोठ्या लोकांमध्ये आज स्मार्ट फोन पाहायला मिळतात. मोबाईलची लोकांमधील क्रेझ पाहून अनेकदा डोकं गरगरते. या मोबाईलने विद्यार्थ्यांपासून वयस्कर लोकांपर्यत सर्वांनाच वेड लावले आहे. जो तो जेव्हा पाहावे तेव्हा मोबाईलमधेच घुसलेला असतो. यामुळे घरातील संवाद देखील कमी होत आहे. सकाळी डोळे उघडल्यानंतर सर्वात आधी सगळ्यांना हातात फोन पाहिजे असतो. तो पाहिल्यानंतरच दिवस सुरु होतो. रात्री झोपताना सर्वांनाच मोबाईल उशीजवळ घेऊन झोपण्याची सवय असते. मात्र रात्री उशीजवळ फोन ठेऊन झोपणे योग्य आहे की अयोग्य. चला जाणून घेऊया याच सवयींबद्दल. (Mobile Disadvantage)
मोबाइलचे अनेक फायदे असले तरी त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत. रात्री झोपतानाही मोबाईल उशीखाली किंवा बाजूला ठेवून झोपतात. ज्याचे नकारात्मक परिणाम व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावरही होऊ शकतात. यामुळे मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला मोबाईल वापरण्याच्या दुष्परिणामांची माहीती असणे आवश्यक आहे. त्यामुळे रात्री उशीजवळ फोन घेऊन झोपणे धोकादायक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मोबाइल फोनमधून उत्सर्जित होणारा निळा-प्रकाश आणि धोकादायक रेडिएशन सायलेंट किलर्ससारखे काम करतात, यामुळे तुमच्या आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करतात. (Health care)
एका रिसर्चच्या माहितीनुसार उशीजवळ रात्री मोबाईल ठेऊन झोपल्यामुळे त्रास होऊ शकतो. कारण मोबाईल फोन हानिकारक रेडिएशन बाहेर टाकत असतो. ज्यामुळे तुमच्या मेंदूला हानी पोहोचते. यामुळे तुम्हाला डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि आरोग्याशी संबंधित इतर समस्या येऊ शकतात. मोबाइल फोनचे रेडिएशन इरेक्टाइल डिसफंक्शनशी जोडलेले आहे. याव्यतिरिक्त, तुमच्या सेल फोनचा निळा प्रकाश देखील झोपेला प्रेरित करणाऱ्या संप्रेरकाच्या उत्पादनात व्यत्यय आणू शकतो, ज्याला मेलाटोनिन देखील म्हणतात. हे बॉडी क्लॉकमध्ये व्यत्यय आणते. ज्यामुळे झोपणे कठीण होते. त्यामुळे अनेकदा मोबाइल पाहताना आम्हाला झोपच लागत नाही. अशी अनेकांची समस्या असते. (Todays Marathi Headline)

उशीखाली फोन ठेवून झोपण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे मोबाईल फोन गरम झाल्यास व तो उशीखाली ठेवला तर त्याला आग लागण्याचा धोका असतो. बऱ्याच व्यक्ती त्यांचा फोन चार्जिंगला लावून झोपतात, ही गोष्टही खूप धोकादायक ठरू शकतात. संशोधनानुसार असे समोर आले आहे की, रात्री फोनच्या रिंग वाजल्यामुळे केवळ एक दिवसाची झोप बिघडच नाही तर तुमच्या झोपेच्या पॅटर्नमध्येही व्यत्यय येऊ शकतो. मोबाईल उशीखाली ठेवून झोपल्याने रेडिओ फ्रिक्वेन्सी नेहमी आपल्यासोबत राहते, ज्यामुळे झोपेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे झोप होऊनही तुम्हाला थकल्यासारखे वाटू शकते. (Latest Marathi Headline)
स्मार्टफोनचा सतत वापर मानसिक तणाव आणि चिंतेचे कारण बनू शकतो. रात्री जवळ ठेऊन झोपल्यामुळे मनाला पूर्णपणे आराम मिळत नाही. त्यामुळे सकाळी तुम्ही वैतागलेले असतात. संपूर्ण दिवस तणावात राहतात. मोबाईल फोन उशीजवळ घेऊन झोपल्याने तुमच्या आरोग्याला हानी तर होतेच पण कॅन्सरचा धोकाही वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यासंदर्भात माहिती दिली आहे. अनेक वेळा सकाळी उठल्यावर तुमचा मूड खराब होतो, हे देखील मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे होते. तसेच यामुळे डोकेदुखी, मज्जातंतुवेदना आणि इतर आरोग्यासंबंधीत आजारांचे मूळ कारण मोबाईलमधून निघणारे रेडिएशन आहेत. (Top Trending Headline)
झोपताना मोबाईल किती दूर ठेवावा?
अनेकांना मोबाईल उशाशी ठेऊन झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रात्री झोपताना मोबाईल तुमच्यापासून जवळपास 3 ते 4 फूट लांब ठेवावा. मोबाईल उशीजवळ किंवा उशीखाली ठेवल्याने तो गरम होऊन उष्णता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे उशीला आग लागण्याची सुद्धा शक्यता असते. जर फोन व्हायब्रेशन मोडवर असेल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो. (Top Marathi Headline)
=========
Diwali 2025 : दिवाळीत गोडधोड खाताना साखरेचे प्रमाण कसे नियंत्रणात ठेवावे? वाचा टिप्स
Health Care : चिया, सब्जा आणि अळशी…ऋतूनुसार कोणत्या बिया कधी खाव्यात?
=========
रात्री फोन वापरतांना घ्या हि काळजी
* स्क्रीन सेटिंग्ज ॲड्जस्ट करा. (Latest Marathi News)
* स्क्रिन व डोळ्यांमध्ये योग्य अंतर ठेवा.
* नाईट मोड वापरा.
* वरचेवर डोळे मिचकावायला विसरू नका.
* अँटी-रिफ्लेक्टीव्ह स्क्रीन प्रोटेक्टर वापरा. (Top Trending News)
* तुम्ही आर्टिफिशिअल टिअर्स (कृत्रिम अश्रू) ही वापरू शकता.
* झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल वापरणे बंद करा.
* झोपण्यापूर्वी शांत आणि अंधाऱ्या खोलीत जा.
* मोबाईल रूमच्या बाहेर ठेवा किंवा फ्लाईट मोडमध्ये ठेवा.
* तुमचा मोबाईल नियमित स्वच्छ करत राहा. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
