दिवाळीचा सण आता तोंडावर आला आहे. सगळीकडे दिवाळीची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. त्यात आनंदाची बाब म्हणजे पावसाने देखील उसंत घेतल्याने सगळ्यांनीच मोकळा श्वास घेतला आहे. यामुळे लोकांच्या उत्साहाला देखील उधाण आले आहे. भारतातील अनेक राज्यात दिवाळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. दिवाळीचा सण हा पाच दिवसांचा असला तरी तिची सुरुवात ही वसुबारस या सणाने होते. परंतु, महाराष्ट्रात दिवाळीचा सण हा वसुबारस या दिवसापासून सुरु होतो. (Marathi News)
वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी. वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. यंदा १७ ऑक्टोबर रोजी वसुबारस सण साजरा केला जाणार आहे. वसुबारस या सणाला गायीची पूजा केली जाते. गाईंना उडदाचे वडे, भात आणि गोडधोडाचे पदार्थ खाऊ घातले जातात. हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. या सणाला ‘नंदिनी व्रत’ असेही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात देखील विविध पद्धतीने साजरा केला जातो. (Todays Marathi Headline)
वसुबारसला सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ कपडे परिधान करावे. घरात स्वच्छता ठेवावी. गायी आणि वासराची पूजा करावी. त्यांना आपल्या रीतीप्रमाणे नैवेद्य दाखवावा. दिवाळीची सजावट करावी. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे,आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. वसुबारसच्या दिवशी काही नियम पाळावयाचे असतात, जे पाळल्यामुळे आपल्याला या दिवशी केलेल्या पूजेचे फळ अधिक चांगले मिळते. मग या दिवशी नक्की कोणते नियम पाळावे जाणून घेऊया. (Top Stories)
वसुबारसला काय करू नये?
– गोवत्स एकादशीला गहू मूग खात नाही तसेच दूध आणि दुधाचे पदार्थ ,तळलेले आणि तव्यावरील पदार्थ खाणे वर्ज्य असल्याची आख्यायिका आहे.
– या दिवशी केस किंवा नखे कापू नका, कारण ते नकारात्मक ऊर्जा आणते. (Top Marathi Headline)
– मांस, मद्य किंवा तिखट/मसालेदार पदार्थ खाणे टाळा. सात्त्विक व्रत किंवा शाकाहार ठेवा.
– कौटुंबिक भांडणे किंवा नकारात्मक चर्चा टाळा, जेणेकरून शांती भंग होणार नाही.
– कोणत्याही प्राण्यांना विशेषतः गायींना इजा पोहोचवू नका किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.
– दूध आणि दुधाचे पदार्थ खात नाहीत. तळलेले आणि तव्यावरील पदार्थ खाणे वर्ज्य आहे.
– अशुद्ध भाषेचा वापर करू नये. गायी आणि वासरांना दुखवू नये. (Latest Marathi News)
– या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत.
वसुबारसला काय करावे?
– गोवर्धन पर्वताची पूजा करा. मातीचा गोवर्धन बनवून त्याची पूजा करा आणि भगवान कृष्णाची कथा वाचा. (Top tredning Headline)
– गायींना हळद-कुंकू लावून सजवा. त्यांना ताजे घास, गुड़, गव्हाचे धान्य आणि भाज्या अर्पण करा. गायींच्या पूजेचा लाभ घ्या.
– या दिवसापासून अंगणात रांगोळी काढली जाते. या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते.
– घरी गुरे, वासरे असणार्यांकडे ह्या दिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करावा आणि त्याचा नैवेद्य दाखवावा.
– गायी आणि वासराची पूजा करावी. (Latest Marathi Headline)
========
Ahoi Ashtami : अखंड सौभाग्य आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केले जाणारे अहोई अष्टमी व्रत
========
– घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. (Top Marathi News)
– वसुबारसला गीतेचा पंधरावा अध्याय वाचणे शुभ मानले जाते. शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय: हा मंत्र जपणे शुभ मानले जाते.
– दिवाळीचा पहिला दिवस असल्याने या दिवशी संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्ये देवघरात, तुळशी वृंदावनात आणि मुख्य दरवाजावर दिवे लावावेत.
– गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics