हा हा म्हणता दिवाळी आली देखील. दिवाळी म्हणजे वर्षातला मोठा सण. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच दिवाळी आवडते. वर्षभर आपण सर्वच या सणाची आतुरतेने वाट बघत असतो. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे ‘वसुबारस’. आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी. वसुबारस हा सण सर्वत्र साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. दिवाळी खऱ्या अर्थाने सुरू होते ते या दिवसापासून. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. (Vasubaras 2025)
यंदा वसुबारस शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. पूजा मुहूर्त १७:१४ ते १९:४३ एवढा आहे. या दिवशी प्रदोषकाल मुहूर्त १७.१४ ते १९.४३ पर्यंत तर द्वादशी तिथी आरंभ १७ ऑक्टोबर रोजी ११.१२ वाजेपासून होणार असून, द्वादशी तिथी समाप्ती १८ ऑक्टोबर रोजी १२.१८ मिनिटाला होणार आहे. (Diwali 2025)
भारत हा कृषिप्रधान संस्कृती असलेला देश आहे. त्यामुळे या सणाला या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह अर्थात तिच्या वासरूसह पूजा केली जाते. सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात : तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते | मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि || हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर, असा याचा अर्थ आहे. (Marathi News)
घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. आता सण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. घरातील सवाष्ण बायका संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. (Todays Marathi Headline)
निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप आणि ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात आणि गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात दिवाळीच्या रांगोळी काढण्यास सुरुवात केली जाते. बऱ्याच स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. यादिवशी गहू किंवा मूग हे धान्य खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य, उदंड आयुष्य मिळावे, सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. (Top Trending Headline)
भारत देशाचा मोठा भाग आजही शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवतो. ग्रामीण भारतातील अनेक भागांमध्ये, लोक त्यांच्या गायी आणि वासरांची पूजा करून वसुबारसचा हा दिवस साजरा करतात. कारण त्यांच्यासाठी गाय हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. घरातील महिला गोपूजा आणि श्रीकृष्ण पूजा करतात. या दिवशी धनाची देवी म्हणून ओळखली जाणारी लक्ष्मी गाईचे रूप धारण करते, म्हणून लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी गाईची पूजा करतात अशी देखील आख्यायिका आहे. (Top Marathi News)
वसुबारसची कथा
आटपाट नगर होते. तिथे एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाईगुरे होती. ढोरे म्हशी होत्या. गव्हाळी, मुगाळी वासरे होती. एके दिवशी काय झाल? आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली, मुली मुली इकडे ये ! सून आली, काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते. दुपारी येईन. तू माडीवर जा, गव्हाचे, मुगांचे दाणे काढ, गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले. आपण शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली. (Latest Marathi Headline)
गहू मूग काढून ठेवले. खाली आली, गोठ्यांत गेली. गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारीत होती. त्यांना ठार मारली, चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पहात बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेने पान वाढले. सासूने पाहिले, तांबडं मांस दृष्टीस पडले. तिने हे काय म्हणून सुनेला विचारले. सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चूक घडली म्हणून तशीच उठली. देवापाशीं जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला. तिला ह्याची क्षमा करा. गाईवासरे जिवंत करा. (Top Trending News)
=======
Ahoi Ashtami : अखंड सौभाग्य आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केले जाणारे अहोई अष्टमी व्रत
=======
असे न होईल तर संध्याकाळीं मीं आपला प्राण देईन, असा निश्चय केला. देवापाशीं बसून राहिली. देवाने तिचा एकनिश्चय पाहिला. निष्कपट अंतकरण देखील पाहिले. पुढे संध्याकाळीं गाई आल्या. हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले. मग देवान काय केले? गाईची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गाईंचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटले. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीने गाईगोर्ह्यांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला. देवाचे आभार मानले. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics