राजकारण आणि मनोरंजन हे जरी दोन वेगळे क्षेत्र असले तरी मधल्या काही काळापासून हे दोन्ही क्षेत्र आता एकच असल्या सारखे वाटत आहे. याचे कारण म्हणजे, अनेक कलाकार राजकारणामध्ये देखील सक्रिय आहेत, तर अनेक राजकारणी मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असल्याचे दिसून येते. कलाकार निवडणूक लढवतात हे काही लोकांसाठी नवीन नाही. आजवर अनेक मोठमोठ्या कलाकारांनी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरून आपले नशीब आजमावले आहेत. यात काहींना मोठे यश मिळाले तर काहींना अपयश मिळाले. (Maithili Thakur)
दरवेळेस निवडणूक जवळ आल्या काही कोणत्या ना कोणत्या कलाकाराची राजकारणात एन्ट्री होणे समीकरणच झाले आहे. आता लवकरच बहुप्रतीक्षित अशा बिहारच्या निवडणुका येऊ ठाकल्या आहेत. याच निवडणुकांचे औचित्य साधत मनोरंजविश्वातील एका प्रसिद्ध व्यक्तीची राजकारणात एन्ट्री होत आहे. जाणून घेऊया याचबद्दल अधिक माहिती. (Entertainment News)
बिहार विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. बिहारच्या निवडणुका या दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान हे ६ नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामुळेच आता राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आपली कंबर कसली आहे. आता या निवडणुकांमध्ये कोणत्या नवीन चेहऱ्याला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता त्याच पार्श्वभूमीवर बिहारमधील लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर २०२५च्या विधानसभा निवडणुक लढवणार अशी चर्चा आहे. (Marathi News)
मैथिलीने भाजप नेत्यांशी भेट घेतल्यामुळे ही चर्चा होत आहे. या भेटीदरम्यान तिचे वडीलही उपस्थित होते. विनोद तावडे आणि नित्यानंद राय यांच्यासोबतचा तिचा फोटो समोर आल्यानंतर, तिच्या निवडणूक लढवण्याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. गायिका मैथिली ठाकूर ने आपल्या गाण्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत. भाजपचे विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी रविवारी ५ ऑक्टोबर २०२५ त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून फोटो शेअर केले. (Todays Marathi Headline )

विनोद तावडे यांनी पोस्टमध्ये लिहिले, “१९९५ मध्ये लालू प्रसाद यादव सत्तेत आल्यावर बिहार सोडून गेलेल्या कुटुंबातील मुलगी, प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर, बिहारची बदलती गती पाहून बिहारला परत येऊ इच्छिते. आज गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि मी त्यांना आग्रह केला की बिहारचा सामान्य माणूस तिच्याकडून बिहारच्या लोकांसाठी आणि त्याच्या विकासासाठी योगदान देण्याची अपेक्षा करतो आणि तिने त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. बिहारची कन्या मैथिली ठाकूर यांना शुभेच्छा!” विनोद तावडे यांच्या या पोस्टनंतर सगळीकडे मैथिली भाजपतर्फे बिहार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. (Latest Marathi Headline)
कोण आहे मैथिली ठाकूर?
२५ जुलै २००० रोजी मैथिली ठाकूरचा जन्म झाला. तिने तिच्या आजोबा आणि वडिलांकडून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. तिने हिंदी, बंगाली, मराठी, उर्दू, पंजाबी, तमिळ, इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. २५ वर्षांच्या मैथिलीला मागच्यावर्षी महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून युवा पुरस्कार मिळाला आहे. निवडणूक आयोगाने मैथिली ठाकूरची बिहारची “स्टेट आयकॉन” म्हणूनही नियुक्ती केली होती. भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताचे प्रशिक्षण घेतलेल्या मैथिली ठाकूरची बिहारच्या लोकसंगीतातील योगदानाबद्दल 2021च्या संगीत नाटक अकादमीच्या उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी निवड झाली. (Top Marathi HEadline)
मैथिली ठाकूरचा प्रवास रिॲलिटी शोपासून सुरू झाला होता. २०१७ मध्ये ‘रायझिंग स्टार इंडिया’ या रिॲलिटी शोमधून तिला मोठं यश, तसंच लोकप्रियता मिळाली. तिच्या आवाजाने, गाण्यांनी प्रेक्षकांसह, जजेसलाही भूरळ पाडली होती. तिने अनेक पारंपरिक लोकगीतं सादर केली होती. या पारंपरिक लोकगीतांच्या सादरीकरणामुळे तिला सिंगिंग स्टार्समध्ये एक वेगळाच दर्जा मिळवून दिला. (Marathi Latest News)
========
Railway : आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास
========
मैथिली ठाकूरने पारंपरिक लोकगीतांसह अनेक गाणीही गायली आहेत. ‘माई री माई’, ‘रंगबती’ आणि ‘छठ पूजा गीत’ ही तिची काही गाजलेली गाणी आहेत. मैथिली ठाकूर संगीत बॅकग्राऊंड असणाऱ्या कुटुंबातील आहे. त्याशिवाय तिने अनेक भजनंही गायली आहेत. ‘नगरी हो अयोध्या सी’, ‘नवरात्रि के भजन’, ‘हरी नाम नहीं तो जीना क्या’, ‘पता नहीं किस रूप में आकर’, ‘ये तो प्रेम की बात है’ अशी भजनं गायली आहेत. (Top Trending News)
मैथिली ठाकूर तिच्या गाण्यांद्वारे आणि पोस्टद्वारे लाखो रुपयांची कमाई करते. मीडिया रिपोर्टनुसार, मैथिलीचं नेट वर्थ कोट्यवधी रुपये आहे. मैथिली सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर चर्चेत आली होती. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीला पूर्णपणे बॉयकॉट केलं होतं. तेव्हा तिने ती फिल्मी गाणी गाणार नसल्याचे म्हटले होते. तिचे एक YouTube चॅनेल देखील आहे आणि तिच्या दोन्ही भावांचे चॅनेल देखील आहेत. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
