महर्षी वाल्मिकी यांना ओळखत नसलेली व्यक्ती या पृथ्वीवर कोणीच नसेल. हिंदू धर्मातील अतिशय महान आणि मोठे ऋषी म्हणून वाल्मिक ऋषींची ओळख आहे. यासोबतच त्यांची अजून एक महत्वाची आणि मोठी ओळख म्हणजे ‘रामायण’ या महाग्रंथाचे महाकाव्याचे लेखक. हिंदू धर्मातील महत्त्वाचे महाकाव्य रामायण महर्षी वाल्मिकी यांनी रचले होते. (Marathi News)
त्रेतायुगात महर्षी वाल्मीकि यांनी लिहिलेले रामायण प्रमाण मानले जाते. या रामायणाला हजारो वर्ष होऊन गेली तरीही रामायणातील लहानातल्या लहान प्रसंगाची माहिती प्रत्येक हिंदू व्यक्तीला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वाल्मिक ऋषींचे लेखन. वाल्मिकी ऋषींनी अतिशय प्रभावी पद्धतीने हा ग्रंथ लिहिला आहे. दरवर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमेला महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. आज आपण याच महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. (Maharshi Valmiki)
अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.२४ वाजता सुरू होत आहे. या तिथीची समाप्ती मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.१७ वाजता होणार आहे. यावेळी पौर्णिमा तिथी दोन दिवस आहे. त्यामुळेच मंगळवार ७ ऑक्टोबर रोजी वाल्मिकी जयंती साजरी केली जाणार आहे. संस्कृत भाषेतील रामायण या पहिल्या महाकाव्याच्या रचनेमुळे महर्षी वाल्मिकी यांना आदिकवी असेही म्हणतात. वाल्मिक ऋषी हे सुरुवातीच्या काळात वाल्या कोळी नावाचे एक लुटारू होते. मात्र एका घटनेने त्यांचे संपूर्ण जीवन बदलले आणि ते वाल्याचे महर्षी वाल्मिकी बनले. (Todays Marathi Headline)
‘वाल्या’ चा ‘वाल्मिकी’ कसा झाला कथा
वाल्या कोळी नावाचा एक दरोडेखोर एका घनदाट अरण्यात राहत होता. वाल्या हा रानातून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे आणि दागिने लुटायचा. त्याच्या या कृत्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. वाल्या हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी करत होता. एके दिवशी नारदमुनी नावाचे एक ऋषी घनदाट अरण्यात आले. नारदमुनी हे देवांचे भक्त होते आणि सतत ‘नारायण नारायण’ हा नामजप करत असत. नारदमुनींनी वाल्या कोळीचे हे वाईट कृत्या पाहिलं. त्यांनी खूप वाईट वाटलं इतकंच नाही तर त्याच्यावर ते संतप्तही झाले. (Marathi Top Stories)
नारदमुनांनी वाल्याला बोलावले आणि त्याला म्हणाले, ‘अरे, तुला एवढे वाईट कृत्य का करावं लागत आहे? लोकांना त्रास देऊन त्यांना लुटणे हे पाप आहे.’ त्यावर वाल्याने उत्तर दिलं, ‘मी हे सगळं माझ्या बायका-मुलांना जगण्यासाठी करत आहे. त्यांना खायला-प्यायला मिळावे, म्हणून मी लोकांची वाट अडवून त्याचा पैसे आणि दागिने लूटत आहे. नारदमुनांनी म्हणाले, ‘तू त्यांच्यासाठी करतोस, तर जा आणि त्यांना विचार, मी माझ्या पापाचं फळ तुम्हाला देत आहे, पण तुम्हाला माझ्या पापाचा अर्धा भागही सहन करायचा आहे का?’ (Top Trending Headline)
वाल्या कोळीने घरी जाऊन बायका-मुलांना विचारले. त्यावर ते म्हणाले, ‘तुमच्या पापाचे फळ आम्ही सहन करू शकत नाही. तुम्ही लोकांना त्रास देऊन जे पैसे मिळवता, त्याचे पाप तुम्हालाच भोगावे लागतील.’ हे ऐकून वाल्याला खूप वाईट वाटलं. त्याला कळून चुकलं, की त्याच्या कर्मांचे फळ किती भयानक आहे. तो निरपराध लोकांना त्रास देत आहे. त्याला पश्चात्ताप झाला आणि तो लगेच नारदमुनांकडे शरण गेला. तो म्हणाला,’मला माफ करा. मला या पापातून मुक्त करा.’ (Top Marathi Headline)
नारदमुनांनी प्रेमानं उत्तर दिलं, ‘वाल्या, तुला पश्चात्ताप झाला आहे, यातच सगळं आलं. आता तू ‘राम राम’ हा नामजप कर. मी परत येईपर्यंत तुला येथेच बसून नामस्मरण करावे लागेल.’ वाल्या कोळीने ती जागा सोडली नाही. तो सुरूवातीला ‘राम राम’ म्हणता येत नव्हता, म्हणून तो ‘मरा मरा’ असं नामजप करायचा. पण त्याचं मन अगदी मनापासून प्रामाणिक होतं. अनेक दिवस जात होते, आठवडे गेले, महिने उलटले, पण वाल्या कोळीने नामजप चालूच ठेवला. तेथे बसून नामस्मरण करत असताना, त्याच्या भोवती लाल मुंग्यांनी वारूळ तयार केला. पण त्याला काही फरक पडला नाही. तो नामजप करत बसत होता. (Latest Marathi News)
शेकडो वर्षे असे करत करत, देवाला त्याचा हा निष्ठावान नामजप पाहून फार आनंद झाला. ते साक्षात प्रकट झाले. देवाने त्याला आशीर्वाद दिला, ‘माझ्या नावाचा नामजप केल्यामुळे तुला मी क्षमा करतो. आजपासून तू वाल्या कोळी नाहीस, तुला आता वाल्मिकी ऋषी संबोधले जाईल’ हीच त्या महान वाल्मिकी ऋषींची सुरुवात होती. पुढे त्यांनी रामायण या पवित्र ग्रंथाची रचनाही केली. (Top Marathi News)
वाल्मिकी जयंतीचे महत्त्व
वाल्मिकी जयंती दरवर्षी महर्षी वाल्मिकी यांच्या जन्मदिनी साजरी केली जाते. वाल्मिकी ऋषी हे रामाचे महान भक्त मानले जातात. महर्षी वाल्मिकींनी रामायण रचले होते. वाल्मिकी जयंती तर सर्वजण साजरी करतात, मात्र वाल्मिकी समाजातील लोकांसाठी वाल्मिकी जयंती विशेष मानली जाते. वाल्मिकी समाजातील लोक वाल्मिकी ऋषींना देवाचे रूप मानून त्यांची पूजा करतात. या दिवशी त्यांची मंदिरे आणि ठिकाणे फुलांनी सजविली जातात आणि रामायणाचे पद गायल्या जातात. (Latest Marathi Headline)
महर्षी वाल्मीकिंना तपस्वी, मुनिपुंगव, द्विज अशी विशेषणे रामायणामध्ये दिलेली असल्याचे दिसते. रामायणाच्या उत्तरकांडात वाल्मिक ऋषींनी त्यांच्या उत्पत्तीबद्दल सांगितले आहे. ‘प्रचेतसोऽहं दशमः पुत्रो राघवनंदन’म्हणजे आपण प्रचेतसाचा दहावा पुत्र आहोत, असे त्यांनी म्हटल्याचे दिसते. रामायणातील उत्तरकांड म्हणजे मूळच्या काव्यात नंतर घातलेली भर आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. प्रचेता म्हणजे वरुण. त्याला भृगू व वाल्मीकि असे दोन पुत्र होते, असा संदर्भ भागवतात आला आहे. वाल्मीकि मोठे शिवभक्त होते, अशी मान्यता आहे. (Top trending News)
=======
Kojagiri Purnima : जाणून घ्या कोजागिरी पौर्णिमेचे महत्व
Kojagiri Purnima : कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजन करण्याचा विधी
=========
रामायण काव्याची निर्मिती कशी झाली?
रामायण निर्मितीची महत्त्वाची कथा क्रौंचवधाची होय. एकदा तमसा नदीच्या तीरावर असलेल्या क्रौंच पक्षाच्या एका जोडीतील नराला एक व्याध बाणाने मारीत असल्याचे वाल्मिक ऋषींनी पाहिले. क्रौंचीच्या अतिशय करूण विलापाने त्याचे हृदय हेलावले आणि त्याच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. अनुष्टुभातील या अकल्पित काव्यरचनेने वाल्मिक ऋषी स्वतःच भारावले. पुढे ब्रह्मदेव त्यांच्याकडे आले आणि आशीर्वाद देऊन महर्षी वाल्मिकींना रामायण रचण्याची आज्ञा केली. रामायणात ज्यावेळी सीतेला दुसऱ्यांदा वनवासात पाठवण्यात आले त्यावेळी वाल्मिकींनीच तिला आपल्या आश्रमात आश्रय दिला. राम आणि सीता यांचे दोन पुत्र, लव आणि कुश यांचा जन्मही याच आश्रमात झाला. रामायणामध्ये अंदाजे २४ हजार श्लोक आहेत. (Social News)
(टीपः हा लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. आम्ही कोणत्याही तथ्यांची पुष्टी करत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics