आज कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो मसाला दुधाने भरलेला ग्लास. कोजागिरी पौर्णिमा आणि मसाला दूध यांचे समीकरण खूपच जुने आहे. या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच या दिवशी दुधाचा आस्वाद घेतात आणि तृप्त होतात. कोजागिरीला प्रत्येक घरामध्ये मसाला दूध किंवा खीर बनतेच बनते. या दिवशी मसाला दूध हे रात्रभर चंद्राच्या शीतल प्रकाशात ठेवले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे सेवन केले जाते. मान्यता आहे की, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृतवृष्टी होते, म्हणून खीर बनवून चंद्राच्या थंड प्रकाशात काही तास ठेवावी आणि नंतर तिचे सेवन करावे. (Health)
असे मानले जाते की, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने महारस केले. भगवान श्रीकृष्णाने बासरी वाजवून गोपींना आपल्याकडे बोलावले आणि त्यांना अमृत पाजले. त्यामुळे शरद पौर्णिमेच्या रात्रीचे विशेष महत्त्व आहे. या रात्री, चंद्राच्या १६ कलांसह, चंद्र पृथ्वीवर शीतलता, पौष्टिक शक्ती आणि शांततेचा अमृत वर्षाव करतो. दसऱ्यापासून शरद पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाश आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर मानला जातो. या दिवसांमध्ये, तुम्ही चांदण्यांचा लाभ घ्यावा, जेणेकरून तुम्ही वर्षभर निरोगी आणि आनंदी राहाल. दृष्टी वाढवण्यासाठी दसऱ्यापासून शरद पौर्णिमेपर्यंत दररोज रात्री १५ ते २० मिनिटे चंद्राकडे पाहण्याचा सराव करावा. (Health Care)
कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध किंवा दुधाचे पदार्थ सेवन करण्यामागे खास कारण आहे. कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूमध्ये येते. हा ऋतू म्हणजे पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागण्याचा काळ. यावेळी वातावरणात मोठे बदल होत असतात. या कालावधीमध्ये शरीराला अधिक ताकदीची गरज असते. ही ताकद आपल्याला कॅल्शिअम मधून मिळते. कॅल्शियमचा मुख्य आणि प्रमुख स्रोत म्हणजे दूध. आपल्याला दुधातून मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. यामुळे फार जुन्याकाळापासून आयुर्वेदानुसार, कोजागिरी पौर्णिमेला दुध किंवा दूग्धजन्य पदार्थांचे सेवन करण्याची पद्धत आहे. (Marathi News)
याशिवाय दुधात ड्रायफ्रुट्स, वेलची पूड, दालचिनी, चारोळी असे पदार्थ मिसळल्याचे दुधाचे औषधी गुण अधिक वाढतात. हे आरोग्यासाठी अतिशय लाभदाक असतं. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध, खीर किंवा दूग्धजन्य पदार्थ खाल्ले जातात. यादिवशी मसाला दूध, खीर किंवा दुग्धजन्य पदार्थ खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. ऐकून आश्चर्य वाटले असेल ना? पण खरंच या दिवशी मसाला दूध पिण्याचे कोणते फायदे होतात जाणून घेऊया. (Kojagiri Pournima)
रोग प्रतिकारशक्ती वाढते
लवकरच थंडीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी थंडीच्या दिवसात दूध पिणे योग्य असते. शरद पौर्णिमेचा दिवस हा ‘फूल मून डे’ म्हणजेच पौर्णिमेचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी चंद्राच्या प्रकाशात ठेवलेलं दूध पिल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ति वाढण्यास मदत होते. (Todays Marathi Headline)
त्वचेच्या समस्या दूर होतात
त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात खीर ठेवून ती खीर खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. त्वचेशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांना या खीरचे सेवन करणे फायदेशीर ठरते. (Marathi Headline)
झोपेची गुणवत्ता सुधारते
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने दूध प्यायलाच हवे असे नाही. दुधातील प्रोटीनमुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. शिवाय कोजागिरीला दुधात सुकामेवा वापरल्यामुळे ते जास्त परिणामकारक ठरते. (Marathi News)
चंद्र दोष दूर होतो
धार्मिक मान्यतांनुसार, शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर प्रसाद बनवल्याने व्यक्तीतील चंद्र दोष दूर होतो आणि देवी लक्ष्मीची विशेष आशीर्वाद प्राप्त होते.
वजन कमी होते
रात्री झोपताना हळदीचे दूध किंवा मसाला दूध पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. कारण रात्री झोपताना दूध प्यायल्यामुळे आपल्याला सकाळी लवकर भूक लागत नाही. ज्यामुळे आपण सकाळी उठल्या उठल्या चुकीचे अन्नपदार्थ खाणे टाळतो किंवा कमी प्रमाणात खातो. (Marathi Top Headline)
आयुर्वेदातील महत्त्व
शरद ऋतूमध्ये आयुर्वेदानुसार शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दुधाचा आहारात समावेश करावा असा सल्ला दिला जातो. मसाला दुधात घातलेले केशर, वेलची, जायफळ, बदाम, पिस्ता आणि हळद हे सर्व घटक शरीराला उर्जा देतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि पचन सुधारतात. (Top Stories)
प्रथिनं मिळतात
दुधातून आपल्याला योग्य ती प्रथिनं मिळतात. दुधातील प्रोटीनमुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते. शिवाय दुधात सुकामेवा वापरल्यामुळे ते जास्त परिणामकारक ठरतं. त्यामुळे तुम्ही कोजागिरीच्या रात्री केसर, काजू आणि बदाम असा सुका मेवा वापरून मसाला तयार करू शकता. यामुळे हेल्थ ड्रिंक तयार होतं, तर सुकामेवामध्ये चांगल्या फॅट्स असतात. (Top Marathi Headline)
मजबूत हाडांसाठी
दूधात कॅल्शियमचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. कॅल्शियम आपले दात आणि हाडांच्या मजबूतीसाठी गरजेचे असते. जर आपल्याला हाडांच्या किंवा दातांच्या समस्या वारंवार होत असतील तर आहारात दूधाचा जरूर समावेश करावा. कोजागरीच्या रात्री मसाला दूध यासाठीच पिणे फायदेशीर ठरू शकते. ज्यामुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन – डी आणि कॅल्शियमची गरज भरून निघते. (Latest Marathi Headline)
दम्याच्या रुग्णांसाठी लाभदायक
ही खीर दम्याच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे. दम्याच्या रूग्णांनी ही खीर घ्यावी. या लोकांनी ही खीर शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात ठेवावी आणि पहाटे चारच्या सुमारास खावी. यामुळे फायदा होतो. (Top Trending News)
=======
Kojagiri Purnima : आर्थिक भरभराटीसाठी आजच्या दिवशी करा ‘हे’ उपाय
Kojagiri Purnima : कोजागिरी पौर्णिमेला ‘या’ वस्तूंचे दान करणे ठरेल लाभदायक
=======
मानसिक स्वास्थ चांगले राहते
कोजागिरीच्या रात्री हवामानात शीतलता असते. तसेच वातावरण अतिशय प्रसन्न आणि उत्साही असते. त्यामुळे या वातावरणात चंद्रप्रकाशातील मसाले दूध प्यायल्याने मन प्रसन्न होते. मानसिक ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी कोजागरीला मसाले दूध पिण्याचा फायदा होऊ शकतो. (Top Marathi Headline)
हृदयविकारासाठी फायदेशीर
हृदय विकाराच्या रुग्णांनाही या खीरचे सेवन करणे फायदेशीर ठरते. हृदयरोग्यांनी शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात खीरचे सेवन केले पाहिजे. ही खीर हृदयरोग्यांसाठी खूप फायदेशीर आहे. (Social News)
( टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics