आजच्या आधुनिक काळात स्त्रिया सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर पुरुषांना मागे ठेऊन स्त्रिया पुढे जात आहे. एकेकाळी याच महिलांना घराचा उंबरठा देखील ओलांडण्याची परवानगी नव्हती. आज त्याच महिला थेट अंतरिक्षापर्यंत पोहचल्या आहेत. आज असे कोणतेच क्षेत्र नाही जिथे महिला राज नाही. अगदी सायकल, बस, रिक्षा चालवण्यापासून ते थेट विमान चालवण्यापर्यंत महिला पुढे आहेत. आजवर आपण अनेक महिलांबद्दल आणि त्यांच्या यशाबद्दल जाणून घेतले. (Railway)
मात्र आपण आजवर कधीही महिला रेल्वे ड्राइव्हर असल्याचे ऐकले नव्हते. हा…रेल्वेमध्ये अनेक महिला विविध पदांवर कार्यरत आहे. मात्र रेल्वे चालवणाऱ्या महिलेबद्दल कधीही ऐकले नव्हते. कदाचित हेच एक असे क्षेत्र असावे जिथे महिला नव्हती. मात्र महाराष्ट्राच्या लेकीने ही कमतरता देखील पूर्ण केली. भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनण्याचा मान मिळविला आहे तो सातारच्या मराठमोळ्या लेकीने सुरेखा यादव यांनी. सुरेखा यादव यांना केवळ भारतीय रेल्वेतीलच नाही तर आशियातील पहिली महिला रेल्वे चालक असण्याचा मान मिळाला आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सुरेखा यादव या रेल्वेमधून निवृत्त झाल्या. जाणून घेऊया सुरेखा यांच्या याच प्रवासाबद्दल. (Marathi News)
सुरेखा यादव यांचा जन्म २ सप्टेंबर १९६५ रोजी साताऱ्यात झाला. सुरेखा यांचे पूर्ण बालपण साताऱ्यात गेले आहे. सुरेखा यादव यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र भोसले आणि आईचे नाव सोनाबाई असे आहे. सुरेखा यांचे वडील शेतकरी होते आणि एकूण पाच भावंडामध्ये सुरेखा सर्वात मोठ्या आहेत. सुरेखा यादव यांचे शालेय शिक्षण साताऱ्यातील सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आणि नंतर साताऱ्यातील कराड येथील सरकारी पॉलिटेक्निमधून इलेक्ट्रिकल इंजिनीयरचा डिप्लोमा पूर्ण केला. (Todays Marathi Headline)
पुढे सुरेखा यांनी रेल्वे भरतीची जाहिरात पाहून, रेल्वेसाठी असिस्टंट ड्रायव्हर पदासाठी फॉर्म भरला. १९८६ मध्ये त्या लेखी परिक्षा उत्तीर्ण झाल्या आणि मुलाखतीसाठी पात्र ठरल्या. मुलाखतीत निवड झाल्यानंतर सुरेखा यांची सहा महिन्यांसाठी कल्याण ट्रेनिंग स्कूलमध्ये सहाय्यक चालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८९ मध्ये त्या सहाय्यक चालक म्हणून रेल्वेमध्ये रुजू झाल्या. मालगाडी सुरळीतपणे हाताळल्यानंतर त्यांना २००० मध्ये मोटर वुमन पदावर बढती मिळाली. भारतीय रेल्वेवरील प्रतिष्ठेची असलेली डेक्कनक्वीन एक्स्प्रेसचे त्यांनी यशस्वीपणे चालवली. (Top Marathi News)
पश्चिम घाट रेल्वे मार्गावर ट्रेन चालवण्याची संधी त्यांना २०१० मध्ये मिळाली. त्यानंतर २०११मध्ये त्या एक्सप्रेस मेलच्या पायलट बनल्या. २०११ मध्ये अथक प्रयत्नानंतर मध्य रेल्वेकडून आणि सुरेख यादव यांच्या कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे सुरेखा यादव या आशियातील पहिली महिला ड्रायव्हर झाल्या. सन २००० मध्ये ममता बॅनर्जी यांनी महिलांसाठी चालवलेल्या स्पेशल लोकल ट्रेनच्या ड्रायव्हर म्हणून सुरेखा यांनी काम पाहिले होते. २०११ मध्ये त्यांना आशिया खंडातील पहिल्या महिला ट्रेन ड्रायव्हर म्हणून सन्मानित करण्यात आले. २०११ पासून त्या कल्याणच्या सेंटरमध्ये नवीन तरुणांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. (Latest Marathi Headline)
सुरेखा यादव यांच्या पतीचे नाव शंकर यादव असे आहे. ते महाराष्ट्र पोलिस इन्स्पेक्टर आहेत. सुरेखा आणि शंकर यांना दोन मुले आहेत. कुटूंबाच्या पाठीब्यांशिवाय मी इथपर्यत पोहोचले नसते,असे त्या कायम सांगतात. सुरेखा यांनी १९८९ ते १९९३ मालवाहू गाडीची सहाय्यक इंजिन ड्रायव्हरची नोकरी केली. तर मार्च १९९३ ते ऑगस्ट १९९३ पर्यत इगतपुरी घाट इंजिनचे सहायक ड्रायव्हर म्हणून काम केले. सप्टेंबर १९९३ ते एप्रिल १९९४ मध्ये लोणावळा घाटात मेलला धक्का देणाऱ्या इंजिनचे सहायक ड्रायव्हर म्हणून देखील काम केले आहे. (Top Trending News)
=========
Donald Trump : नोबेल शांतता पुरस्कारासाठी तब्बल 338 दावेदार !
=========
ऑगस्ट १९९४ ते मार्च १९९५ पर्यंत मालगाडी इंजिन ड्रायव्हरची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. १९९८ मध्ये रेल्वेची पहिली महिला स्पेशल गाडी चालविण्याचा मान मिळवला. एवढेच नाही तर त्यांनी वंदे भारत चालवण्याचा बहुमान देखील मिळवला होता. मागच्या वर्षी जेव्हा नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा सुरेखा यांना त्या खास आणि भव्य सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते. मध्य रेल्वेने सुरेखा यादव यांना हे आमंत्रण पाठवले होते. दरम्यान सुरेखा यांचे लग्न झाले असून, त्यांचे पती रिटायर झाले आहेत. तर त्यांना दोन मुलं असून दोन्ही मुलांनी इंजिनियर केले आहेत आणि त्यांची लग्नं देखील झाली आहेत. आजवर सुरेखा यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics