आज कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा आहे. आजच्या दिवसाला सनातन धर्मामध्ये मोठे महत्त्व देण्यात आले आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. या सणाला कोजागरी पौर्णिमा किंवा रास पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी संपत्ती, वैभव आणि समृद्धीसाठी उपवास केला जातो. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र त्याच्या १६ कलांनी पूर्ण होतो आणि अमृताचा वर्षाव करतो अशी मान्यता आहे. (Marathi)
वर्षभरात येणाऱ्या सर्व पौर्णिमांपैकी आश्विन महिन्यातील शरद पौर्णिमा तिथी ही विशेष मानली जाते. शरद पौर्णिमेच्या रात्री काही उपाय केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. देवी लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर धन-समृद्धीचा वर्षाव होतो. पौर्णिमा आज ६ ऑक्टोबरला दुपारी १२:२३ वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:१६ वाजता संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल. आजच्या दिवशी लक्ष्मी पूजनाला मोठे महत्त्व आहे. आज विधिवत लक्ष्मीपूजन केले तर देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आणि आर्थिक स्थैर्य लाभते. यासोबतच आपण आजच्या दिवशी काही उपाय केले तर नक्कीच देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते. (Kojagiri Purnima)
– शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीमातेची कृपा मिळवण्यासाठी विशेष स्वरुपात श्री सूक्त किंवा कनकधारा स्त्रोताचे पठण करावे. यामुळे आर्थिक संकटं दूर होण्यास मदत मिळू शकते. (Marathi News)
– कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी, गणपती, विष्णू, चंद्र यांची पूजा करावी. जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा कष्टाने कमावलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल, तर हा उपाय फायदेशीर ठरेल. (Todays Marathi Headline)
– आजच्या दिवशी रात्री १२ वाजता सर्व देवतांची अवश्य पूजा करा, यानंतर गंगाजल शिंपडा. असे केल्याने तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल.
– शरद पौर्णिमेच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करुन देवी लक्ष्मीची पूजा करावी. यासाठी ईशान्य कोपऱ्यात लक्ष्मीची मूर्ती स्थापन करा. त्यानंतर तुपाचे दोन दिवे लावून त्यात लवंग घाला. देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करा. या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि तुमच्या संपत्ती वाढ होईल. (Marathi Headline)
– नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हनुमानजींसमोर चारमुखी दिवा लावा. असे केल्याने आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते. यासोबतच नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. (Top Marathi News)
– शरद पौर्णिमेला पाटावर किंवा चौरंगावर स्वस्तिक बनवून त्यावर पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. यानंतर एक पेला गव्हाने भरुन त्यात एक रुपयाचे नाणे टाका. या दिवशी शरद पौर्णिमेची कथा वाचा. यानंतर कमलगठ्ठ्याने ‘ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः’ चा ११ वेळा जप करा. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होईल. (Top Stories)
– शरद पौर्णिमेच्या दिवशी ४ लवंगा आणि लाल वस्त्र घ्या. यानंतर महालक्ष्मीचे ध्यान करताना तुपाचा दिवा लावा. त्या दिव्यात लवंगाची जोडी ठेवा. उरलेल्या लवंगा लाल कापड्यात बांधून देवी लक्ष्मीसमोर ठेवा. पूजा झाल्यानंतर या लवंगा पैशासह तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती हळूहळू मजबूत होईल. (Latest Marathi Headline)
=========
Kojagiri Purnima : यंदा कोजागिरी पौर्णिमा कधी आहे? काय आहे या दिवसाचे महत्त्व?
Kojagiri Purnima : जाणून घ्या कोजागिरी पौर्णिमेचे महत्व
Kojagiri Purnima : कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजन करण्याचा विधी
=========
– कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर तयार करावी. रात्री चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात खीर ठेवावी. यानंतर घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याला खाऊ घाला, यामुळे जुनाट आजार बरे होतात अशी मान्यता आहे. (Top Trending News)
– शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र देवतेचे दर्शन करणे आणि पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्र देव त्यांच्या पूर्ण आणि तेजस्वी स्वरुपात असतात. या दिवशी चंद्र देवतेला चांदीच्या पेल्यामध्ये दूध किंवा पाणी अर्पण केल्यास कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूते होते आणि शुभ फळ मिळतात, असे म्हणतात. (Social News)
( टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics