Home » Kojagiri Purnima : कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजन करण्याचा विधी

Kojagiri Purnima : कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजन करण्याचा विधी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Kojagiri Purnima
Share

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा म्हटले जाते. या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही लोकांच्या रीतीप्रमाणे हा दिवस नवरात्रीचा शेवटचा दिवस देखील मानला जातो. या दिवशी चंद्राची आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याला खूप महत्व आहे. यंदा कोजागिरी पौर्णिमा ही ६ ऑक्टोबरला दुपारी १२:२३ वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:१६ वाजता संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल. (Kojagiri Pournima)

कोजागिरीच्या रात्री ११ वाजून ४५ मिनिटांपासून ते १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत लक्ष्मीचे पूजन करण्याचा शुभ मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावर देवी नारयण आणि लक्ष्मीच्या फोटोसमोर तूपाचा दिवा लावून श्रीसुक्ताचे पठण करावे. त्यानंतर चंद्राच्या प्रकाशात ठेवलेल्या दूधाचा नैवेद्य दाखवून त्या दूधाचे सेवन करावे. (Marathi)

धार्मिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी समुद्रमंथनाच्या वेळी प्रकट झाली. त्यामुळे शरद पौर्णिमा ही देवी लक्ष्मीची जयंती म्हणून देखील साजरी केली जाते. हा दिवस अनेक ठिकाणी कोजागर पूजा म्हणून ओळखला जातो. या दिवशी दिवाळीप्रमाणेच देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे केल्याने व्यक्ती आर्थिक समस्यांपासून मुक्त होते असे मानले जाते. यासोबतच व्यक्तीला आर्थिक स्थैर्य, सुबत्ता प्राप्त होते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागरी पौर्णिमा असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. (Marathi News)

कोजागरीला लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरून ‘को जागर्ती’? असा प्रश्न विचारते, असे मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला कोजागरी असे म्हणतात. भारतातील बहुतांश ठिकाणी शरद पौर्णिमेला लक्ष्मी नारायणाचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे. या दिवशी देवी नारायणांसह गरुडावर आरुढ होऊन पृथ्वीतलावर येते. लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवता स्वर्गातून पृथ्वी येतात. तसेच या दिवशी रात्री मसाला दूध पिण्याची प्रथा प्रचलित आहे. (Todays Marathi Headline)

कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते, अशी पौराणिक मान्यता आहे. या कारणास्तव, कोजागिरी पौर्णिमेला व्रत करण्याच्या नियमांचे पालन करून तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता. या दिवशी देवी लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करण्यासोबतच इंद्राचीही पूजा केली जाते, ज्यामुळे पूजा करणाऱ्या व्यक्तीसाठी संपत्तीचे दरवाजे खुले होतात. (Top Marathi News)

कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजन कसे करावे?
सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून देवासमोर बसावे. नंतर हातात पाणी, तांदूळ आणि फुले घेऊन व्रत-पूजेचा संकल्प करावा. दिवसभर उपवास करावा. रात्री शुभ मुहूर्तापूर्वी पुन्हा स्नान करून स्वच्छ कपडे घाला. घरातील स्वच्छ ठिकाणी लाकडी पाट ठेवून त्यावर देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. देवी लक्ष्मीला हळदी कुंकू वाहावे. फुलांची माळ घाला आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा. देवीला अबीर, गुलाल, वस्त्र, सुपारी इत्यादी वस्तू अर्पण करावे. (Top Trending Headline)

सौभाग्याचं लेणं ज्यात लाल चुनरी, बांगड्या, ओटी, हळद कुंकू, आरसा, कंगवा, मेहंदी आदी सर्व गोष्टी देवीला अर्पण कराव्या. देवीला नैवेद्य दाखवा. पूजेनंतर कापराची आरती करावी. पूजेनंतर काही वेळ देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी, ब्राह्मणांना भोजन द्यावे किंवा शिदा द्यावा आणि दान-दक्षिणा द्यावी. अशा प्रकारे शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. लक्ष्मी पूजन करताना पुढील मंत्र म्हणावा.
माँ लक्ष्मी मंत्र: ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीध प्रसीध ओम महालक्ष्मीय नमः।
चंद्रदेव मंत्र: ॐ पुत्र सोमय नमः।
श्री कृष्ण रास लीला मंत्र:
ॐ स्वच्छ कृष्णाय गोपीजनवल्लभय स्वाहा. (Latest Marathi Headline)

=========

Kojagiri Purnima : यंदा कोजागिरी पौर्णिमा कधी आहे? काय आहे या दिवसाचे महत्त्व?

Kojagiri Purnima : जाणून घ्या कोजागिरी पौर्णिमेचे महत्व

=========

कोजागिरीच्या रात्री चंद्र उगवल्यावर आपल्या क्षमतेनुसार मातीचे दिवे शुद्ध गाईच्या तुपाने लावावे. यानंतर मातीच्या भांड्यात खीर भरून चाळणीने झाकून चंद्रप्रकाशात ठेवा. रात्रभर जागृत राहून विष्णु सहस्त्रनामाचा जप करा, श्री सुक्ताचे पठण करा, श्रीकृष्णाचा महिमा करा, श्रीकृष्ण मधुराष्टकम् आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करा. पूजेच्या सुरुवातीला गणपतीची आरती करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून ती खीर लक्ष्मीला अर्पण करावी. त्यानंतर ती खीर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून वाटून द्या. (Top Trending News)

असे म्हटले जाते की अशा प्रकारे भगवान विष्णू आणि धनाची देवता यांची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व प्रकारच्या ऋणातून मुक्ती मिळते. चंद्राला अर्पण केलेले दूध किंवा खीर कुटुंबातील सर्वांना प्रसाद म्हणून वाटा. तसेच लक्ष्मी मातेची प्रार्थना करा. श्रीसूक्त, लक्ष्मी अष्टक, किंवा कनकधारा स्तोत्र यांचे पठन करू शकता. यानंतर घरात समृद्धी आणि सुख-शांतीसाठी प्रार्थना करा. रात्री चंद्र दिसल्यावर, खीर घेऊन चंद्राला अर्पण करा. चंद्राला पाहताना पुढील मंत्र म्हणू शकता. “ॐ स्रां स्रीं स्रौं सः चंद्राय नमः.” (Social News)

(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.