Home » Health : ‘हे’ सोपे उपाय करून ॲसिडिटीचा त्रास करा कमी

Health : ‘हे’ सोपे उपाय करून ॲसिडिटीचा त्रास करा कमी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

अ‍ॅसिडिटी ही एक गंभीर मात्र तशी सामान्य समस्या आहे, जी अनेकांना भेडसावते. या त्रासामुळे खूपच अस्वस्थ जाणवते. पोटात जास्त प्रमाणात आम्ल निर्माण झाल्यामुळे ही स्थिती उद्भवते. रात्री उशीरा जेवण, काहीही खाणं, उशीरा झोपायचे, सकाळी उशिरा उठायचे, घाई घाईमध्ये खायचे, जंक फूड अधिक खायचे, अनियमित दिनचर्या आदी सर्वच गोष्टी या आधुनिक काळात वाढताना दिसत आहे. मात्र यासोबतच याचे साइड इफेक्ट्स याचे त्रास देखील लोकांना जाणवत आहे. यामधीलच एक समस्या म्हणजे ॲसिडिटी. (Health)

बऱ्याच वेळेस जेवल्यानंतर अपचन, आंबट ढेकर येणे आणि उलटी होणे असे अनेक त्रास लोकांना होतात. ही सर्व ॲसिडिटीची लक्षणे आहेत. अ‍ॅसिडिटीची मुख्य कारणे म्हणजे अयोग्य आहार, धूम्रपान आणि मद्यपान. परंतु आहारातील बदल, हर्बल टी आणि अल्कधर्मी पदार्थांद्वारे आम्लपित्त रोखता येते आणि त्याचे निराकरण करता येते. आज आपण या लेखातून अ‍ॅसिडिटीवर काही घरगुती सोपे आणि साधे प्रभावी उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया. (Marathi )

तुळस
तुळशीमुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता. त्यामुळे पोटाची जळजळ कमी होण्यास मदत होईल. तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे ॲसिडच्या समस्येपासून आराम देण्याचे काम करेल. तुळशीची पाने पाण्यात उकळून हे पाणी प्यायल्याने देखील आराम मिळतो. (Health News)

कोमट पाणी
पचन सुलभ करण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. रोज कोमट पाण्याचे सेवन केल्याने ॲसिड रिफ्लेक्सची लक्षणे कमी करण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी पिणे देखील लाभदायक आहे. (Marathi News)

केळी
केळी अ‍ॅसिडिटीवर त्वरित आराम देते. केळीमध्ये नैसर्गिक अँटासिड गुणधर्म असतात, जे पोटातील अ‍ॅसिडसिडचे प्रमाण कमी करतात. केळी खाल्ल्याने पोटात थंडावा येतो आणि जळजळ कमी होते. केळीमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधरते, ज्यामुळे अ‍ॅसिडसिडिटीचा त्रास कमी होतो. केळीचे सेवन अ‍ॅसिडिटीवर एक उत्तम उपाय आहे. (Todays Marathi Headline)

Health

आल्याचा रस
आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे पोटातील अ‍ॅसिडसिडिटी कमी करण्यास मदत करतात. आल्याचा रस किंवा आले पाण्यात उकळून त्याचे सेवन केल्यास अ‍ॅसिडसिडिटीच्या त्रासापासून त्वरित आराम मिळतो. आले पोटातील गॅस्ट्रिक सिक्रेशन्स कमी करते, ज्यामुळे पोटातील जळजळ आणि वेदना कमी होतात. (Latest Marathi News)

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर
अल्टरनेटिव्ह मेडिसिन रिव्ह्यूमधील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की अ‍ॅपल सायडर व्हिनेगर अ‍ॅसिड रिफ्लक्सची लक्षणे कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करू शकते. पोटात आम्ल उत्पादन स्थिर करण्यासाठी हे फायदेशीर आहे. हे पचनास मदत करेल आणि गॅस आणि आम्लतेच्या समस्या टळेल. एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर पाण्यात पातळ करा आणि नाश्त्यापूर्वी प्या. (Top Marathi Headline)

बदाम
बदाममध्ये पचनास उपयुक्त असलेले अनेक पौष्टिक घटक असतात. बदामामध्ये असलेल्या नैसर्गिक तेलांमुळे पोटातील अ‍ॅसिडसिडचे प्रमाण कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. बदामाचे नियमित सेवन केल्यास पोटातील जळजळ आणि अ‍ॅसिडसिडिटी कमी होते. अ‍ॅसिडसिडिटीच्या त्रासापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी बदाम चघळणे हा एक सोपा उपाय आहे. (Marathi Trending Headline)

जिरे पाणी
पचन सुधारण्यासाठी आणि पोटफुगी कमी करण्यासाठी जिरे पाणी उत्तम आहे. जिरे पाणी पोटातील आम्लांचे उत्पादन रोखण्यास आणि आम्लपित्त आणि अपचन यांसारखा त्रास कमी करण्यास मदत करू शकतात. म्हणून सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्या. (Top Marathi News)

नारळाचे पाणी
नारळाचे पाणी हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करते आणि पोटातील अ‍ॅसिडसिडचे प्रमाण कमी करते. नारळाचे पाणी पोटातील जळजळ कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. नारळाचे पाणी प्यायल्याने अ‍ॅसिडसिडिटीच्या त्रासापासून त्वरित आराम मिळतो. (Latest Marathi Headline)

========

Dussehra : दसऱ्याला सोनं म्हणून वाटल्या जाणाऱ्या आपट्याच्या पानांचे आहेत अनेक आरोग्यवर्धक लाभ

========

ताक
ताकामध्ये चांगले बॅक्टेरिआ असतात. त्यात लैक्टिक ॲसिड असते. हे ॲसिडटीच्या लक्षणांपासून त्वरित आराम देण्यास मदत करते. ताकाचा प्यायल्याने गॅस आणि ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम देण्याचे काम करतो. यामुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहते. म्हणूनच तुम्ही रोज नियमितपणे ताकही पिऊ शकता. (Top Trending News)

बडीशेप
बडीशेप ही माऊथ फ्रेशनर म्हणूनही वापरली जाते. याशिवाय अनेक स्वादिष्ट पदार्थांमध्येही याचा समावेश होतो. ॲसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बडीशेपही खाऊ शकता. यामुळे गॅस, अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. त्यामुळे आतडे निरोगी राहण्यास मदत होते. बडीशेपेच्या पाण्याचेही सेवन करू शकता. यासाठी पाण्यात थोडी बडीशेप उकळा. पाणी कोमट झाल्यावर ते गाळून सेवन करा. (Social News)

(टीप : वरील सर्व आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्क्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.