आज सगळीकडे दसऱ्याच्या निमित्ताने रावण दहन होत आहे. त्रेतायुगात भगवान विष्णूंच्या राम अवताराने रावणाचा वध केला. विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय. याच दिवशी रामाने रावणाचा शेवट करून सत्यावर विजय मिळवला. रावण हा क्रूर दैत्य होता, ज्याने माता सीतेचे अपहरण केले होते. रावण शंकराचा निस्सीम भक्त होता. असे असले तरी त्याच्यामध्ये अनेक दुर्गुण होतो. याच दुर्गुणांमुळे आणि त्याच्या अहंकारामुळे त्याचा नाश झाला. रावण हा वाईटचे, असत्याचे प्रतीक आहे. त्यामुळेच त्याचे कुठेही पूजन केले जात नाही. (Ravan Temple)
जिथे रामाला सर्वस्व मानले गेले आहे, नायक मानले गेले आहे तिथे रावण खलनायक म्हणून ओळखला जातो. त्याचा सर्वच लोकं निव्वळ द्वेष करतात. रामाची सर्वच ठिकाणी पूजा केले जाते. त्यांची अगणित मंदिरं देखील आहेत. मात्र रावण हा कायम राक्षस म्हणूनच ओळखला जातो. मात्र अशा या रावणाचे कुठे मंदिर असेल याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही. याच रावणाचे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मंदिर आहे असे जर आम्ही सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणारच नाही. पण हे खरे आहे. रावणाचे एक मंदिर महाराष्ट्र्र असून त्याची पूजा देखील केली जाते. सांगोळा गावात रावणाच्या मंदिरासोबतच श्रीराम, हनुमान, भवानी देवीचंही मंदिर आहे.. गावाला अगदी लागूनच गावाची मन नदी वाहते. (Marathi News)
अकोल्यातील सांगोळा हे असे एक गाव आहे. जिथं रावण दहनाच्या दिवशी रावणाची पूजा केली जाते. संपूर्ण गाव या दिवशी रावणाची पूजा करायला एकत्र येतं. आरती करण्यात येते. हार घालून विधिवत पूजा केली जाते. अकोला शहरापासून जवळपास ४५ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. हजार दीड हजार लोकसंख्या असणाऱ्या या सांगोळा गावाची ओळख रावणाचे गाव म्हणून आहे. या गावामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला एका चौथाऱ्यावर काळ्या पाषाणाची एक मूर्ती दृष्टीस पडते. (Todays Marathi Headline)
हीच ती दशमुखी रावणाची मूर्ती आहे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार जवळपास ३०० वर्षांपूर्वी याठिकाणी रावणाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या मूर्तीला दहा तोंडं आहेत. दहाही तोंडाच्या मस्तकावर मुकुट आहेत. हातामध्ये तलवार आहे. मूर्तीच्या इतर भुजांमध्ये आणखी शस्त्रं असून, ही मूर्ती युद्ध पेहरावात आहे. मात्र रावणाची मूर्ती याठिकाणी कशी आली याची नोंद कुठेही नाही. (Latest Marathi Headline)
या गावात रावणाची पूजा होण्यामागे एक आख्ययिका सांगितली जाते. सांगोळा गावातील ग्रामदैवतेसमोर झाडाची दगडी मूर्ती तयार करण्यास प्रतिष्ठित नागरिकांनी शिल्पकाराला सांगितलं होतं. मुर्तीकाराने मूर्ती घडवली. पण शिल्पकाराकडून १० तोंडी रावणाची प्रतिकृती तयार झाली. सांगितल्याप्रमाणे मूर्ती तयार झाली नसल्याने गावकरी शिल्पकारावर नाराज झाले. बैलगाडीवर मूर्तीला घेऊन ते गावामध्ये आले. गावाची हद्द सुरु होताच बैल थांबले. कुठल्याच परिस्थितीत बैल गावामध्ये प्रवेश करत नव्हते. शेवटी गावकऱ्यांना गावाच्या वेशीवरच नारळ फोडून मूर्तीची स्थापना करावी लागली. (Top Marathi Headline)
याच गावात हनुमानाचं मंदिर असल्याने ही मूर्ती गावात गेली नसावी, असे देखील म्हटले जाते. दहा तोंडी रावण पाषाणातील मूर्तीच गावातीलच एक पुजारी दररोज पूजा करतो. पण दसऱ्याला संपूर्ण गाव रावणाची पूजा करायला एकत्र येतात. (Latest Marathi News)
महादेवाची पूजा करणारा रावण हा दृष्ट प्रवृत्तीचा नव्हता असं या गावातील गावकऱ्यांचे मत आहे. पूर्वापार चालत आलेली आणि पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे आजही या गावात रावणाची पूजा केली जाते. ही परंपरा पुढेही सुरूच राहील. ‘राम’ आणि ‘रावण’ या दोन विचार धारांमध्ये अडकून सांगोळा या गावातील रावणाचं मंदिर येथे बनू शकले नाही. मात्र गावकऱ्यांना आलेल्या अनुभवाने येथे सभामंडप तयार करण्याचा मानस गावकऱ्यांचा आहे. रावण चांगला होता किंवा वाईट हे पुराणचं सांगू शकतं. मात्र अकोल्याच्या सांगोळा गावकऱ्यांची रावणाप्रतीची श्रद्धा आहे.(Top Trending News)
=======
Dussehra : दसरा स्पेशल-रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्याचे फायदे
=======
सांगोळ्यातील रावणाची ही सुंदर मुर्ती ५०-६० वर्षांपुर्वी चोरून नेण्याचा प्रयत्नही झाला. एकदा काही बाहेरच्या लोकं रात्रीच्या वेळी गावात ही मूर्ती चोरून नेण्याकरीता आली होती. मात्र, मोठे प्रयत्न करूनही ती उचललीच न गेल्याने चोरीचा प्रयत्न फसल्याची आठवण गावकरी सांगतात. वर्षभरातून दसरा आणि रामनवमीला या रावणासाठी गावकरी विशेष आरती आणि सोहळा साजरा करतात. दसऱ्याला होणारं रावण दहन थांबावं, असंही आवाहन हे गावकरी लोकांना करतात. कारण, रावण हा सर्वात मोठा शिवभक्त होता. सितेकडे त्यानं कधीही वाईट नजरेनं न बघता तिचा आई म्हणून सन्मानच केल्याचं गावकरी सांगतात. (Social News)
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics