Home » Dussehra : दसरा स्पेशल-रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्याचे फायदे

Dussehra : दसरा स्पेशल-रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्याचे फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dussehra
Share

आज दसरा. साडे तीन मुहूर्तापैकी अतिशय मोठा आणि महत्वाचा मुहूर्त आणि दिवस. आजच्याच दिवशी प्रभू श्रीरामांनी दशानन रावणाचा वध केला होता. त्यामुळे आजचा दिवस हा वाईटाचा चांगल्यावर झालेल्या विजयाचे प्रतीक म्हणून देखील साजरा केला जातो. प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचा सातवा अवतार होते. त्यांचे संपूर्ण जीवन प्रत्येकासाठी आदर्श आहे. त्यांच्यात असणारा प्रत्येक गुण मनुष्यासाठी लाभदायक आहे. किंबहुना प्रत्येक व्यक्तीने रामाचा एक गुण आवर्जून अंगी बनला पाहिजे. आजवर प्रभू श्रीराम यांची स्तुती विविध प्रकारांनी केलेली आपण पाहिली आहे, पण त्यामध्ये ‘रामरक्षा स्तोत्र’ सर्वात वरच्या स्थानावर आहे. (Marathi)

रामरक्षा स्तोत्राची माहिती औरच आहे. रामरक्षा माहिती नाही, किंवा कधीच ऐकली नाही असे खूपच कमी लोक असतील. या रामरक्षेतून रामाची महती, त्यांचा स्वभाव, त्यांचे गुण आदी सर्वांचेच वर्णन केले आहे. रामरक्षेत श्रीराम यांची स्तुती केलेली असून तो एक तारक मंत्र देखील आहे. रामरक्षा पठणाने पापक्षालन घडतं. याच्या नियमित जपाने सर्व प्रकारच्या अडचणींपासून मुक्ती मिळते. श्री राम रक्षा स्तोत्र पठण केल्याने प्रभू श्रीरामांची कृपा भाविकावर सदैव राहते. पूर्ण श्रद्धेने प्रभू श्रीरामांना सपर्पित होऊन या स्तोत्राचे पठण केल्यास स्वत: प्रभू श्रीराम त्यांची रक्षा करतात अशी मान्यता आहे. शत्रुंपासून बचाव करण्यासाठीही या स्तोत्राचे पठण अत्यंत लाभदायक मानले गेले आहे. या रामरक्षा स्तोत्राची उत्पत्ती कशी झाली महिती आहे का? (Dussehra)

रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, “एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र आहे का? “तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीस ‘रामरक्षा’ स्तोत्रविषयी सांगितले. रामरक्षेची निर्मिती कशी झाली याबद्दल एक आख्ययिका प्रसिद्ध आहे. आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. १०० कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच आपल्याकडे हवे असे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले.

Dussehra

शेवटी शंंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. १०० ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली. ते म्हणाले,” ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो ” असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्व जण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जावू लागले. एक ऋषि मात्र शेवटपर्यंत थांबले. (Marathi News)

त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याचवेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जावून ‘रामरक्षा’ सांगितली. काही काळाने ऋषींना जाग आली. आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा ‘रामरक्षेची ‘ निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते ‘बुधकौशिक’ ऋषी. याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे.

श्री रामरक्षा स्तोत्रात ३८ श्लोक आहेत, त्यापैकी बहुतेक अनुष्टुप् श्लोकांमध्ये आहेत आणि त्यामुळे ते लवकर लक्षात राहतात. या स्तोत्राची कीलक श्री हनुमानजी आहेत आणि हे चमत्कारिक स्तोत्र बुधकौशिक ऋषींकडून प्राप्त झाले आहे. असे मानले जाते की, भगवान शंकराने त्यांना हे कल्याणकारी स्तोत्र स्वप्नात उपदेशाच्या रुपात सांगितले होते.

=========

Dussehra : वाईटचे प्रतीक असणाऱ्या रावणामध्ये देखील होते ‘हे’ सद्गुण

Ramayana : रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर रामाची वानरसेना गेली कुठे?

=========

 

असे मानले जाते की रामरक्षा स्तोत्र सिद्ध केल्यावर खूप फायदा होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिद्ध झालेल्या रामरक्षा स्तोत्राचा फायदा दुसर्‍या व्यक्तीला संकटातून सोडवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. असे मानले जाते की दररोज श्री राम रक्षा स्तोत्राचे पठण केल्याने साधक सर्व प्रकारचे अपघात, आकस्मिक संकट आणि इतर सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित राहतो. १२१ वेळा रोज एका ठराविक ठिकाणी, ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते. गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज १३ वेळा…किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज १३ वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते. (Todays Marathi Headline)

Dussehra

रामरक्षा पठणाचे फायदे
> रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने मनातील भीती दूर होते. जर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचे भय असेल तर तुम्ही हे स्तोत्र अवश्य म्हणा.

> या स्तोत्राचा नियमित जप केल्यास सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक कष्टांपासून सुटका होते.

> जर अचानक एखादी आपत्ती किंवा संकंट ओढावलं किंवा असं वाटत आहे की आता काहीतरी अडचण येणार आहे, तर या स्तोत्राचे पठण केल्यास संकटांपासून बचाव होतो. (Marathi Latest News)

> असे मानले जाते की, जे कोणी श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण नियमितपणे करतात त्यांना उत्तम आरोग्य लाभते. त्यांचा स्वभावात आदर आणि सौम्यता वाढते.

> जर कोणाच्या कुंडलीत मंगळ ग्रहाचा दोष असेल, तर रामरक्षा स्तोत्राचा नियमित जप केल्याने त्याचे दुष्परिणाम काही प्रमाणात कमी होतात.

> पवनपुत्र हनुमान जे भगवान श्रीरामांचे परम भक्त आहेत. त्यांची कृपादृष्टी आपल्याला राहते, जेव्हा आपण नियमीतपणे रामरक्षा स्तोत्राचे पठण करतो.

> रामरक्षा स्तोत्राचे पठण करणाऱ्या व्यक्तीवर श्री राम नेहमीच कृपा करतात. रामरक्षा स्तोत्राचे पठण करणाऱ्या व्यक्तीमध्ये सकारात्मक भावनांचा संचार होतो.

> रोज रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने दीर्घायुष्य, संतान, शांती, विजय, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. जो व्यक्ती रोज रामरक्षा स्तोत्राचा पाठ करतो, तो येणाऱ्या अनेक संकटांपासून वाचतो. (Top Marathi News)

।। श्रीगणेशायनमः ।।
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य। बुधकौशिकऋषिः।
श्रीसीतारामचन्द्रो देवता। अनुष्टुप् छन्दः। सीताशक्तिः।
श्रीमद्हनुमान कीलकम्। श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः।।

।। अथ ध्यानम् ।।
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्‌मासनस्थं।
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्॥
वामाङ्‌कारूढसीतामुखकमलमिललोचनं नीरदाभं।
नानालङ्‌कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम् ॥

।। इति ध्यानम् ।।
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥२॥
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरांतकम्।
स्वलीलया जगत् त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥३॥
रामरक्षां पठेत्प्राज्ञ: पापघ्नीं सर्वकामदाम्।
शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज: ॥४॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रिय: श्रुती।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल: ॥५॥
जिव्हां विद्यानिधि: पातु कण्ठं भरतवंदित:।
स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्नेशकार्मुक: ॥६॥
करौ सीतापति: पातु हृदयं जामदग्न्यजित्।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय: ॥७॥

Dussehra
सुग्रीवेश: कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु:।
ऊरु रघूत्तम: पातु रक्ष:कुलविनाशकृत् ॥८॥
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखांतक:।
पादौ बिभीषणश्रीद: पातु रामोSखिलं वपु: ॥९॥
एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठेत्।
स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥
पाताल-भूतल-व्योम-चारिणश्छद्‌मचारिण:।
न द्र्ष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ॥११॥ (Top Marathi Stories)
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति ॥१२॥
जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्।
य: कण्ठे धारयेत्तस्य करस्था: सर्वसिद्धय: ॥१३॥
वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत्।
अव्याहताज्ञ: सर्वत्र लभते जयमंगलम् ॥१४॥
आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर:।
तथा लिखितवान् प्रात: प्रबुद्धो बुधकौशिक: ॥१५॥
आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम्।
अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान् स न: प्रभु: ॥१६॥
तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनांबरौ ॥१७॥
फलमूलशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१८॥
शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्।
रक्ष:कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥१९॥
आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङि‌गनौ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥२०॥
संनद्ध: कवची खड्‌गी चापबाणधरो युवा।
गच्छन्‌ मनोरथोSस्माकं राम: पातु सलक्ष्मण:॥२१॥
रामो दाशरथि: शूरो लक्ष्मणानुचरो बली।
काकुत्स्थ: पुरुष: पूर्ण: कौसल्येयो रघूत्तम: ॥२२॥
वेदान्तवेद्यो यज्ञेश: पुराणपुरुषोत्तम:।
जानकीवल्लभ: श्रीमानप्रमेयपराक्रम: ॥२३॥ (Top Stories)
इत्येतानि जपेन्नित्यं मद्‌भक्त: श्रद्धयान्वित:।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशय: ॥२४॥
रामं दूर्वादलश्यामं पद्‌माक्षं पीतवाससम्।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नर: ॥२५॥
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं ।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्।
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शांतमूर्तिं ।
वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥२६॥
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम: ॥२७॥
श्रीराम राम रघुनंदन राम राम।
श्रीराम राम भरताग्रज राम राम।
श्रीराम राम रणकर्कश राम राम।
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥ (Top Marathi Headline)
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥
माता रामो मत्पिता रामचंद्र:।
स्वामी रामो मत्सखा रामचंद्र:।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं।
जाने नैव जाने न जाने ॥३०॥
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा।
पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम् ॥३१॥
लोकाभिरामं रणरङ्‌गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्। (Latest Marathi Headline)
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये ॥३२॥
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥३३॥
कूजंतं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥३४॥
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥

========

Dussehra : दसऱ्याच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्याने मिळतील भरपूर लाभ

Dussehra : दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते?

========
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम्। (Top Trending News)
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥३६॥
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम:।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्।
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥३७॥
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥३८॥
॥ इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम्॥
॥ श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु॥ (Social News)

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.