आज विजयदशमी अर्थात दसऱ्याचा सण. आजच्याच दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करत रामराज्याची स्थापना केली. तर देवी दुर्गाने आजच्या दिवशी महिषासुरावरचा वध केला होता. आजच्या दिवसाला अनेक अर्थाने मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याचा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रावणाचे दहन केले जाते. दसऱ्याचा दिवस खूप शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी दहाही दिशा मोकळ्या असतात. त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही नवीन काम, शुभ काम,पूजा किंवा उपाय व्यक्तीला अनेक पटींनी जास्त फळ देतात. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी जर आपण काही सोपे आणि छोटे उपाय केले तर त्याचा लाभ आपल्याला आपल्या जीवनात नक्कीच मिळतो. (Navratri 2025)
– दसऱ्याच्या दिवशी तुमच्या जवळच्या कोणत्याही मंदिरात जाऊन एक नवीन झाडू दान करा. झाडूला आपण देवी लक्ष्मीचे प्रतीक मानतो. त्यामुळे असे केल्याने व्यक्तीला पैशांची चणचण भासत नाही. जीवनात सुख आणि समृद्धी येते. तसेच, या उपायामुळे घराची आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागते.
– दसऱ्याच्या दिवशी कुबेर यंत्र अशाप्रकारे घरात नियमांनी स्थापित करा या एका उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील. कर्जातून तुमची मुक्तता होईल व आयुष्यात धनसंपत्ती आणि आर्थिक स्थैर्य येऊ लागेल. (Dussehra)
– दसऱ्याच्या दिवशी मोठ्यांनी मुलांच्या डोक्यावर किंवा कानावर हात ठेवावा. असे केल्याने मुलांना आरोग्यासंबंधी समस्या येत नाहीत. त्यांची प्रकृती उत्तम राहाते.
– दसऱ्याच्या दिवशी व्यवसाय आणि करिअरमध्ये यश आणि समृद्धी मिळविण्यासाठी शमीच्या झाडाची पूजा करा. तसेच दुर्गा देवीला शमीची पाने अर्पण करा. (Marathi News)
– दसऱ्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लिंबू आणि हिरव्या मिरच्यांचा हार लावण्याची जुनी परंपरा असल्याचे सांगितले जाते. असे मानले जाते की, यामुळे घरात वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. (Todays Marathi Headline)
– दसऱ्याच्या दिवशी पूजा करताना लक्ष्मीला अपराजिताची फुलं अर्पण करावी, यानंतर ही फुलं तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी, पैशाच्या पाकिटात ठेवा असे केल्याने आर्थिक सुबत्ता टिकून राहते. (Top Marathi Headline)
– दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांची आराधना करण्याचे विशेष महत्त्व आहे. सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर पूजा करताना सर्वप्रथम ‘राम नामाचा’ जप करावा. त्यानंतर लाल रंगाच्या पेनाने कमीतकमी १०८ वेळा ‘राम’ हे नाव लिहावे.
– दसऱ्याच्या दिवशी पिवळ्या कपड्यात नारळ गुंडाळून, मिठाई आणि पवित्र धागा राम मंदिरात दान केल्याने व्यवसायात फायदा होत असल्याचं मानलं जातं. असं केल्यास व्यवसाय दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वाढतो, असंही मानलं जातं. (Latest Marathi News)
=========
Dussehra : वाईटचे प्रतीक असणाऱ्या रावणामध्ये देखील होते ‘हे’ सद्गुण
– दसऱ्याच्या दिवशी शमीचं झाड लावल्यास किंवा संध्याकाळी शमीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनीची साडेसाती कमी होऊ शकते. (Top Trending News)
– दसऱ्याच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात एका भांड्यात अपराजिताची फुलं ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहील. घरगुती त्रासातूनही सुटका होईल. (Social News)
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics