Home » Dussehra : दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते?

Dussehra : दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dussehra
Share

उद्या सर्वत्र दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे. दसरा किंवा विजयादशमी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा दिवस, सण आहे. देवीने याच दिवशी महिषासुराचा वध करत त्याच्या त्रासातून या पृथ्वीची मुक्तता केली होती. दसरा हा साडे तीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त देखील आहे. या दिवशी अनेक शुभ कामांची सुरुवात केली जाते. मोठी खरेदी सुद्धा करतात. या दिवशी अपराजिता देवी पूजन शमी पूजन आणि रावण दहन केलं जाते. (Dussehra)

दसरा हा सण भारतात विविध पद्धतीने साजरा केला जातो. प्रत्येक प्रांताची हा सण साजरी करण्याची एक खास प्रथा असते. याच प्रथेतील एक महत्वाचा भाग म्हणजे शस्त्र पूजन. होय दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजनाला मोठे महत्व असते. पण दसऱ्याला शस्त्र पूजन का केले जातात? याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती असेल, तर आज आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

शस्त्र हे पराक्रमाचे, शौर्याचे प्रतीक असते. याच शस्त्राच्या जोरावर आपण स्वरक्षण करतो, देशाचे, समाजचे रक्षण करत असतो. वीरतेचं प्रतीक म्हणून शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र आजच्या काळात आपल्यासाठी शस्त्र म्हणजे तलवार, भाला आदी नाही तर आज आपण जे काही आपल्या कामासाठी वापरतो तेच आपले शस्त्र आहे. जसे की, आजच्या काळात वापरात असलेल्या वाहनांची, कामाच्या साधनांची, पुस्तके, वह्या, लॅपटॉप, कामाच्या फाईल्स आदी गोष्टींची पूजा केली जाते. या पूजेद्वारे आपण आपल्या रोजच्या कामांमधील शस्त्रे आणि त्यांच्या उपजीविकेच्या साधनांमध्ये दैवी शक्तीचा वास असतो, अशी भावना व्यक्त करतो. शस्त्र पूजन करून आपण एक प्रकारे या गोष्टींबद्दल कृतज्ञताच व्यक्त करत असतो. (Top Marathi News)

Dussehra

दसऱ्याच्या दिवशी रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामाने त्यांच्या शस्त्रांची पूजा केली होती असे म्हणतात. शिवाय आदिशक्तीच्या देखील महिषासुराशी युद्धाआधी शस्त्र पूजन केले होते. पूर्वीपासून शस्त्रे धैर्य आणि शौर्याचे प्रतीक मानली जातात. त्यामुळे या दिवशी शस्त्रपूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अगदी भारतीय सैन्याकडून देखील शस्त्रांची पूजा केली जाते. शस्त्र पूजा ज्याला आयुध पूजा असे म्हटले जाते. विजयादशमी किंवा दसऱ्याच्या दिवशी ही पूजा केली जाते. दक्षिण भारतात आणि इतर अनेक ठिकाणी, आयुध पूजाला “शास्त्र पूजा” किंवा “सरस्वती पूजा” असेही म्हणतात. (Latest Marathi Headline)

आयुध पूजेचे महत्त्व केवळ शस्त्रांपुरते मर्यादित नाही. या दिवशी शस्त्रांसोबतच व्यापारी त्यांच्या तराजू आणि खातेवहींची पूजा करतात, सैनिक त्यांच्या शस्त्रांची पूजा करतात. आपली साधने ही आपल्या उपजीविकेचे आणि यशाचे साधन आहेत आणि आपण त्यांचा आदर आणि संरक्षण केले पाहिजे. संगीत क्षेत्रात काम करणारे लोकं वाद्यांची पूजा करतात. कंपन्यांमध्ये काम करणारे लोकं मशीनची पूजा करतात. शेतकरी नांगर, कुदळ यांसारख्या शेतीच्या अवजारांची, कारागीर त्यांच्या हत्यारांची पूजा करतात. एकूणच काय तर आपल्या प्रगतीसाठी मदत करणाऱ्या साधनांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते. (Top Trending News)

=========

Dussehra : वाईटचे प्रतीक असणाऱ्या रावणामध्ये देखील होते ‘हे’ सद्गुण

Ramayana : रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर रामाची वानरसेना गेली कुठे?

=========

शस्त्रांची पूजा कशी करावी?
दसरा म्हणजे विजयादशमी गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी शस्त्रांची पूजा दुपारी २.०९ ते २.५६ या वेळेमध्ये तुम्ही शस्त्र आणि उपकरणांची पूजा करता येणार आहे. ही पूजा करण्यासाठी आधी सर्व शस्त्रे स्वच्छ करून घ्यावी. एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे कापड टाकून त्यावर एकाच ठिकाणी सर्व पूजनाच्या वस्त्या ठेवाव्या. त्यानंतर शस्त्रांवर गंगाजल शिंपडून हळद, कुंकू वाहावे. त्यावर कुंकवाचा टिका लावावा. त्यावर फुले, अक्षता अर्पण करून शस्त्रांची पूजा करावी. या दरम्यान, “शस्त्र देवता पूजनम, रक्षाकर्ता पूजनम” या मंत्राचा जप करावा. (Social News)

(टीपः ही माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहे. यासंबंधी कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.