अगदी तोंडावर दसऱ्याचा सण येऊन ठेपला आहे. सगळीकडे आता दसऱ्याच्या जोरदार तयारी चालू आहे. दसरा म्हणजे हिंदू धर्मातील पूर्ण आणि महत्वाचा दिवस. या दिवशी लहान मोठ्या खरेदीसह अनेक शुभ कामं केली जातात. दसऱ्याचा सण म्हणजे नुसता उत्साह आणि आनंद. नवरात्राचा शेवटच असल्याने या दिवशी घटाचे विसर्जन देखील केले जाते. दसरा हा संपूर्ण भारतामध्ये विविध पद्धतीने साजरा केला जातो. उत्तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या दिवशी रावण दहन केले जाते. यासोबतच दसऱ्याच्या महाराष्ट्रातील एक मुख्य परंपरा म्हणजे, आपट्याची पानं वाटणे. (Marathi News)
दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एकमेकांना आपट्याची पाने देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. या दिवशी आपट्याच्या पानांना सोने समजून ते दिले जाते. मात्र या झाडाच्या पानांचा उपयोग फक्त दसऱ्या पुरताच असतो असे नाही. या आपट्याच्या पानांचे नानाविध फायदे आहेत. आरोग्याच्या दृष्टीने आपट्याची पाने खूपच उत्तम आणि लाभदायक आहेत. आपट्याला संस्कृतमध्ये अश्मंतक म्हटले जाते. शिवाय हे झाड श्वेत कांचन आणि युग्मपत्र या नावाने देखील ओळखले जाते. (Dussehra)
हिंदीमध्ये कठमूली, सोनपत्ती तर कोंकणीत आप्टो अशी या झाडाची वेगवेळी नावं आहेत. या झाडावर अनेक कीटक, फुलपाखरं उपजीविका करतात त्यामुळं पर्यावरणीयदृष्ट्या हे झाड अतिशय महत्त्वाचं आहे. त्याशिवाय मानवासाठीही ते उपयुक्त झाड आहे. या झाडापासून डिंग, धागे, टॅनिन मिळतं. आपट्याच्या लाकडाचाही पूर्वी वापर होत असे तसंच पानांचा बिडी बनवण्यासाठीही वापर केला जातो. आपट्याच्या पानांचा आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदा आहे कोणता ते जाणून घेऊया. (Marathi News)
– आपट्याची पाने जिवाणू आणि बुरशीजन्य संसर्गाशी लढण्यास मदत करतात. या पानांच्या अर्कांमध्ये विविध जीवाणू आणि बुरशीजन्य संक्रमणांशी लढण्यासाठी प्रतिजैविक आणि अँटीऑक्सिडंट उपयुक्त घटक असतात. हे बॅसिलस सबटिलिसच्या वाढीस प्रतिबंध करता आणि कॅन्डिडा अल्बिकन्सशी लढा देते, म्हणूनच बुरशीजन्य संसर्गाच्या उपचारांमध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो. (Todays Marathi Headline)

– आपट्याची पाने मधुमेहाशी लढण्यास मदत करतात. रक्तातील ग्लुकोजची वाढलेली पातळी कमी करण्यासाठी या पानांचा उपयोग होतो. यातील काही घटक लिपिड पातळी सामान्य करण्याचे काम करते. त्यामुळे या पानांचा मधुमेहाशी संबंधित आजारांवर आणि लठ्ठपणावर उपचार म्हणून वापर केला जातो. (Marathi News)
– ताप आलेला असताताना आपले सर्व अंग दुखते. मात्र तुम्हाला जर जास्त प्रमाणात डोकेदुखी होत असेल तर आपट्याची पानं वापरा. यासाठी आपट्याची पानं कुटून त्याचा कल्क किंवा लेप तयार करा आणि तो डोक्यावर लावा. याने तुम्हाला डोकेदुखीमध्ये खूप आराम मिळेल. (Marathi Trending Headline)
– थायरॉईडच्या समस्येवरही आपट्याची पाने गुणकारी आहेत. सर्वप्रथम आपट्याची पाने स्वच्छ धुवून सुकवून ती मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. नंतर हे चूर्ण रोज मधासोबत सेवन करावे. त्यामुळं थायरॉईडची समस्या नियंत्रणात येईल. (Top Stories)
– बौहिनिया रेसमोसाची पाने त्यांच्या अँटीहिस्टामिनिक प्रभावामुळे पारंपारिकपणे दम्याच्या उपचारांमध्ये वापरली जातात. अस्था असलेल्या लोकांनी आपट्याच्या पानांचे ज्यूस प्यावे. (Marathi Latest Headline)
– उष्णतेमुळे तळपायाची आग होणे, सालपटे निघणे, तोंडाची आग होणे, तोंड येणे, तोंडाला सतत कोरड पडणे अशा समस्या उद्भवतात. अशावेळी उष्णता कमी करण्यासाठी आवश्यक असणारे घटक आपट्याच्या पानांत असतात. आपट्याच्या पानांचा रस प्यायल्यास या समस्या कमी होतात. (Top Marathi Headline)
– जुलाबाच्या समस्येमध्ये या पानांचा चांगला उपयोग होतो. तसेच बऱ्याच जणांना विविध कारणांनी पित्ताचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी आपट्याची पाने अतिशय फायदेशीर ठरतात. जंत, अजीर्ण यांसारख्या समस्यांवरही आपट्याच्या पानाचा रस उपयुक्त ठरतो. (Latest Marathi News)
=========
Dussehra : वाईटचे प्रतीक असणाऱ्या रावणामध्ये देखील होते ‘हे’ सद्गुण
Ramayana : रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर रामाची वानरसेना गेली कुठे?
=========
– लघवीच्या वेळी जळजळ होत असल्यास आपट्याची पाने पाण्यात चांगली ओली करून ती नीट वाटून घ्यावीत. जेवढा रस निघेल तेवढ्याच प्रमाणात दूध-साखर टाकावे. हा दिवसातून चार – पाच वेळा घेतल्याने जळजळ कमी होते. (Top Trending News)
– एखाद्या जागी वेदना होत असेल तर आपट्याचं एक पान घ्या आणि ते ओलं करून वेदना होत असलेल्या जागी लावा. त्यावर चिकटपट्टी लावून ते एक दिवस तसेच राहू द्या. यामुळे तुम्हाला वेदनेपासून अराम मिळेल. (Social News)
(टीप : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
