देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाची धूम आहे. देवीच्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी आहे. अशातच हरियाणामधील आयटीगाव म्हणून ओळख असलेल्या गुरुग्राममधील शीतला माता मंदिरातही मोठ्या संख्येनं भाविक येत आहेत. गुरुग्राममधील या शीतलामातेला इच्छापूर्ती देवी म्हणूनही पूजण्यात येते. कौरव आणि पांडवांना याच ठिकाणी गुरु द्रोणाचार्य यांनी प्रशिक्षण दिल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या आवारात अतिशय जने असे वडाचे झाड आहे. (Haryana)

या झाडाभोवती धागा बांधल्यानं आजार बरे होतात, अशी भाविकांची धरणा आहे. शीतला मातेचे दर्शन घेतल्यानं गोवर आणि अन्य आजारांपासून मुक्ति मिळते, असेही सांगितले जाते. या मंदिरात लहान मुलांना प्रथम दर्शनासाठी आणले जाते. अशानं देवी शीतलामाता मुलांचे कायम रक्षण करते, असे सांगितले जाते. या मंदिरात शीतला अष्टमीला आणि नवरात्रौत्सवात मोठा मेळा भरतो. मातृदेवता म्हणून पूजनीय असलेल्या या मंदिराला या दोन्ही उत्सवात मोठी सजावट करण्यात येते. आता हे शीतला माता मंदिर भारतभरातून आलेल्या भाविकांनी ओसंडून वाहत आहे. (Social News)
हरियाणाच्या गुरुगावमधील शीतला माता मंदिराचा इतिहास 500 वर्षांपूर्वीचा आहे. हे मंदिर मूळचे दिल्लीतील केशोपूर येथे होते. पण सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वी, शीतला माता गुरुग्राममधील सिंघा जाट नावाच्या माणसाच्या स्वप्नात आली आणि गुरुग्राममध्ये आता जिथे मंदिर आहे, तिथे मंदिर बांधण्याची सूचना केली. त्यानंतर, गुरुग्राम येथे शीतला मातेचे भव्य मंदिर बांधण्यात आले. असे मानले जाते की, माता येथे प्रत्यक्ष वास करते. शीतला माता मंदिराचा इतिहास महाभारत काळापासून आहे. तेव्हा या भागात गुरु द्रोणाचार्यांचा आश्रम होता. याच आश्रमात आचार्य द्रोणाचार्य यांनी येथे कौरव आणि पांडवांना प्रशिक्षण दिले. आता येथे शीतलामातेचे भव्य मंदिर असून या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते. स्कंद पुराणातही याबाबत उल्लेख आहे. विश्वाचे निर्माते ब्रह्मदेव यांनी शीतला मातेला विश्व निरोगी ठेवण्याची जबाबदारी सोपवली. असे मानले जाते की, शीतला मातेची पूजा केल्याने गोवर, चेचक आणि डोळ्यांच्या समस्यांपासून आराम मिळतो. त्यामुळेच या मंदिरात लहान मुलांना आणण्यात येते. (Haryana)

लहान मुले आणि त्यांचे पालक देवीची पूजा करतात. यामुळे त्यांना संभाव्य आजारापासून संरक्षण मिळाल्याचे सांगतात. शीतला माता मंदिर जिथे आहे, त्या सर्व परिसरात अनेक जातींचे लोक रहातात. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, जाट आणि गुर्जर यासह अनेक समुदायातील लोक या मंदिराच्या भोवताली रहातात. हे सर्व लोक शीतला मातेची कुलदेवता म्हणून पूजा करतात. या मंदिरात फक्त ग्रामीण भागातीलच भाविक येतात, असे नाही, तर शहरांतील नागरिक लग्न करण्यासाठी या मंदिरात येतात. शिवाय येथे मुलांचे मुंडण करुन त्यांच्याकडून देवीची आरती करुन घेतली जाते. या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक वडाचे झाड आहे. असे मानले जाते की, भक्त त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, या वडाच्या वृक्षाला जल अर्पण करून त्याला पवित्र धागा बांधतात. (Social News)
========
हे देखील वाचा :
Navratri : नवरात्रीमध्ये केल्या जाणाऱ्या कुंकुमार्जनाचे महत्व
=========
यामुळे मातेच्या चरणी भक्तांची प्रार्थना पोहचते, आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात, असे सांगितले जाते. या मंदिरात होळीनंतर सातव्या दिवशी येणारा शीतला सप्तमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या तिथीला येथे देशभरातून मातेचे भक्त येतात. तसेच आठव्या दिवशीही शीतला अष्टमी साजरी होते. आता येथे नवरात्र साजरी होत आहे. मंदिराच्या पुजा-यांनी यासंदर्भात सांगितले की, या काळात येथे लाखांहून अधिक भाविक येतात. या सर्व भक्तांसाठी प्रशासनातर्फे चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोठे पांडाल उभारण्यात आले आहेत. शिवाय भाविकांसाठी मोफत जेवणाची आणि आरामाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या शीतलादेवी मंदिरात फुले आणि दिव्यांनीसजावट करण्यात आली आहे. मंदिरात नवरात्रौत्सवानिमित अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सुरु आहे. तसेच अष्टमीला मोठा होम करण्यात येणार आहे. (Haryana)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
