आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुंकवाला अनन्यसाधारण महत्व आहे. कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं असते. कुंकुवाशिवाय प्रत्येक स्त्रीचा शृंगार हा अपूर्ण असतो. भारताच्या कोणत्याही राज्यात जा कुंकवाला असलेले महत्व कधीच कमी होत नाही. असे हे कुंकू सौभाग्यासोबतच देवीचे देखील प्रतीक आहे. कुंकवाशिवाय देवीचा साज कधीही पूर्ण होत नाही. आपण कायम मंदिरात गेल्यानंतर देवीला हळद कुंकू वाहतो. असे हे कुंकू देवीला वाहण्यासोबतच कुंकवाचा अजून एक संस्कार केला जातो, ज्याला ‘कुंकुमार्जन’ असे म्हटले जाते. कुंकुमार्चन हा कुलदेवीची आराधना करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. या पवित्र क्रियेद्वारे भक्त आपल्या विविध इच्छा व्यक्त करतात आणि देवीचे आशीर्वाद मागितले जातात. मग या कुंकुमार्चनाचे महत्त्व काय?, हे करण्याची पद्धत आणि कुंकुमार्जनाचे फायदे कोणते? चला जाणून घेऊया. (Marathi News)
तर कुंकुमार्जन अतिशय सोपी, साधी आणि जाज्वल्य अशी प्रक्रिया आहे. यात आपल्याला फक्त देवीला कुंकू वाहायचे असते. अर्थात देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. नवरात्रीत विशेषतः ललिता पंचमी, अष्टमीला किंवा नवमीला हा विधी आवर्जून केला जातो. घरोघरी कार्यसिद्धीसाठी गृहशांतीसाठी कुंकुमार्चन केले जाते. चिमूटभर कुंकू देवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर तिच्या पायापासून डोक्यापर्यंत १०८ वेळेस वाहिले जाते. महिलांच्या अखंड सौभाग्यासाठी कुंकुमार्चन सोहळा केला जातो अशी मान्यता आहे. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते आणि या मूर्तीतील शक्तीची तत्व कुंकवात येतात. नवरात्रौत्सवात कुंकुमार्चन पुण्यकारक आणि लाभदायक असते. (Navratri 2025)
कुंकुमार्चन मंत्र
या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेण संस्थिता,
नमः तस्यै, नमः तस्यै, नमः तस्यै, नमो नमः
यासोबतच कुंकुमार्जन करताना ललितसहस्त्रनाम, श्रीसूक्त, देवी स्तुती, देवी सहस्त्र नामावली, देवी अष्टओतर शत नामावलींचे उच्चारण करून देखील कुंकुमार्चन केले जाते. (Todays Marathi Headline)

कुंकुमार्जन करण्याची पद्धत
– ताह्मणामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक मूर्ती घेऊन त्यावर पळीने पाणी घालून ती मूर्ती शुद्ध करून घ्यावी.
– कुंकुमार्चनासाठी तांबे, पितळ किंवा चांदीचे ताम्हण घ्यावे. त्यात देवीची मूर्ती ठेवावी. अन्नपूर्णा माता, दुर्गादेवी किंवा महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती घ्यावी. तुम्ही श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तु म्हणून सुपारी, ताम्रपट, सुवर्णपट पात्रात घेऊन त्याला शुचीर्भूत करुन घेवू शकता.
– देवी स्वच्छ कोरडी करून घ्यावी. देवीचे आवाहन करून तिचे पूजन करावे. देवीला लाल रंगाचे फूल वहावे. धूपदिप लावावा.
– देवीचे नाम जपत चिमूटभर कुंकू वाहावे. कुंकू वाहुन झाल्यावर देवीची आरती करावी.
– देवीच्या नावाचा जप, देवी स्तुती, स्तोत्र आदी म्हणत मृगी मुद्रेने अर्थात उजव्या हाताचा अंगठा, मधले बोट आणि अनामिका या बोटांनी देवीला खालून वर पायापासून ते डोक्यापर्यंत कुंकू वाहावे. (Marathi Headline)
– नंतर मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे.
– वाहिलेले कुंकू एका डबीत भरून ठेवून दररोज कपाळावर लावावे.
– कुंकुमार्चन करताना कुंकुवाला जाळी लागलेली असू नये
– कुंकुमार्चनानंतर ते कुंकू रोज स्वतःच्या कपाळी लावावे
– कुंकुमार्चन ही एक पवित्र क्रिया आहे जी भक्तीभावाने आणि श्रद्धेने केली जाते. यामुळे मनाला शांती मिळते आणि देवीच्या कृपेने इच्छापूर्ती होते असे मानले जाते.
– कुंकुमार्जन केलेले कुंकू पुन्हा देव पूजेत अजिबात वापरु नये ते रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरणे चांगले असते.
– कुंकवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे असे सांगितले जाते.
– अमावस्येला कुंकुमार्चन करु नये. (Marathi Trending News)
कुंकुमार्जन कधी करावे?
साधारणपणे कुंकुमार्जनाचा विधी हा अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन तसेच मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरु पुष्यामृत योग या दिवशी केलेले चांगले असते. याशिवाय तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार असेल त्यादिवशी देखील कुंकुमार्जन केल्यास लाभ होतात. शारदीय नवरात्रीत अश्विनी शुक्ल अष्टमी तिथीला कुंकुमार्चन विधी करण्यात येणार आहे. अष्टमी तिथी मंगळवार ३० सप्टेंबर रोजी आहे. आश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्या पूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावं असे केल्यास ते खूप पुण्यकारक आणि शुभफलदायी आहे. काही घरांमध्ये नवरात्रीच्या काळात नऊ दिवस कुंकुमार्जन केले जाते. (Top Trending Headline)

कुंकुमार्चन देवीची 108 नामावली
ॐ प्रकृत्यै नमः
ॐ विकृत्यै नमः (Top Marathi Headline)
ॐ विद्यायै नमः
ॐ सर्वभूतहितप्रदायै नमः
ॐ श्रद्धायै नमः
ॐ विभुत्यै नमः
ॐ सुरभ्यै नमः
ॐ परमात्मिकायै नमः
ॐ वाचे नमः
ॐ पद्मालययै नमः
ॐ पद्मायै नमः
ॐ शुच्यै नमः
ॐ स्वाहायै नमः
ॐ स्वधायै नमः
ॐ सुधायै नमः
ॐ धन्यायै नमः
ॐ हिरण्मयै नमः
ॐ लक्ष्मीयै नमः
ॐ नित्यपुष्टायै नमः
ॐ विभावर्ये नमः
ॐ आदित्यै नमः
ॐ दित्यै नमः
ॐ दिप्तायै नमः
ॐ वसुधायै नमः
ॐ वसुधारिण्यै नमः
ॐ कमलायै नमः
ॐ कांतायै नमः
ॐ कामाक्ष्यै नमः
ॐ क्रोधसंभवायै नमः
ॐ अनुग्रहपरायै नमः
ॐ ऋद्धाये नमः
ॐ अनघायै नमः
ॐ हरीवल्लभायै नमः
ॐ अशोकायै नमः
ॐ अमृतायै नमः
ॐ दीप्तायै नमः
ॐ लोकशोक विनाशिन्यै नमः
ॐ धर्मनिलयायै नमः
ॐ करुणायै नमः
ॐ लोकमात्रे नमः
ॐ पद्मप्रियायै नमः
ॐ पद्महस्तायै नमः
ॐ पद्माक्ष्यै नमः
ॐ पद्मसुंदर्यै नमः
ॐ पद्मोद्भवायै नमः
ॐ पद्ममुख्यै नमः
ॐ पद्मनाभाप्रियायै नमः
ॐ रमायै नमः
ॐ पद्ममालाधरायै नमः
ॐ देव्यै नमः
ॐ पद्मिन्यै नमः
ॐ पद्मगंथीन्यै नमः
ॐ पुण्यगंधायै नमः
ॐ सुप्रसन्नायै नमः
ॐ प्रसादाभिमुख्यै नमः
ॐ प्रभायै नमः
ॐ चंद्रवदनयै नमः
ॐ चंद्रायै नमः
ॐ चंद्रसहोदर्यै नमः
ॐ चतुर्भुजायै नमः
ॐ चंद्ररूपायै नमः
ॐ इंदिरायै नमः
ॐ इंदूशीतुलायै नमः
ॐ आल्होदजनन्यै नमः
ॐ पुष्ट्यै नमः
ॐ शिवायै नमः
ॐ शिवकर्यै नमः
ॐ सत्यै नमः (Top Stories)
ॐ विमलायै नमः
ॐ विश्वजनन्यै नमः
ॐ तूष्ट्यै नमः
ॐ दारिद्र्य नाशिन्यै नमः
ॐ प्रीतिपुष्करिण्यै नमः
ॐ शांतायै नमः
ॐ शुक्लमाल्यांबरायै नमः
ॐ श्रियै नमः
ॐ भास्कर्यै नमः
ॐ बिल्वनिलयायै नमः
ॐ वरारोहायै नमः
ॐ यशस्विन्यै नमः
ॐ वसुंधरायै नमः
ॐ उदारांगायै नमः
ॐ हरिण्यै नमः
ॐ हेममालिन्यै नमः
ॐ धनधान्यकर्यै नमः
ॐ सिद्धये नमः
ॐ स्त्रेण सौम्यायै नमः
ॐ शुभप्रदायै नमः
ॐ नृपवेश्म गतानंदायै नमः (Latest Marathi News)
ॐ वरलक्ष्मै नमः
ॐ वसुप्रदायै नमः
ॐ शुभायै नमः
ॐ हिरण्यप्राकारायै नमः
ॐ समुद्र तनयायै नमः
ॐ जयायै नमः
ॐ मंगलायै नमः
========
Navratri : दुर्गा सप्तशतीचे पाठ कधी आणि कसे करावे?
Navratri : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केल्या जाणाऱ्या ललिता पंचमीच्या व्रताची माहिती
========
ॐ देव्यै नमः (Top Trending News)
ॐ विष्णू वक्ष:स्थल स्थितायै नमः
ॐ विष्णूपत्नेयै नमः
ॐ प्रसन्नाक्ष्यै नमः
ॐ नारायण समाश्रितायै नमः
ॐ दारिद्र्य ध्वंसिन्यै नमः
ॐ सर्वोपद्रव वारिण्यै नमः
ॐ नवदुर्गायै नमः
ॐ महाकाल्यै नमः
ॐ ब्रम्हा विष्णू शिवात्मिकायै नमः
ॐ त्रिकाल ज्ञान संपंन्नायै नमः
ॐ भुवनेश्वर्यै नमः (Social News)
(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
