२१ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी जीएसटीच्या नव्या कर रचनेबाबत माहिती दिली. पंतप्रधान देशाला संबोधित करणार ही बातमी आल्यानंतर सगळीकडे एकच चर्च होती की आता मोदी काय सांगणार? कोणती नवीन घोषणा करणार? मोदींच्या संबोधनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अखेर मोदीजींनी आजपासून लागू होणाऱ्या जीएसटीच्या नव्या कर रचनेबाबत माहिती दिली. देशात आता अनेक जीवनाश्यक वस्तूंवर कर लागणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच इतर अनेक वस्तूंवर आता केवळ ५ आणि १८ टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळे मोदींनी देशातील नागरिकांचे अभिनंदन सुद्धा केले. यासोबतच नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या मोहीमेबाबत नागरिकांना अतिशय उत्तम आणि मुद्देसूद माहिती दिली. (GST News)
आता जीएसटीमध्ये केवळ ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टॅक्स स्लॅब असतील. यामुळे, खाण्या-पिण्याच्या वस्तू, औषधे आणि इतर अनेक वस्तू स्वस्त होतील किंवा त्यांच्यावर फक्त ५ टक्के कर लागेल.पंतप्रधान मोदींनी सांगितले की, जीएसटीच्या या नवीन रचनेमुळे जवळपास ९९ टक्के वस्तू आता ५ टक्के कराच्या कक्षेत आल्या असल्याने आता सामान्य नागरिकांची मोठी बचत होणार आहे. (Marathi)
दरम्यान २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर देशात कर सुधारणांचा एक नवा अध्याय सुरू झाला होता. पंतप्रधान मोदींनी जीएसटीला स्वतंत्र भारताची सर्वात मोठी कर सुधारणा म्हटले होते. ही सुधारणा सर्व घटकांना सोबत घेऊन करण्यात आली असून, ती देशाच्या विकासगाथेला आणखी गती देईल. (Narendra Modi Marathi News)
केंद्र सरकारने आजपासून जीएसटी दरामध्ये सुधारणा लागू केली आहे. त्याचा फायदा देशातील मध्यमवर्गाला सर्वात जास्त होणार आहे. सणासुदीच्या तोंडावर खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढणार असून अर्थव्यवस्थेला देखील नवीन बूस्टर मिळणार आहे. जीएसटीमुळे दैनंदिन वापरातील जवळपास सर्वच वस्तू स्वस्त झाल्या आहे. पॅकेज फूडपासून खाद्यतेल, घरगुती स्वच्छता उप्त्पादनांपर्यंत सर्वच गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. एवढेच नाही तर चार्जर, इअरफोन, यूएसबी केबल्स, अॅपवर आधारीत असलेल्या ऑटो आणि टॅक्सी राइड्सही स्वस्त झाल्या आहेत. (PM Modi)

जिथे जीएसटी कमी झाल्यामुळे वस्तू स्वस्त झाल्या असल्या तरी दुसरीकडे काही वस्तू महाग देखील झाल्या आहेत. जीएसटीमध्ये रेस्टॉरंटमधील जेवण महाग झाले आहे. खासकरून एसी आणि प्रीमियम हॉटेल्समधील जेवण महाग झालं आहे. याशिवाय सलून, स्पा, प्रीमियम फोन, स्मार्टफोन्य आयातीच्या किंमतीही वाढणार आहे. तसेच १२०० सीसीवरील वाहने सुद्धा महाग झाली आहेत. जीएसटी कमी झाल्यानंतर टीव्ही कंपन्या २५०० ते ८५००० रुपयांपर्यंत किंमत कपात करत आहेत. ३२ इंचांपेक्षा मोठ्या स्क्रीन असलेल्या टीव्हींवरील करदर २८% वरून १८ टक्क्यांवर आला आहे. वास्तूंवर नवीन जीएसटी दर खालीलप्रमाणे असतील. (Marathi News)
दैनंदिन वापरातील वस्तू
पाणी आणि दुधाचे डबे (धातू): १२% वरून ५%
एसी, डिशवॉशर, टीव्ही: २८% वरून १८%
हेअर ऑइल, शॅम्पू, टूथपेस्ट, शेविंग उत्पादने: १८% वरून ५%
टॉयलेट सोप, टूथब्रश: १८% वरून ५%
मेणबत्त्या, छत्र्या: १२% वरून ५%
बांबू आणि वेतापासून बनवलेले फर्निचर: १२% वरून ५% (Todays Marathi Headline)
अन्नपदार्थ आणि खाद्यवस्तू
वनस्पती तेल: १२% वरून ५%
लोणी-तूप: १२% वरून ५%
साखर, उकडलेल्या मिठाई: १२% ते १८% वरून ५%
चॉकलेट, कोको पावडर: १८% वरून ५%
पास्ता, नूडल्स, बिस्किटे: १२%-१८% वरून ५%
जॅम, जेली, मुरंबा, फळांचा रस: १२% वरून ५%
मांस, मासे, फूड प्रॉडक्ट्स: १२% वरून ५% (Top Marathi Headline)
वाहन आणि वस्त्रोद्योग
मोटार वाहने, टायर : २८% वरून १८%
सायकल: १२% वरून ५%
सिंथेटिक धागे, न शिवलेले कापड: १२%-१८% वरून ५%
२५०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे कपडे: १२% वरून ५%
२५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कपडे: १२% वरून १८% (Latest Marathi News)
शेती आणि आरोग्य उत्पादने
ट्रॅक्टर, कृषी यंत्रसामग्री: १२% वरून ५%
बायो-कीटकनाशके: १२% वरून ५%
थर्मामीटर, डायग्नोस्टिक किट: १२%-१८% वरून ५%
ग्लुकोमीटर, मेडिकल ऑक्सिजन: १२% वरून ५%
चष्मा, औषधे आणि सर्जिकल हातमोजे: १२% वरून ५% किंवा शून्य (Top Trending News)
=========
Baba Vanga : अरे देवा….2026 आणखी भयानक !
=========
मोदीजींनी देशाला संबोधित करताना स्वदेशीच्या वापराबद्दल सांगितले की, “जर देशाला समृद्ध करायचे असेल तर प्रत्येक घर आणि दुकान हे स्वदेशी वस्तूंनी भरलेले पाहिजे. स्वदेशी वस्तूंच्या उत्पादनासाठी राज्यांनी सुद्धा प्रोत्साहन दिले पाहिजे. आपल्या देशातील लोकांनी अशी उत्पादने खरेदी करावीत ज्यात आपल्या देशवासीयांचे कष्ट आणि हित आहे. जर राज्य आणि केंद्र सरकारांनी स्वदेशी उत्पादनांवर भर देण्यासाठी एकत्र काम केले तर ही परिस्थिती नक्कीच बदलू शकते. ही स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची वेळ आहे. देशाला लघु आणि मध्यम उद्योगांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आपले लघु उद्योग जे काही उत्पादन करतात ते जगातील सर्वोत्तम असले पाहिजे.” (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
