कालपासून शारदेय नवरात्राला सुरुवात झाली आहे. आज २३ सप्टेंबर रोजी नवरात्राचा दुसरा दिवस. नवरात्रीच्या या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या नऊ वेगवेगळ्या रुपांना समर्पित केल्या जाते. आज नवरात्राची दुसरी माळ असून नवदुर्गेचे द्वितीय स्वरुप ब्रम्हाचारिणी देवीला समर्पित आहे. तसेच आजचा रंग लाल आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी स्त्री म्हणून जे तिची पूजा करतात त्यांना साधक होण्याचे फळ मिळते. ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. जाणून घेऊया त्यांची कथा आणि देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी याबद्दल. (Marathi)
ब्रह्मचारिणी देवीचे स्वरुप
नवरात्राची दुसरी माळ दुर्गा देवीचे द्वितीय स्वरुप ‘ब्रह्मचारिणी’ देवीला समर्पित आहे. येथे ‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ ‘तपस्या’ आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी देवी. “वेदस्तत्वं तपो ब्रम्ह” म्हणजे वेद, तत्व आणि ताप हे ब्रम्ह शब्दाचे अर्थ आहेत. नवरात्राच्या दुसर्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला सिद्धीची प्राप्ती होते. हजारो वर्षं अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला ब्रह्मचारिणी असे नाव मिळाले. देवीने कठोर तपाने शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशिर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते असं म्हणतात. ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मयी आणि अत्यंत भव्य असून, देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि हातामध्ये कमंडलू आहे. मुखमंडल तेजोमय असून, हस्तबंध आणि बाजुबंध कमळपुष्पांनी सुशोभित आहेत. (Marathi News)
ब्रह्मचारिणी देवीचे पूजन, मंत्र
सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे षोडशोपचार पूजन करावे. ब्रह्मचारिणी देवीला दूध किंवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, असे म्हटले जाते. तसेच पूजनानंतर यथाशक्ती, यथासंभव देवीच्या मंत्राचा जप करावा, असे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र पुढीलप्रमाणे –
या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
दधाना कर मद्माभ्याम अक्षमाला कमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।। (Navratri 2025)

=========
Navratri : जाणून घ्या घटस्थापनेत धान्य पेरण्याचे महत्व
=========
देवी ब्रह्मचारिणी मंत्र
दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलु| देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ||
वन्दे वांछित लाभायचन्द्रार्घकृतशेखराम्।
जपमालाकमण्डलु धराब्रह्मचारिणी शुभाम्॥
गौरवर्णा स्वाधिष्ठानस्थिता द्वितीय दुर्गा त्रिनेत्राम।
धवल परिधाना ब्रह्मरूपा पुष्पालंकार भूषिताम्॥
परम वंदना पल्लवराधरां कांत कपोला पीन।
पयोधराम् कमनीया लावणयं स्मेरमुखी निम्ननाभि नितम्बनीम्॥ (Todays Marathi Headline)
ब्रम्हचारिणी मातेला शुभ्र अर्थात पांढरा रंग अतिप्रिय आहे. हा रंग चंद्रालाही प्रिय आहे. माता ब्रम्हचारिणी आणि चंद्र हे दोन्ही मनाला शांती प्रदान करतात. त्यामुळेच पांढरा रंग शांती, मांगल्य, स्वच्छता, पवित्रतेचा, निरागसतेचा निदर्शक आहे. सेवाभावी वृत्ती आणि समाजकार्याची आवड. संघर्ष टाळणे, सुंसवाद साधणे हे याचे द्योतक आहे. सफेद रंगाला प्रथम पसंती देणाऱ्या व्यक्ती सकारात्मक असतात. त्यांचा स्वभाव मोकळेपणाच असतो. या व्यक्ती इतरांना समजून घेतात. कालचा दिवस विसरून रोज नव्या उमेदीने संसाराचा गाडा ओढणाऱ्या स्त्रीयांचा हा आवडता रंग. (Top Marathi Headline)
ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने अनंत फळांची प्राप्ती होते आणि तप, त्याग, वैराग्य, सद्गुण, संयम यांसारख्या सद्गुणांमध्ये वाढ होते.जीवनातील कठीण संघर्षातही माणूस आपल्या कर्तव्यापासून विचलित होत नाही. ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने व्यक्तीला त्याच्या कार्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते. वासनेपासून मुक्तीसाठी ब्रह्मचारिणी मातेचे ध्यान करण्याचा सल्ला शास्त्रात दिला आहे. (Latest Marathi Headline)
देवी ब्रह्मचारिणीच्या पूजेचे महत्त्व
जी व्यक्ती देवी ब्रह्मचारिणीची उपासना करते, त्याला आपल्या ध्येयात यश मिळतं अशी मान्यता आहे. कारण देवी ब्रह्मचारिणीने तिच्या तप आणि साधनेने भगवान शंकराला प्रसन्न करून आपल्या उद्दिष्टात यश मिळवलं होतं. (Todays Trending News)
देवी ब्रह्मचारिणी कथा
आपल्या पूर्व जन्मामध्ये ज्यावेळी ही देवी हिमालयाच्या घरी पुत्री रूपामध्ये जन्मास आली त्यावेळी महर्षी नारदाच्या उपदेशान्वये तिने भगवान भोलेनाथांना पती स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या केली. या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात. तिने फळे खाऊन तपश्चर्या केली. उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता. या तपश्चर्येनंतर अनेक वर्षे केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले. (Top Marathi News)

यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला ‘अपर्णा’ हे एक नाव पडले. अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दु:खी झाली होती. तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी ‘उमा’ अगं! नको ग नको! अशी हाक दिली. तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीला ‘उमा’ हे नाव पडले. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हा:हा:कार उडाला. (Latest Marathi Headline)
सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले, की ‘हे देवी! आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही. तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील.’ असा वर त्यांनी दिला. (Top Trending News)
ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. आजच्या काळात तपाचा अर्थ कठोर मेहनत असाही होवू शकतो. रोजचं जीवन जगताना कठोर मेहनत आणि प्रसंगी संयम खूप महत्त्वाचा आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या माळेची पुजा करताना ब्रह्मचारिणीचे सर्व गुण आपल्यात येवो हीच त्या आदिमायेकडे प्रार्थना ! (Social News)
========
Navratri : पहिली माळ : नवदुर्गेचे प्रथम स्वरुप- शैलपुत्री देवी
Navratri : ‘या’ मंदिरात देवीला प्रसन्न करण्यासाठी चक्क दिल्या जातात शिव्या
========
ब्रह्मचारिणी देवीची आरती
जय अंबे ब्रह्माचारिणी माता।
जय चतुरानन प्रिय सुख दाता।
ब्रह्मा जी के मन भाती हो।
ज्ञान सभी को सिखलाती हो।
ब्रह्मा मंत्र है जाप तुम्हारा।
जिसको जपे सकल संसारा।
जय गायत्री वेद की माता।
जो मन निस दिन तुम्हें ध्याता।
कमी कोई रहने न पाए।
कोई भी दुख सहने न पाए।
उसकी विरति रहे ठिकाने।
जो तेरी महिमा को जाने।
रुद्राक्ष की माला ले कर।
जपे जो मंत्र श्रद्धा दे कर।
आलस छोड़ करे गुणगाना।
मां तुम उसको सुख पहुंचाना।
ब्रह्माचारिणी तेरो नाम।
पूर्ण करो सब मेरे काम।
भक्त तेरे चरणों का पुजारी।
रखना लाज मेरी महतारी।
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
