Home » Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mohanlal
Share

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना जाहीर झाला आहे. अतिशय मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार मोहनलाल यांना जाहीर झाल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होताना दिसत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अधिकृतरीत्या ही घोषणा केली. २०२३ साठीचा हा पुरस्कार त्यांना २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. (Marathi)

मनोरंजनविश्वातील अतिशय मोठा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून दादासाहेब फाळके पुरस्काराची ओळख आहे. हा पुरस्कार सिनेसृष्टीतील पुरस्कारांपैकी सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारतर्फे दरवर्षी चित्रपटांमध्ये महत्वपुर्ण कामगिरी करणाऱ्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. दक्षिणेतील दिग्गज अभिनेते मोहनलाल यांनी ४०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांची दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीने शिफारस केली होती. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. (Movies world)

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक्सवर या घोषणेसंदर्भात शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार, भारत सरकारकडून आनंदाने जाहीर करण्यात येत आहे की, श्री. मोहनलाल यांना २०२३ चा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला जाईल. मोहनलाल यांच्या उल्लेखनीय चित्रपट प्रवासाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रतिष्ठित योगदानाबद्दल महान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्याचा हा सन्मान करण्यात येईल. त्यांची अतुलनीय आणि अष्टपैलू प्रतिभा आणि अथक परिश्रमाने भारतीय चित्रपट इतिहासात एक सुवर्णमानक स्थापित केले आहे.’ (Bollywood Life)

Mohanlal

मोहनलाल हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील अतिशय मोठे आणि प्रतिष्ठित नाव. ते जरी दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असले तरी त्यांची फॅन फॉलोविंग जगभर आहे. त्यांच्या चित्रपटांचे चाहते हे जगभर पसरलेले आहेत. मोहनलाल यांनी संघर्षाने आणि अनेक चढ उतारांवर मात करत आपला नावलौकिक मिळवला. आजवर त्यांनी अनेक लहान मोठे पुरस्कार कमावले मात्र जेव्हा त्यांना भारताचा अतिशय मोठा पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा पंतप्रधान मोदींपासून सर्वच कलाकार, नेते मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. (Entertainment News)

=========

51 Shakti Peethas : देवीच्या शक्तिपीठांचा महिमा !

=========

मोहनलाल विश्वनाथन यांचा जन्म २१ मे १९६० रोजी केरळमधील एलांथूर गावात झाला. त्यांचे वडील हे, केरळ सरकारचे माजी नोकरशहा आणि कायदा सचिव विश्वनाथन नायर आणि आई संथाकुमारी होते. मोहनलाल तिरुअनंतपुरममधील त्यांच्या वडिलोपार्जित मुदावनमुगल येथे लहानाचे मोठे झाले. त्यांनी शासकीय मॉडेल बॉईज हायर सेकंडरी स्कूल, तिरुवनंतपुरम येथे शिक्षण घेतले आणि तिरुवनंतपुरमच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली. मोहनलाल यांना लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. (Marathi)

त्यामुळेच मोहनलाल यांनी शाळेतील नाटकांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. जेव्हा ते सहाव्या इयत्तेत होते तेव्हा त्यांनी कॉम्प्युटर बॉय नावाच्या एका प्लेमध्ये काम केले होते ज्यात त्यांनी त्यांच्या वयाच्या कितीतरी पट मोठ्या अशा नव्वद वर्षाच्या माणसाची भूमिका लीलया साकारली होती. एक अभिनेते असण्यासोबतच मोहनलाल हे कुस्तीपटूही होते. १९७७ ते १९७८ दरम्यान ते केरळ राज्य कुस्ती चॅम्पियन होते. चित्रपटांच्या आवडीमुळे, त्यांनी त्यांचे कुस्तीतले करियर केले सोडले आणि वयाच्या केवळ १८ व्या वर्षी चित्रपटांमध्ये प्रवेश केला. मोहनलाल यांनी १९७८ मध्ये पहिल्यांदा ‘थिरनोत्तम’ चित्रपटात काम केले होते. (Marathi News)

Mohanlal

थिरनोत्तम या चित्रपटात मोहनलाल यांनी मतिमंद नोकर कुट्टप्पनची भूमिका साकारली होती, मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनात अनेक अडचणी आल्या. सेन्सॉरशिपच्या अडचणींमुळे हा चित्रपट तब्बल २५ वर्षे अडकला आणि त्यांनतर तो प्रदर्शित झाला. यामुळे मोहनलाल खूपच निराश झाले होते, पण नंतर त्यांना ‘मंजिल विरांजा पोक्का’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती ज्यात त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाच्या यशानंतर मोहनलाल यांनी जवळपास २५ चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या. ‘संध्याक्कू विरंजा पूवू’ आणि ‘कुयलीन थेडी’ या चित्रपटांमधील त्यांच्या नकारात्मक भूमिकांचे खूप कौतुक झाले. (Latest Marathi Headline)

१९८४ च्या सुमारास मोहनलाल यांनी हलक्याफुलक्या भूमिका करण्याचा निर्णय घेतला. याचे कारण म्हणजे त्यांना त्यांच्या खलनायकाच्या प्रतिमेतून बाहेर पडायचे होते. या काळात त्यांना सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रियदर्शन यांनी मदत केली. सुरुवातीपासूनच प्रियदर्शन हे हलके फुलके कॉमेडी सिनेमे बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘पूचाक्कोरू मुक्कुथी’ या चित्रपटात मोहनलाल यांनी मुख्य भूमिका साकारली, जी कमालीची गाजली. या चित्रपटानंतर मोहनलाल आणि प्रियदर्शन यांचे बॉन्डिंग चांगलेच झाले आणि त्यानंतर या दोघांच्या जोडीने तब्बल ४४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. (Todays Marathi Headline)

१९८६ च्या सुमारास मोहनलाल त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या शिखरावर होते. एवढेच नाहीतर दर १५ दिवसांनी त्यांचा एक चित्रपट प्रदर्शित होत होता. १९८६ मध्ये तर केवळ एकाच वर्षात त्यांचे तब्बल ३४ चित्रपट प्रदर्शित झाले, हा एक विक्रम आहे. आजपर्यंत एकाही अभिनेत्याचे एका वर्षात इतके चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत. विशेष म्हणजे या ३४ चित्रपटांपैकी २५ चित्रपट हिट ठरले. त्या काळात मोहनलालचे दरवर्षी सरासरी २० चित्रपट प्रदर्शित झाले. यामुळेच त्यांच्या चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांच्या चित्रपटांची संख्या ४०० च्या पुढे गेली आहे. (Marathi Top News)

८० ते ९० च्या दशकात मोहनलाल यांचे स्टारडम शिखरावर होते. सर्वच त्यांचे फॅन्स होते. खासकरून मुली त्यांच्यासाठी वेड्या होत्या. सुचित्रा नावाची एक चाहती देखील मोहनलाल यांचे चित्रपट पाहून वेडी झाली होती. अथक प्रयत्नांनंतर ती मोहनलाल यांना भेटू शकली. सुरुवातीला मोहनलाल तिला एका सामान्य चाहत्याप्रमाणे वागवत, पण दोन-तीन भेटीनंतर ते सुचित्राबाबत गंभीर झाले. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सुचित्राला त्यांच्याशी लग्न करायचे होते, पण घरच्यांची भीती होती. एके दिवशी सुचित्राच्या काकू मोहनलालच्या वडिलांना भेटल्या आणि त्यांच्या लग्नाबद्दल बोलल्या. दोघांच्याही कुटुंबीयांना या नात्याबाबत कोणतीही अडचण नव्हती, पण पत्रिका जुळल्यानंतरच त्यांनी लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती. दोघांच्या पत्रिका जुळल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी या लग्नाला नकार देत संबंध तोडले. (Marathi Treding News)

Mohanlal

मोहनलाल हे नाते विसरून पुढे सरसावले, पण सुचित्राला ते मान्य नव्हते. तिने दोन वर्षे मोहनलाल यांची वाट पाहिली आणि एक दिवस मोहनलाल कोणत्याही पत्रिकेच्या भागडीत न अडकता तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले. २८ एप्रिल १९८८ रोजी त्यांचे लग्न झाले. आता ते एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन मुलांचे पालक आहेत. (Top Marathi Headline)

एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच मोहनलाल एक निर्माता, वितरक, सूत्रसंचालक आणि पार्श्वगायक सुद्धा आहेत. त्यांनी मल्याळम सिनेविश्वात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. चित्रपट निर्मिती आणि वितरणाव्यतिरिक्त मोहनलाल यांचा रेस्टॉरंट आणि मसाला पॅकेजिंगचा व्यवसाय आहे. यासोबतच ते मॅक्सलॅब सिनेमा आणि एंटरटेनमेंट या चित्रपट वितरण कंपनीचे मालक आहेत. त्यांनी त्रिवेंद्रममध्ये ‘विस्मया मॅक्स’ नावाचा फिल्म पोस्ट-प्रॉडक्शन स्टुडिओही सुरू केला आहे. (Latest Marathi News)

मोहनलाल लक्झरी लाईफचे शौकीन. उटी येथे घरासोबतच दुबईतील बुर्ज खलिफा येथेही त्यांचा फ्लॅट आहे. या इमारतीच्या २९व्या मजल्यावर त्यांचे घर आहे. इतकंच नाही तर दुबईमध्ये ‘मोहनलाल टेस्टबड्स’ नावाची रेस्टॉरंटची साखळीही आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती ३७६ कोटी रुपये आहे. मोहनलाल यांच्याकडे ७.५ कोटी रुपयांच्या ६ आलिशान कार आहेत. यामध्ये मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, जग्वार आणि रेंज रोव्हर यांचा समावेश आहे. सुपरस्टार मोहनलाल हे २०२४-२०२५ मध्ये मल्याळम इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त GST भरणारे अभिनेते ठरले. जीएसटी डिपार्टमेंटने तिरुवनंतपुरम येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये त्यांनी सुपरस्टार मोहनलाल यांना राज्याचे अर्थमंत्री के. एन. बालगोपाल यांनी मोहनलाल यांना पुरस्कार दिला. (Top Trending News)

=========

Baba Vanga : अरे देवा….2026 आणखी भयानक !

=========

मोहनलाल यांच्या चित्रपट प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत अभिनयासह दिग्दर्शन आणि प्रोडक्शन देखील केले आहे. त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. मळ्यालमच नाही तर तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना आतापर्यंत पाच राष्ट्रीय पुरस्कार, ९ केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड्स मिळालेले आहेत. भारत सरकारने त्यांच्या कारकीर्दीच्या गौरव म्हणून त्यांचा पद्मभूषण आणि पद्मश्रीने गौरव केला आहे. (Social Media)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.