उद्या सर्वपित्री अमावस्या अर्थात पितृपक्षाचा शेवटचा दिवस. मागील पंधरा दिवसांपासून पितृपक्ष सुरु होता. उद्या याच पितृ पंधरवाड्याची समाप्ती होत आहे. सर्वपित्री अमावास्या ही सनातन धर्मामध्ये अतिशय महत्वाची मानली जाते. पितृ अमावस्या, पितृ मोक्ष अमावस्या आणि महालय असेही म्हणतात. या अमावस्येला अनेक अर्थाने महत्व देखील आहे. ज्या लोकांनी पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचे श्राद्ध, तर्पण केले नसेल अशांनी आणि ज्यांनी केले आहे त्यांनी देखील या दिवशी श्राद्ध केल्यास पूर्वजांना मोक्षाची प्राप्ती आणि आपल्यालाही त्यांचे शुभाशीर्वाद मिळतात. मात्र या सोबतच जर तुम्ही सर्वपित्री अमावस्येला काही विशिष्ट गोष्टींचे दान केले तर त्याचे देखील मोठे लाभ होतात. (Sarvpitru Amavsya)
सर्वपित्री अमावस्या म्हणजे आपल्या पूर्वजांचे, पितरांचे स्मरण करणे आणि त्यांना श्रद्धांजली वाहणे. या दिवशी पूजा आणि दान केले तर त्याचे फळ नक्कीच आपल्याला मिळते. या दिवशी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि लक्ष्मी मंत्राचा १०८ वेळा जप करावा. असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती होण्यास मदत होईल. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुळशी माळेचा २१ वेळा जप करावा. पितृ पक्षात श्राद्ध-तर्पण सोबतच ब्राह्मणाला अन्नदान करणे आणि दान करणे याला खूप महत्त्व आहे. कारण ब्राह्मणाला भोजन आणि पंडिताला दान दिल्याशिवाय श्राद्धाचे पूर्ण फल प्राप्त होत नाही. असे मानले जाते की, श्राद्धाच्या वेळी ब्राह्मणाला अर्पण केलेले अन्न थेट पितरांपर्यंत पोहोचते. (Marathi)
आपल्या चनिडू धर्मातील माहितीनुसार पिंपळाच्या झाडावर सर्व देवी-देवता आणि पितरांचा वास असतो. यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. अमावस्या तिथीला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पूर्वज प्रसन्न होतात, असे मानले जाते. या तिथीला पितरांना प्रसन्न करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी, काळे तीळ आणि दूध मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. (Marathi News)
तीळ दान करणे
सर्व पितृ अमावस्येला तीळ दान करणे खूप शुभ मानले जाते. अमावस्या तिथीला तीळ दान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो, असे मानले जाते.
फळे
अमावस्या तिथीला फळांचे दान करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते.
गूळ
पितृ अमावस्येला गुळाचे दान करावे. असे केल्याने पितर संतुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात असे मानले जाते. (Marathi Top Headline)
गाय
सर्व दानांत गाय दान करणे सर्वश्रेष्ठ आहे. परंतु श्राद्ध पक्षात गाय दान केल्याने सर्व प्रकारचे सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते.
तूप
श्राद्धाच्या वेळी गायीचे तूप एका पात्रात घालून दान करणे परिवारासाठी शुभ आणि मंगलकारी असते.
भूमी
तुम्ही आर्थिक दृष्ट्या संपन्न असाल तर गरीब व्यक्तीस भूमी दान करा. संतती लाभ होईल. (Todays Marathi Headline)
वस्त्र
धोतर, दुपट्टासहित दोन वस्त्र दान करण्याचे महत्त्व आहे. हे कपडे नवे आणि स्वच्छ असावेत.
चांदी/ सोने
पितरांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी चांदी दान प्रभावी आहे. सोने दान केल्याने कलह नाश होतो.
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी अंधार होऊ लागल्यावर मातीच्या दिव्यात गाईचे तूप टाकून त्यात एक वात ठेवून दक्षिण दिशेला तोंड करुन त्याची ज्योत पेटवा. कारण दक्षिण दिशेचा संबंध पूर्वजांशी संबंधित असल्याचा मानला जातो. पूर्वजांना देवांच्या समतुल्य मानले जाते, म्हणून त्यांच्यासाठी तुपाचा दिवा लावणे शुभ असते. जर तुम्हाला तुपाने लावणे शक्य नसल्यास तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. (Latest Marathi News)
पितृच्या शांतीसाठी उपाय
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांच्या पापांचे क्षालन करण्यासाठी तुम्ही त्रिपिंडी श्राद्ध करू शकता. या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाची पूजा करुन गाईचे दूध अर्पण करावे. असे म्हटले जाते की, पिंपळाच्या झाडाजवळ भगवान विष्णू निवास करतात. या दिवशी तुम्ही पिंपळाचे झाड देखील लावू शकता. (Top Trending News)
========
Sarvapitru Amavasya : सर्वपित्री अमावस्येला ‘हे’ उपाय करून पितृदोषापासून करा सुटका
========
सर्व पितृ अमावस्येला ‘या’ गोष्टी करू नये
श्राद्धाचे भोजन रात्री कधीही घेऊ नये. या दिवशी घरात तामसिक भोजन करू नये. ब्राह्मण आणि कुटुंबातील सदस्यांनी ब्राह्मण भोजनाच्या वेळी मौन बाळगावे. केळीची पाने आणि स्टीलच्या भांड्यांमध्ये श्राद्धाचे भोजन जेवायला देऊ नये. पान, चांदी, तांबे, कांस्य यापासून बनवलेल्या भांड्यांमध्ये जेवायला दिले जाऊ शकते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)