2025 हे वर्ष नैसर्गिक आपत्तींचे वर्ष ठरले आहे. या वर्षात अनेक मोठे भूंकप झाले. म्यानमार, तिबेट, रशियाचा कामचटका द्वीकल्प, वानुआटु, अफगाणिस्तान आणि चीनमध्येही मोठे भूकंप झाले. याशिवाय जगभरातील अनेक देशांमध्ये प्रलयकारी पाऊस झाला. भारताच्या उत्तराखंड आणि हिमाचल या राज्यांमध्ये तर अनेक डोंगर खचले, शिवाय ढगफुटीच्या घटनांनी येथील मानवी जीवनावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या सर्वात जगातील अनेक देशांमध्ये युद्ध होत आहेत. (Baba Vanga)
भारतातही पहलगामसारखी घटना पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केली. त्याला भारतानं चोख प्रत्यत्तर दिले. जगभरातील अनेक देशात आर्थिक संकटही उभं राहिले आहे. एकूण काय 2025 हे वर्ष नैसर्गिक आपत्तींसह युद्धाचे ठरले आहे. अजून या वर्षाचे तीन महिने बाकी असतांना आता 2026 हे आगामी वर्ष कसे जाणार याबाबत भाकीतं यायला सुरुवात झाली आहे. या भाकीतांमध्ये पहिला नंबर लागतो तो बाबा वांगा यांचा. बल्गेरियातील या अंध भविष्यवेत्त्यांनी सांगितलेली अनेक भविष्य तंतोतंत खरी ठरली आहेत. याच बाबा वांगानी 2025 या वर्षासाठी सांगितेल्या भविष्यांनी खळबळ उडवून दिली होती. आता 2026 बाबत बाबा वांगा यांनी भविष्यवाणी पुन्हा जाहीर झाली आहे. ही आगामी वर्षाची भविष्यवाणी, 2025 बरं होतं, पण हे नवं वर्ष नको, इतकी भयानक आहे. (International News)
नवीन वर्षाची चाहूल लागण्यापूर्वीच बाबा वांगा यांची भविष्यवाणी येऊन दाखल होते. आत्ताही 2026 वर्षासाठी बाबा वांगा यांची भविष्यवाणी जाहीर करण्यात आली आहे. बाबा वांगा यांच्या मते, 2026 हे वर्ष खूप अपघात, आणि भूकंपाचे असणार आहे. या आगामी वर्षात भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि मोठे हवामान बदल होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 2026 मध्ये तिसरे महायुद्ध सुरु होण्याचा धोका असल्याचे बाबा वांगा यांनी सांगितले आहे. बाबा वांगा यांनी आपल्या भविष्यवाणीमध्ये दावा केला आहे की, वसंत ऋतूमध्ये पूर्वेकडील राष्ट्रांमध्ये युद्ध सुरू होणार आहे. बघता बघता हे युद्ध पाश्चात्य राष्ट्रांना उद्ध्वस्त करणार आहे. यात युरोपमधील अनेक देश ओढले जातील आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. युरोप उद्ध्वस्त आणि उजाड होऊ शकेल, अशी भीतीही त्यांनी आपल्या भविष्यवाणीतून व्यक्त केली आहे. याशिवाय रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे “जगाचे स्वामी” होणार असल्याची भविष्यवाणी बाबा वांगा यांनी केली आहे. (Baba Vanga)
बाबा वांगा यांनी भाकीत केले आहे की, नव्या वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रचंड वेगाने प्रगती करेल. इतकी ती कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनावर वर्चस्व गाजवणार आहे. नोकऱ्यांपासून ते नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनापर्यंत सर्व गोष्टींवर एआयचे वर्चस्व रहाणार आहे. सोबतच आरोग्याच्या समस्यांबाबतही एआय तंत्रज्ञानाचा मानवाला फायदा होणार आहे. अनेक गंभीर आजार आता बरे होऊ लागतील, असे आशादायक भाकीतही बाबा वांगा यांनी केले आहे. बाबा वांगा परग्रहींबाबत कायम भाकीत सांगतात. (International News)
आत्ताही त्यांनी नोव्हेंबर 2026 च्या सुमारास एक अंतराळयान पृथ्वीवर येणार असल्याचे भाकीत केले आहे. यातून येणारे परग्रही आणि मानव यांचा संवाद होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. यातून मानवांचा एलियनशी थेट पहिल्यांदाच संपर्क होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मानवाला या भेटीतून एलियन कडील आधुनिक तंत्रज्ञान मिळणार असल्याचे भाकीत बाबा वांगा यांनी केले आहे. याशिवाय 2026 मध्ये भूकंपाची मालिका लागणार असून काही भूकंपामुळे मोठे ज्वालामुखी जागृत होण्याचा धोकाही असल्याचे बाबा वांगा यांनी आपल्या भाकीतामध्ये सांगितले आहे. (Baba Vanga)
============
हे देखील वाचा : Donald Trump : ‘ट्रम्प इज डेड’ या ट्रेंडने उडवली ट्रम्प प्रशासनाची झोप !
==============
एकूण काय 2026 या वर्षाची चाहूल लागण्यापूर्वीच त्याबद्दल आलेल्या बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीनं पुन्हा सर्वत्र खळबळ उडाली आहे. बाबा वांगा यांचे खरे नाव व्हँगेलिया पांडेव दिमित्रोवा होते. त्यांचा जन्म 1922 मध्ये आता उत्तर मॅसेडोनिया येथे झाला. वयाच्या 12 व्या वर्षी एका वादळात अडकल्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू गेले. त्यात त्यांची दृष्टी गेली. त्यानंतर, बाबा वांगा यांना भविष्य पाहण्याची चमत्कारिक शक्ती प्राप्त झाली. हळूहळू, लोक त्यांच्या भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. वयाच्या 30 वर्षी बाबा वांगा यांचे नाव सर्वदूर झाले. त्यांनी जवळजवळ 50 वर्षे भाकीते केली. यात पुढच्या अनेक वर्षातील घटनांचा समावेश आहे. ही भाकीते त्यांनी एका पुस्तकात लिहून ठेवली. 11 ऑगस्ट 1996 रोजी त्यांचे निधन झाले. आता दरवर्षी त्यांच्या या पुस्तकातील भाकीते नवे वर्ष सुरु होण्याआधी प्रकाशित करण्यात येतात. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics