Home » Navratri : ए हालो! नवरात्रीत गरबा खेळण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

Navratri : ए हालो! नवरात्रीत गरबा खेळण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Navratri
Share

आता शारदीय नवरात्र सुरु झाले की, सगळीकडे गरबा आणि दांडियाची नुसती धूम असणार आहे. नवरात्राच्या काही दिवस आधीपासूनच गरबाचे क्लास सुरु होतात. अनेक लोकं या क्लासमध्ये जाऊन गरबा शिकतात आणि नवरात्रामध्ये जोरदार गरबा करतात. देवीसमोर गरबा करणे म्हणजे एक अर्थी तिची भक्ती, उपासनाच करणे होय. नवरात्रामध्ये गरबा आणि दांडिया खेळण्याला मोठे महत्व आहे. आधी केवळ गुजरातमध्येच गरब्याची क्रेझ पाहायला मिळायची मात्र आता संपूर्ण भारतामध्ये गरबा मोठ्या जल्लोषात संपन्न होतो. (Health)

गरबा आणि दांडिया हे आनंदाचे प्रतीक आहेत आणि कोणत्याही प्रसंगी केले जाऊ शकतात, परंतु नवरात्रीच्या काळात दांडिया रात्री आणि गरबा आयोजित केले जाते. नवरात्रीत गरबा आणि दांडिया खेळण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. हे दोन्ही नृत्य माँ दुर्गाशी संबंधित आहेत. माँ दुर्गेच्या मूर्तीभोवती किंवा जिथे मातेची ज्योत प्रज्वलित केली जाते त्याभोवती गरबा केला जातो. (Navratri)

मान्यतेनुसार गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. पण हा गरबा खेळण्याला जेवढे धार्मिक महत्व आहे तेवढेच महत्व आपल्या आरोग्याच्या द्र्सुथीने देखील आहे. म्हणजेच काय तर गरबा खेळण्याने आपल्या आरोग्याला आणि शरीराला अनेक चांगले लाभ होतात. या फायद्यांबद्द्दल जर तुम्ही ऐकाल तर तुम्ही देखील न चुकता गरबा खेळाल. (Marathi News)

हृदय निरोगी राहते
गरबा खेळताना शरीराची मोठ्या प्रमाणात हालचाल होत असते. हृदयाचे स्नायू मजबूत होतात ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते. रक्ताभिसरण योग्य प्रमाणात होऊन ऑक्सिजनची पातळी देखील वाढते. (Todays Marathi Headline)

Navratri

एरोबिक व्यायामाचा प्रकार​
​गरबा नृत्य हा एक उच्च-ऊर्जा क्रियाकलाप आहे, ज्यामध्ये शरीराचे स्नायू सक्रिय असतात. हे नृत्य एरोबिक व्यायामासारखे कार्य करते, तुमचे हृदय गती वाढवते आणि कॅलरी बर्न करण्यास मदत करते.​ (Navratri 2025)

फुफ्फुस मजबूत होतात
गरबा खेळताना त्यात गतीचंही भान ठेवावं लागतं. त्यामुळे तुम्हाला दीर्घ श्वास घेऊन सोडावा लागतो. ही प्रक्रिया जवळपास प्राणायामाच्या जवळ जाणारी असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असल्यास प्राणायाम करण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. (Latest Marathi Headline)

एनर्जी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी
​गरबा एका तासापेक्षा जास्त काळ केला जाणारा नृत्य प्रकार आहे, ज्यामुळे तुमची सहनशक्ती आणि ऊर्जा वाढते. याचा नियमित सराव केल्याने थकवा चांगल्या प्रकारे हाताळण्यास शिकता येते. ​ (Top Marathi Headline)

तणाव कमी होतो
गरबा खेळल्याने तणाव कमी होतो असतो. आपली एकाग्रता वाढते. इतरांच्या सोबतीने आपण गरबा खेळत असतो त्यामुळे आपल्या मनात इतर विचार घर करत नाहीत. (Top Marathi news)

डिमेंशिया होण्याचा धोका कमी
३५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक गरबा करत असतील तर त्यांना डिमेंशिया किंवा विसरण्याचा आजार होत नाही. असे म्हटले जाते की, गरबा केल्याने मेंदूतील हिप्पोकॅम्पस मेंदूला नियंत्रित करतो आणि स्मरणशक्ती वाढवतो. तसेच यामुळे फ्रोझन शोल्डरची समस्याही दूर होते. (Latest Marathi News)

=========

Navratri : नवरात्रीत गरबा किंवा दांडिया का खेळतात?

=========

लवचिकपणा वाढेल
गरब्यामध्ये हातांपासून ते पाय आणि कमरेपासून ते डोक्यापर्यंत हालचाल होते. यामुळे शरीराचा लवचिकपणा वाढतो. सांधेदुखीचा त्रासही यामुळे कमी होतो. हे गरबा नृत्य सणासुदीचा काळ संपल्यानंतरही करत राहणे तुमच्या फिटनेससाठी खूप फायद्याचे ठरू शकते. (Top Trending News)

वजन कमी होण्यास मदत होते
गरबा खेळताना फक्त आपल्या हाता पायांची हालचाल होत नाही तर पुर्ण शरीराला चालना मिळते. शरीरातील चरबी वेगाने कमी होते. (Social News)

(टीप: वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय वापरण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.