दरवर्षी शारदीय नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते. आदिशक्तीच्या नऊ दिवस महिषासुराशी युद्ध करत त्याचा परब करत विजयोत्सव साजरा केला होता. यासाठी नवरात्र साजरे केले जाते. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीत भाविक मनोभावे देवीची पूजा करून उपवास करतात. यंदा २२ सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे. आता नवरात्र म्हटले की गरबा, दांडिया आलेच. (Navratri)
गरबा आणि दांडियाशिवाय नवरात्री अपूर्ण आहे. देवीसमोर नऊ दिवस रात्री गरबा आणि दांडिया रास खेळले जाते. या गरब्याची सर्वात जास्त क्रेझ गुजरातमध्ये दिसून येते. मात्र आता हळूहळू हा गरबा दांडिया संपूर्ण भारतभर किंबहुना जगभर पसरला आहे. नवरात्रीत तर गरबा, दांडिया याला विशेष महत्त्व आहे. नऊ दिवस मातेचा जागर करुन भक्तगण आपला आनंद आणि उत्साह साजरा करतात. त्या नऊ दिवसात मातेची उपासना करुन मिळणारी शक्ती, मातेचा आशिर्वाद तुम्हाला वर्षभर पुढे पुढे जाण्याची प्रेरणा देत असतो. मात्र नवरात्रामध्ये गरबा आणि दांडिया का खेळतात याचे कारण माहिती आहे का? नाही चला जाणून घेऊया याचीच माहिती. (Marathi)
गरबा आणि दांडिया या खेळांचा उगम गुजरातमधून झाला, असे सांगितले जाते. नवरात्रीत देवीची स्थापना केल्यावर भाविक मोठ्या श्रद्धेने हे नृत्य करतात. गरबा आणि दांडीया या खेळांचा इतिहास गुजरातशी संबधित आहे. गुजरातच्या या लोकनृत्याचा थेट संबंध दुर्गा मातेशी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीमध्ये हा नृत्याभ्यास केल्याने भक्त देवीला प्रसन्न करतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. (Todays Marathi Headline)

“नवरात्र” म्हणजे मातेच्या नऊ रूपांची उपासना असते. प्रत्येक भागात नवरात्र वेगळ्या पद्धतीत साजरी केली जाते. महिला आणि पुरुष खास पेहराव परिधान करून दुर्गामातेचा जागर करतात. गरबा, दांडियासाठी फेर धरला जातो. गरबा म्हणजे पारंपरिक लोकनृत्य असून स्त्रीमधील दैवी स्वरूप, सृजनशीलता आणि जीवनातील वर्तुळाचे प्रतीक आहे. गरबा हा गुजरातचे पारंपरिक लोकनृत्य म्हणून ओळखले जाते. “गरबा” हा शब्द संस्कृतमधील “गर्भ” या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ “गर्भाशय” असा होतो. (Marathi News)
पारंपरिक गरबा नृत्य जर तुम्ही पाहिले असेल तर ते एका जाळीदार मातीच्या घट आणि त्यात प्रज्वलीत असणाऱ्या दिवा या भोवती केले जाते. त्या घटातील दिव्याला “गर्भदीप” असे म्हणतात. तो घट म्हणजे शरीराचे प्रतीक आणि ज्यामध्ये प्रज्वलीत असणारा दिवा म्हणजे दैवी शक्ती असे म्हटले जाते. या गर्भदीपाभोवती नृत्य करणे म्हणजे मानवी जीवनातील दैवी शक्तीची उपासना करणे असा होतो. अनेक ठिकाणी तुम्ही पाहिले असेल की गर्भदीपाच्या जागी मध्यभागी दुर्गामातेचा फोटो देखील ठेवला जातो. त्यानंतर त्यात चांदीचे नाणेही टाकले जाते. या दिव्याच्या प्रकाशात भाविक हे नृत्य करतात. दांडिया किंवा गरबा नृत्यापूर्वी देवीची पूजा केली जाते. (Latest Marathi Headline)
गरबा करताना फेर धरला जातो. एक वर्तुळ करून गरबा, दांडिया खेळतात. जेव्हा जास्त लोक असतात त्यावेळी अधिक वर्तुळांमध्ये गरबा आणि दांडिया करतात. हे चक्र म्हणजे काळाचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात चक्राला फार महत्त्व आहे. आपल्या शरिरात सात चक्र असून ती शरीरातील तांत्रिक केंद्र मानली जातात. जीवनाच्या चक्रात जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म यांचा समावेश असतो आणि हे चक्र सतत फिरत असते. पण मातेची दैवी शक्ती यात कायम असते. हा गरबा त्या गोष्टीचे प्रतीक आहे. नऊ दिवस आपण मातेचा जागर करतो, तिची उपासना करतो. (Top Marathi Headline)
गरबा खेळताना महिला तीन टाळ्यांचा वापर करतात. यामागे देखील एक खास कारण आहे. या तीन टाळ्या त्रिदेवाला समर्पित आहेत. पहिली ब्रह्मदेवाला, दुसरी भगवान विष्णूला आणि तिसरी महादेवाला. तीन टाळ्यांच्या कडकडाटात तीनही देवतांचे आवाहन केले जाते. गरब्याच्या नृत्यात उमटणाऱ्या आवाजाने आणि तरंगांनी अंबामाता जागृत होते असे ही म्हणतात. गरबात खेळताना आपल्यात एक उत्साह आणि ऊर्जा असते. जीवनातील नकारात्मकता नष्ट होवून सकारात्मक येते. (Latest Marathi News)
========
Makeup : गरबा खेळताना घाम आल्याने मेकअप टिकत नाही? मग ‘या’ टिप्स करा फॉलो
========
याबद्दल अजून एक गोष्ट सांगितली जाते, दांडिया नृत्याच्या वेळी दांडिया किंवा टिपऱ्या खेळल्यामुळे निर्माण होणारा आवाज सकारात्मक ऊर्जा आणतो असे म्हणतात. याशिवाय जीवनातील नकारात्मकताही संपते. अशा परिस्थितीत गरबा नृत्याच्या वेळी महिला तीन टाळ्या वापरतात, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. (Top Trending News)
गरबा आणि दांडिया एक धार्मिक प्रथा आहे. आता जिथे धार्मिक गोष्टी येतात तिथे चप्पल घालून कोणतेही कार्य केले जाते. गरबा खेळताना पृथ्वीबद्दल आदर व्यक्त केला जात असल्यामुळे देखील गरबा खेळताना चप्पल घालत नाही. गरबाच्या पोशाखाचा 3 भागांमध्ये समावेश होतो. स्त्रिया चोली किंवा ब्लाउज, चॅन्या किंवा लांब स्कर्ट आणि एक सुगंधित दुपट्टा परिधान करतात. आणि पुरुष पगडी घालून केडियु परिधान करतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
