Home » Britain : ज्या देशानं जगावर राज्य केलं, तोच देश गुलाम होण्याच्या वाटेवर !

Britain : ज्या देशानं जगावर राज्य केलं, तोच देश गुलाम होण्याच्या वाटेवर !

by Team Gajawaja
0 comment
Britain
Share

ब्रिटिश साम्राज्यानं एकेकाळी जगभरातील 56 देशांवर राज्य केलं आहे. ब्रिटिश साम्राज्याने उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि आशियाचा मोठा भाग व्यापला होता. जगाच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त भागांवर नियंत्रण ब्रिटिश साम्राज्याचे होते. याकाळात ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नाही, असे अभिमानानं सांगितले जायचे. जगावर राज्य करुन अन्य देशांना गुलाम करणारा हा ब्रिटन देशच आता गुलाम होणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आज या ब्रिटनमधील मुळ रहिवासी आपल्याच देशात लपून छपून रहात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. नुकताच ब्रिटनमध्ये एक मोठा मार्चा काढण्यात आला. त्यात लाखाहून अधिक मुळ ब्रिटिश नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चानंतर ब्रिटिश नागरिकांची सध्याची स्थिती चर्चेचा विषय ठऱली आहे. एकेकाळी जगावर राज्य करणा-या या देशाचे वेगानं इस्लामीकरण होत असून या देशातील काही भागात इस्लामिक कायदाही लागू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

गेल्या दशकापासून ब्रिटनमध्ये मोठ्याप्रमाणात स्थलांतरित वाढत आहेत. आता या स्थलांतरितांची संख्या एवढी झाली आहे की, त्यांनी मुळ ब्रिटिश नागरिकांच्या हक्कांवरच गदा आणायला सुरुवात केली आहे. या स्थलांतरितांच्या प्रश्नावर टॉमी रॉबिन्सन हे गेल्या दहा वर्षापासून काम करत आहेत. ब्रिटनच्या कानाकोप-यात स्थलांतरितांनी कब्जा केला आहे. याचा फटका मुळ ब्रिटिशांना बसत असून आता बहुतांश भागातील सरकारी व्यवस्थाही या स्थलांतरितांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केल्यामुळे टॉमी रॉबिन्सन यांनी मुळ ब्रिटिश नागरिकांना आवाहन केले. त्यातूनच लंडनच्या रस्त्यावर ‘युनाईट द किंगडम’ नावाची रॅली काढण्यात आली. ब्रिटनचे मुळ नागरिक आता या स्थलांतरितांना सहन करणार नाहीत, असा इशारा देण्यात आला तरी, ब्रिटनमधले वास्तव कठिण आहे.

ब्रिटनमधील मूळ ब्रिटनच्या नागरिकांची लोकसंख्या झपाट्यानं कमी होत आहे. सध्या तेथील लोकसंख्येच्या 73 टक्के मूळ ब्रिटिश नागरिक आहेत. पण हे लोकसंख्येचे प्रमाण 2050 पर्यंत 57 टक्क्यांवर येणार आहे. अशाच क्रमानं 2063 पर्यंत, ब्रिटनमधील मूळ रहिवासी त्यांच्याच देशात अल्पसंख्याक होणार आहेत. 2075 पर्यंत तर मुळ ब्रिटनचे नागरिक 44 टक्क्यांहून खाली येतील, आणि त्यानंतर आणखी दहा वर्षांनी ही लोकसंख्या अती अल्पसंख्याक या आकडेवारीमध्ये गणली जाणार आहे. या सर्वाला कारण ठरली आहे ती येथील स्थलांतरितांची संख्या. 2022 मध्ये 7 लाख 64 हजार स्थलांतरित ब्रिटनमध्ये आले. त्यांना तिथे आसरा देण्यात आला. सर्व सुविधा देण्यात आल्या. त्यापाठोपाठ 2023 मध्ये अशा सहा लाखांहून अधिक स्थलांतरित ब्रिटनमध्ये आले. दरवर्षी ही संख्या वाढत असून ब्रिटनमध्ये आलेल्या स्थलांतरितांना सर्व सुखसुविधा देण्यात येत असल्यामुळे मुळ नागरिकांनी दिलेल्या पैशाचा गैरवापर होत असल्याचा आरोप होत आहे.

सध्या ब्रिटनमध्ये 40 लाख मुस्लिम स्थलांतरित आहेत. ब्रिटनमधील मुस्लिम लोकसंख्येची टक्केवारी सर्वात वेगानं वाढत आहे. 2001 मध्ये ब्रिटनमध्ये 16 लाख मुस्लिम होते. आता तिच संख्या 40 लाखांच्या पुढे पोहचली आहे. अशीच लोकसंख्या वाढली तर ब्रिटनमध्ये 2050 पर्यंत मुस्लिम लोकसंख्या 1 कोटी 40 लाखापर्यंत पोहचणार आहे. या सर्वांना ज्या सुखसुविधा देण्यात येतात, त्या ब्रिटिश नागरिकांच्या करातून दिल्या जातात. मात्र ब्रिटिश नागरिक हा सर्व कराच्या पैशाचा अपव्यय असल्याचे सांगत आहेत. या सर्वात काळजी कऱण्याची आणखी एक गोष्ट म्हणजे, ब्रिटनमध्ये गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यात पाकिस्तान ग्रुमिंग गॅंगचे नाव घेतले जाते. मुळ ब्रिटिश मुलींना या गँग आपल्या जाळ्यात ओढतात.

========

Nepal : या होणार नेपाळच्या पंतप्रधान !

========

त्यांना नशेचे पदार्थ दिले जातात. शाळेत जाणा-या अशा हजारो ब्रिटिश मुलींवर बलात्कार झाला आहे. मात्र अशा गंभीर गुन्ह्यामधील गुन्हेगारांवर कडक कारवाई अद्यापही झालेली नाही. त्यातच ब्रिटनमध्ये 85 शरिया न्यायालये कार्यरत आहेत. ही न्यायालये ब्रिटिश न्यायालयांचा निर्णय मान्य करत नाहीत, ही गंभीर बाबही पुढे आली आहे. या ग्रुमिंग गँगबाबतही आता ब्रिटनमध्ये आवाज उठवण्यात येत आहे. लंडनमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीमध्येही या ग्रुमिंग गँगला अटकाव घालण्याची मागणी कऱण्यात आली आहे. या सर्वात पाकिस्तानातून ब्रिटनमध्ये गेलेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. आता याच संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आपल्याच देशात आपण गुलाम होऊ, अशी भीती मुळ ब्रिटिश नागरिक व्यक्त करीत आहेत.

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.