नेपाळमध्ये दोन दिवस क्रांती करत जेन झी ने नेपाळचे सरकार बदलून टाकले. पण या युवा वर्गाच्या क्रांतीनं फक्त सरकारच नाही तर नेपाळमधील सर्वसामान्य नागरिकांचे सर्वस्व नष्ट केल्याची माहिती आता पुढे येत आहे. या क्रांतीमुळे नेपाळला ज्या पर्यटन क्षेत्रातून सर्वाधिक आर्थिक सुबत्ता आली आहे, त्या पर्यटन क्षेत्राला तुर्तास तरी पूर्णपणे रोखले आहे. नेपाळमध्ये आता पुन्हा शांतता येत आहे. पण या आंदोलनादरम्यान शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, कारखाने, ऑटो शोरूम आणि अगदी व्यापाऱ्यांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. (Nepal)
यात अब्जावधींचे नुकसान झाले आहे. मुख्य म्हणजे, नेपाळमध्ये सप्टेंबर ते डिसेंबर हा हंगाम पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोत्तम मानला जातो. परंतु याच हंगामाची सुरुवात होतांना हे आंदोलन झाले आणि आता पर्यटकांच्या संख्येत 30 टक्के घट झाल्याचे उघड झाले. ही घट आता वाढतही असल्यानं येथील व्यापारी संकटात सापडले आहेत. या आंदोलनामुळे नेपाळच्या अर्थव्यवस्थेला सुमारे 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहेच, शिवाय सरकारी आणि खाजगी पायाभूत सुविधाही मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आल्या आहेत. येथील अर्थतज्ज्ञांच्या माहितीनुसार या सर्वांचा परिणाम आर्थिक विकास दरावर होऊन हा दर 1% च्या खाली जाण्याची शक्यता आहे. या सर्वातील चिंताजनक बाब म्हणजे, सद्यस्थितीत आंदोलनामुळे दहा हजार लोकांच्या नोक-या गेल्या आहेत. आणि पर्यटकांच्या संख्येत घट झाल्यास यात भर पडणार असल्यामुळे नेपाळमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची शक्यताही आहे. (International News)
नेपाळमध्ये जेन झी आंदोलनाची सुरुवात झाली तेव्हाच तेथील पर्यटनाचा हंगाम सुरु झाला होता. जगभरातील ट्रेकर्सचे नेपाळमध्ये येतात. या पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी येथील हॉटेल व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच हॉटेल, रेस्टॉरंटची सजावट करण्यात आली होती. नेपाळची राजधानी काठमांडू येथे सप्टेंबर महिन्यात जगाच्या कानाकोप-यातून आलेल्या ट्रेकींग प्रेमींचा मोठा उत्सवच असतो. पण त्याचवेळी जेन झीचे आंदोलन झाले आणि या उत्सवावर पाणी पडले. नेपाळमध्ये दरवर्षी 12 लाख पर्यटक येतात. या पर्यटन क्षेत्राचा नेपाळच्या जीडीपीमध्ये सुमारे 8% वाटा आहे. सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी येथे पर्यटनासाठीचा पीक सीझन मानला जातो. पण या यावर्षी या सीझनची सुरुवात झाली तीच तोट्यामुळे. आत्तापर्यंत 30 टक्क्यांहून अधिक पर्यटकांच्या संख्येत घट झाली असून ही घट आता वाढू लागली आहे. (Nepal)
ओली सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी हिंसक निदर्शनांनंतर काठमांडूमधील गजबजलेली दुकाने आणि हॉटेल यांना लक्ष कऱण्यात आले. त्यामळे पर्यटकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली. त्यात हजारो पर्यटकांनी नेपाळचा दौरा रद्द केला, आणि जे नेपाळमध्ये आले होते, त्यांनी पुन्हा आपल्या देशात जाण्यासाठी विमानतळावर गर्दी केली. त्यामुळे आता दुकाने, पब आणि रेस्टॉरंट्स पुन्हा उघडली असली तरी ती खाली असल्याचे चित्र आहे. नेपाळचे पर्यटन प्राधिकरण, हॉटेल मालक आणि ट्रेक आयोजकांनी सांगितले की गेल्या वर्षीच्या तुलनेत याच महिन्यात पर्यटकांची संख्या 30% कमी झाली आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत पर्यटकांच्या बुकींग रद्द करण्याचा प्रमाणात वाढ होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. (International News)
नेपाळच्या ट्रेकिंग ट्रेल्समध्ये जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प देखील समाविष्ट आहे. माउंट एव्हरेस्टवर जाण्यासाठी येथे मोठ्या संख्येनं जगभरातील मान्यवर ट्रेकर्स येतात. पण या ट्रेकर्सनेही नेपाळकडे पाठ फिरवल्याचे नेपाळ पर्यटन मंडळाचे सीईओ दीपक राज जोशी यांनी सांगितले. नेपाळमधील प्रसिद्ध दरबार स्क्वेअर, पोखरा, भैरहवा आणि चितवन सारखी प्रमुख पर्यटन स्थळे आता एकदम रिकामी झाली आहेत. या आंदोलनाचा सर्वात मोठा फटका काठमांडूमधील हिल्टन हॉटेलला बसला आहे. हिंसाचारात जमावाने या बहुमजली हॉटेलला आग लावली त्यात हिल्टनला 8 अब्ज नेपाळी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. (Nepal)
========
Nepal Kumari Devi : नेपाळमध्ये कुमारी देवीची निवड कशी होते? घ्या जाणून या प्रथेबद्दल सविस्तर
========
काठमांडू व्हॅली व्यतिरिक्त, पोखरा, बुटवल, भैरहवा, झापा, विराटनगर, धनगढी, महोत्तरी आणि तुलसीपूर सारख्या शहरांमधील हॉटेल्स देखील हिंसाचाराच्या विळख्यात सापडली. नेपाळमधील सर्वात मोठ्या औद्योगिक गट चौधरी ग्रुपचेही मोठे नुकसान झाले आहे. चितवनमधील जीजी लँडमार्क मॉलचेही नुकसान झाले असून एनसेल टेलिकॉम कंपनीलाही मोठे नुकसान झाले आहे. हॉटेल असोसिएशन नेपाळच्या मते, हॉटेल व्यवसायाला या आंदोलनामुळे 25 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. नेपाळमध्ये अतंरिम सरकार आले असून या सरकारच्या प्रमुख सुशीला कार्की यांनी 5 मार्च 2026 मध्ये निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नेपाळमध्ये आता शांतता असली तरी पर्यटक मात्र नेपाळमध्ये येण्याबाबत पर्यटक अद्यापही साशंक मनस्थितीत आहेत. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics