Home » Health : सावधान! लहान मुलांमध्ये देखील वाढते हार्ट अटॅकचे प्रमाण

Health : सावधान! लहान मुलांमध्ये देखील वाढते हार्ट अटॅकचे प्रमाण

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

सध्याच्या काळात हार्टअटॅक येणे हे खूपच सामान्य झाले आहे. दररोज आपल्याला हार्टअटॅकमुळे झालेल्या मृत्यूबद्दल एकतरी बातमी ऐकायला मिळते. हृदयविकाराचे बहुतेक रुग्ण वृद्धत्वानंतर येत असत. लोकांना ५०-६० वर्षे वयाच्या हृदयविकार होत असत, परंतु गेल्या १० वर्षांत तरुणांमध्ये हृदयविकाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आता तर अगदी तरुणांनाही हार्ट अ‍ॅटॅक येतो आणि जीवही गमवावा लागतोय. हल्ली हार्ट अ‍ॅटॅक, स्ट्रोक, हार्ट फेल होणे, अशा हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा सामना तरुणांनाही करावा लागतो. (Health)

मात्र आता ही परिस्थिती अधिकच बिकट होताना दिसत आहे. कारण आधी वृद्धांना येणार अटॅक तरुणांना यायला लागला आणि आता तर थेट लहान मुलं देखील या आजाराचा शिकार होताना दिसत आहे. अनेक लहान मुलांना हार्ट अटॅक येण्याच्या बातम्या आपल्याला वाचायला, ऐकायला मिळत आहे. दुर्दैवाने यात अनेक लहान मुलांचा जीव देखील जात आहे. नुकतेच सोशल मीडियावर ‘पीछे देखो पीछे’ या मीममुळे लोकप्रिय झालेला बालकलाकार अहमद शाहचा लहान भाऊ असलेल्या उमर शाहचे हार्ट अटॅकने अकस्मात निधन झाले आहे. (Marathi News)

रिपोर्ट्सनुसार, उमरला अचानक कार्डिॲक अरेस्ट आला आणि त्याचं हृदय धडधडणं बंद झालं. अहमद शाहने त्याच्या इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहित छोट्या भावाच्या निधनाची माहिती दिली. उमर शाहच्या अचानक झालेल्या निधनामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा लहान मुलांमधील हार्ट अटॅकच्या आजाराने सर्च पालकांना चिंतेत टाकले आहे. मुलांमध्ये हृदयविकाराचा धोका का वाढतोय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. (Top Marathi Headline)

Health

कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय?

कार्डियाक अरेस्ट ही एक धोकादायक स्थिती आहे, ज्यामध्ये व्यक्तीचे हृदय काम करणे थांबवते. यामुळे हृदय रक्त पंप करणे बंद करते, ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. सोप्या शब्दांत सांगायचे तर, हृदय अचानक धडधडणे बंद करते, म्हणून त्याला कार्डियाक अरेस्ट असेही म्हणतात. (Latest Marathi News)

हृदयविकाराच्या झटक्यांची लक्षणे
– छातीत दुखणे
– चक्कर येणे
– श्वास घेण्यात अडचण
– हृदयाचे जलद ठोके
– बेशुद्धी
– उलट्या होणे
– पोटदुखी

मुलांमध्ये हृदयविकाराचे कारण काय आहे?
गेल्या काही वर्षांत मुलांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. आता मुले गेम खेळण्याऐवजी मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीवर चिकटून राहतात. तासनतास स्क्रीन टाइम आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो, जे हृदयविकाराचे मुख्य कारण असते. आजकाल मुले जंक फूड, गोड पेये आणि तेलकट पदार्थांचे सेवन जास्त करतात, यामुळे लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. याशिवाय काही बाळांना हृदयरोग असतो, जो वेळेवर ओळखला गेला नाही तर गंभीर आणि जीवघेणा ठरू शकतो. शाळा आणि अभ्यासाचा ताण देखील मुलाच्या हृदयावर परिणाम करू शकतो. (Top Trending News)

========

Overthinking Remedies : ओव्हरथिंक करणे आरोग्यासाठी किती घातक? याची लक्षणे आणि उपाय काय

========

पालकांनी काय काळजी घ्यावी?
मुलांच्या दैनंदिन दिनचर्येत संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यांचा समावेश असावा. मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित करा आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करा. जर मुलाला थकवा, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. बालपणात हृदयविकाराच्या समस्या दुर्मिळ असतात, परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे त्या वाढत आहेत. जर कुटुंबातील एखाद्याला हृदयरोग झाला असेल, तर वेळोवेळी हृदयरोगतज्ज्ञांकडून मुलांची तपासणी करून घेणे महत्वाचे आहे. मुलांना योगा आणि ध्यान यासारख्या क्रियाकलापांमध्ये सहभागी करा. मुलांना अभ्यासाचा ताण देऊ नका. (Social News)

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.