महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली तुळजाभवानी माता कायम आपल्या भक्तांना आशीर्वाद देते आणि कायम त्यांच्या पाठीशी राहते. साडे तीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून तुळजाभवानी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. सध्या सर्वत्र शारदीय नवरात्राची तयारी सुरु असून, तुळजापूरमध्ये असलेल्या तुळजाभवानी मंदिरात देखील या नवरात्राची जोरदार तयारी चालू आहे. नवरात्राच्या आधी होणाऱ्या सर्व विधींना मंदिरात सुरुवात झाली आहे. नवरात्राच्या आधी तुळजाभवानी मंदिरात होणारा मुख्य विधी म्हणजे देवीची मंचक निद्रा. (Marathi News)
नवरात्र उत्सवापूर्वी देवी तुळजाभवानीची मंचकी निद्रा सुरु होते. ही निद्रा देवीला दरवर्षी देण्यात येते. हा काळ देवीच्या विश्रांतीचा असल्याचे बोलले जाते. देवीला घटस्थापनेच्या नऊ दिवस आधी ही निद्रा दिली जाते. आई तुळजाभवानीला नवरात्रोत्सवाच्या आधी काही दिवस झोपवले जाते. मंदिराचे पुजारी देवीला झोपवतात. या प्रथेला देवीची मंचकी निद्रा असे म्हणतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून मंदिरात सुरु आहे. नक्की मंचकी निद्रा म्हणजे काय? का देवीला झोपवले जाते? काय आहे या प्रथेचे महत्व? पाहूया. (Top Stories)
महाराष्ट्राची कुलदेवी आई तुळजाभवानी यांच्या मंचकी निद्रेला १४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. देवीला दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी मंचकी निद्रा दिली जाते. भाद्रपद अष्टमीला देवीच्या निद्रेची सुरुवात झाली. देवी आता शांत झोप घेणार असून ती मंचकी निद्रेतून थेट भाद्रपद अमावस्येला उठेल. याकाळात देवीची झोपमोड होणार नाही याची दक्षता पुजारी घेत असतात. त्यामुळे मंदिरातील वातावरण शांत असते. तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रा कालावधीत देवीला सकाळी आणि संध्याकाळी सुगंधी तेलाचा अभिषेक केला जाणार आहे. तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरु असताना पुजारी विश्रांतीसाठी गादी उशी पलंग याचा वापर करत नाहीत. कारण यावेळी तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरु असते. (Navratri News)
मंचकी निद्रेची कथा
देवीने महिषासुर राक्षसाचा वध केल्याची पौराणिक कथा तर सर्वांनाच माहीत आहे. देवी महिषासुराशी नऊ दिवस लढत होती. नऊ दिवसांच्या युद्धांनंतर दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. त्यामुळे या अखंड युद्धांनंतर देवीला विश्रांती देण्यासाठी नवरात्रोत्सवानंतर तिला झोपवले जाते. मात्र तुळजाभवानी मातेला नवरात्र उत्सव सुरु होण्यापूर्वीच झोप दिली जाते. त्यामागची कहाणी अशी सांगतात की देवीला नऊ दिवस लढण्यासाठी बळ मिळावे तसेच या नऊ दिवसात देवीचे परिश्रम होणार असून त्याआधीच तिला विश्रांती मिळावी यासाठी तुळजापूरच्या भवानीमातेच्या मंदिरात देवीला मंचकी निद्रा देण्याची परंपरा आहे. (Top Marathi Headline)
देवीची मंचकी निद्रा केव्हा संपणार
तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा काल प्रारंभ झाली आहे. मंदिरातील पुजाऱ्यांनी देवीचा सायंकाळी अभिषेक करून तिच्या अंगाला भंडारा लावून गर्भगृहातील चांदीच्या पलंगावर देवीला झोपवले आहे. ही मंचकी निद्रा देवीला दरवर्षी दिली जाते. देवी या निद्रेतून आता भाद्रपद अमावस्येला उठणार असल्याचे सांगितले जाते. २२ सप्टेंबरला देवीची निद्रा संपेल आणि घटस्थापना करुन तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवाला यादिवशी सुरुवात होईल. (Marathi News)
देशभरातील ५१ शक्तीपीठांपैकी केवळ कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी एकमेव चलमूर्ती असून ती अन्य ठिकाणी उत्सव मूर्ती हलवण्यात येते. तुळजाभवानी देवी वर्षभरात तीन वेळा एकूण २१ दिवस मंचकी निद्रा घेते. यामध्ये शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी ८ दिवस, सीमोल्लंघनानंतर ५ दिवस व शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी ८ दिवस देवी मंचकी निद्रा घेत असते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी वर्षातून ३ वेळा आणि एकूण २१ दिवस निद्रा घेत असते. उरलेले ३४४ दिवस अष्टोप्रहर जागृत अवस्थेत असते. देवीची २१ दिवसाची निद्रा तीन तीन टप्प्यात या प्रकारे विभागली आहे – घोर निद्रा, श्रम निद्रा, मोह निद्रा (Todays Marathi Headline)
घोर निद्रा
नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती म्हणजे महिषासुराशी युध्द करण्यापूर्वीदेवी ही निद्रा घेत होती पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म-विष्णू आणि महेश देवीला आठ दिवसानंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात. या निद्रेतून जागी होऊन देवीने घोर रूप प्रकट केले या मुळे या निद्रेस घोर निद्रा म्हणतात. ही निद्रा तुळजाभवानी मंदिर संस्थानात असलेल्या चांदीच्या मंचकावर भाद्रपद वद्य अष्टमी ते भाद्रपद अमावस्या समाप्ती पर्यंत निद्रा असते आणि अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवी सिंहासनावर आरूढ होते. (Latest Marathi News)
श्रम निद्रा
घोर निद्रेतून जागी होऊन देवीने महिषासुराचे अधर्म कारस्थान पाहून त्याच्याशी युद्ध करण्यास सज्ज झाली. नऊ दिवस असुराशी युद्ध करून महिषासुर नवव्या दिवशी देवीला शरण आला आणि तिच्या चरणाशी स्थान मागून सर्व देवतांची माफी मागू लागला. नऊ दिवसाच्या अहोरात्र युद्धामुळे आलेल्या थकव्याने शारदीय नवरात्र नंतर पाच दिवस आई निद्रा घेते याला श्रम निद्रा म्हणतात. या निद्रेसाठी तुळजाभवानीचे माहेर अहमदनगरहुन पलंग येतो त्यावर आई निद्रा घेते. या निद्रेस मंचकी निद्रा म्हणतात. ही निद्रा माहेरच्या लाकडी पलंगावर अश्विन शुद्ध दशमी (दसरा) ते अश्विन शुद्ध पौर्णिमा (कोजागिरी पौर्णिमा) पर्यंत असते. नंतर देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होते. निद्रा घेण्याच्या आधी देवीला १०८ साड्या नेसवल्या जातात. (Top Trending News)
=========
Navratri : नवरात्रीमध्ये उपवासाच्या ‘या’ भन्नाट रेसिपी करा ट्राय
=========
मोह निद्रा
शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी काळात देवी निद्रीस्त असते. देवीची मोहन यात्रा हे सृजनाचे प्रतीक असून आठ दिवस निद्रा काळाचे संपल्यानंतर नवमी म्हणजेच तुळजाभवानी प्रकट दिवस किंवा जन्म दिवस असतो यामुळे या निद्रेस मोह निद्रा म्हणतात. हे नऊ दिवस म्हणजे नऊ महिन्यांचे सूचक आहेत एखादी स्त्री जशी नऊ महिन्यांनी सृजन होते तसा हा कालावधी असतो. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics