Home » Navratri :’ही’ आहेत भारतातील प्रसिद्ध देवीची मंदिर

Navratri :’ही’ आहेत भारतातील प्रसिद्ध देवीची मंदिर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Navratri
Share

येत्या २२ तारखेपासून शारदीय नवरात्राची सुरुवात होत आहे. अश्विन महिन्यात शारदीय नवरात्र साजरे केले जाते. सध्या सर्वत्र या नवरात्राची जोरदार तयारी सुरु आहे. घरासोबतच देवीच्या मंदिरांची देखील स्वच्छता आणि डागडुजी केली जात आहे. नवरात्र म्हणजे त्रिपुरसुंदरी आदिशक्तीचा उत्सव. त्यामुळे या काळात देवीच्या मंदिरांमध्ये भक्त मोठ्या संख्येने दर्शनाला जातात. नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याला मोठे महत्व आहे. त्यामुळे भाविक देशभरातील देवीच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये जातात आणि तिचा आशीर्वाद घेतात. आज आपण नवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊया भारतातील प्रसिद्ध अशा देवीच्या मंदिरांबद्दल. (Marathi News)

वैष्णो देवी मंदिर
या मंदिराबद्दल माहिती नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. केवळ भारत नाही तर जगभरातून देवीच्या दर्शनासाठी भक्त येथे येतात. भारतातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक मंदिर म्हणून वैष्णो देवी मंदिराची ख्याती आहे. जम्मू-काश्मीरच्या कटरा जिल्ह्यात असलेल्या या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते. असे मानले जाते की देवी दुर्गा येथे खडकांच्या रूपात गुहेत वास करते. हे मंदिर कटरा पासून १३ किलोमीटर वर आहे. (Navratri News)

Navratri

त्रिपुरा सुंदरी मंदिर, त्रिपुरा
हिंदू पौराणिक कथेनुसार सतीचा उजवा पाय ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यातील उदयपूर शहरात आहे. या मंदिरात काली मातेची सोरोशी रूपात पूजा केली जाते. (Todays Marathi Headline)

Navratri

मंगळा गौरी मंदिर, गया (बिहार)
गया शहरापासून काही अंतरावर असलेल्या भस्मकूट पर्वतावर शक्तीपीठ मां मंगलागौरी मंदिर आहे. माता सतीचे स्तन या ठिकाणी पडले होते, अशी धार्मिक मान्यता आहे. हे शक्तिपीठ ‘पालनहार पीठ’ किंवा ‘पालन पीठ’ या नावाने प्रसिद्ध आहे. मान्यतेनुसार, गया येथील भस्मकूट पर्वतावर सतीचे स्तन मंडल पडले आणि दोन दगड झाले. मां मंगलागौरी सदैव प्रस्तमायी स्तन वर्तुळात वास करते. या शक्तीपीठाची खास गोष्ट म्हणजे माणूस जिवंत असतानाच येथे श्राद्धविधी करू शकतो. (Todays Marathi News)

Navratri

दंतेश्वरी मंदिर, छत्तीसगड
दंतेवाडाचे प्रसिद्ध दंतेश्वरी मंदिर छत्तीसगडच्या बस्तर भागात आहे. या मंदिरात देवी सतीचे दात पडल्याची आख्यायिका असून, त्यामुळे या ठिकाणाचे नाव ‘दंतेवाडा’ पडले. हे मंदिर डंकिनी आणि शंखिनी नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. (Top Marathi News)

Navratri

दुर्गा मंदिर, वाराणसी
असे मानले जाते की हे मंदिर १८ व्या शतकात बंगाली राणीने बांधले होते. हे मंदिर उत्तर भारतीय शैलीतील नागरा शैलीत बांधले आहे. या मंदिरात चौकोनी आकाराचे तळे असून ते दुर्गा कुंड म्हणून ओळखले जाते. या इमारतीला गेरूच्या अर्काने लाल रंग दिला आहे. मंदिरातील देवीची वस्त्रेही गेरू रंगाची आहेत. एका मान्यतेनुसार, या मंदिरात स्थापित केलेली मूर्ती माणसाने बनवली नसून ही मूर्ती स्वतः प्रकट झाली होती, जी लोकांचे वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी आली होती. (Latest Marathi News)

Navratri

नैना देवी मंदिर, नैनिताल
नैनीतालमधील नैनी तलावाच्या उत्तरेकडील किनारी नैना देवी मंदिर आहे. १८८० मध्ये भूस्खलनाने हे मंदिर उद्ध्वस्त झाले. नंतर त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. येथे सतीच्या शक्तीरूपाची पूजा केली जाते. मंदिरात दोन डोळे आहेत, जे नैना देवीचे प्रतिनिधित्व करतात. या देवीच्या नावावरून या शहराचे नाव नैनिताल पडले असे सांगितले जाते. (Top Marathi Headline)

Navratri

महाकाली देवी मंदिर, उज्जैन
मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठावर प्राचीन शहर उज्जैनमधील एका छोट्या टेकडीवर महाकाली देवीचे मंदिर आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, सती देवीचे वरचे ओठ ज्या ठिकाणी आज हे मंदिर आहे त्या जमिनीवर पडले. ग्रह कालिका, महालक्ष्मी आणि सरस्वती ही इतर देवी रूपे आहेत ज्यांची येथे पूजा केली जाते. (Latest Marathi News)

Navratri

=========

हे देखील वाचा : 

Navratri 2025 : कर्नाटकातील 1000 वर्ष जुने चामुंडेश्वरी देवीचे मंदिर, वाचा पौराणिक कथा

Navratra : चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रामधील नेमका फरक कोणता?

Ghatstahpana : घटस्थापनेचे शेतीच्या दृष्टीने देखील आहे आगळे वेगळे महत्व

==========

कालीघाट मंदिर, कोलकाता
कोलकाताच्या या मंदिरात नवरात्री दरम्यान दुर्गा पूजा मोठ्या उत्साहात केली जाते. असे सांगितले जाते की देवी सतीच्या उजव्या पायाचे बोट येथे पडले होते. कालीघाट मंदिरात एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात हजारो भाविकांची गर्दी असते. हे मंदिर २००० वर्षांहून अधिक जुने आहे. (Top Trending News)

Navratri

चामुंडेश्वरी मंदिर, मैसूर
हे म्हैसूरमधील चामुंडी टेकड्यांच्या माथ्यावर वसलेले आहे. येथे सतीचे केस पडले असे म्हटले जाते आणि नंतर १२ व्या शतकात होयसला शासकांनी देवीच्या नावाने मंदिर बांधले. (Social News)

Navratri

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.