आज भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस. मोदींना कोणत्याही खास ओळखीची गरज अजिबातच नाहीये. त्यांनी त्यांच्या कामाने संपूर्ण जगात आपली दमदार ओळख तयार केली आहे. संपूर्ण जगातील सर्वात लोकप्रिय आणि शक्तिशाली नेते म्हणून मोदींची ओळख आहे. आज भारतामुळे मोदींना आणि मोदींमुळे भारताला एक जगातील लहान मोठ्या देशांमध्ये अतिशय मानाने पाहिले जाते. मोदींचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व शब्दात वक्त करणे निव्वळ अशक्य आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी शून्यातून सुरुवात करत देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत मजल मारली आहे. आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाणून घेऊया त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल. (Narendra Modi News)
१७ सप्टेंबर १९५० रोजी नरेंद्र मोदी यांचा जन्म तत्कालीन मुंबई राज्यातील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर गावात हिराबेन मोदी आणि दामोदरदास मूलचंद मोदी यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आई-वडिलांच्या सहा मुलांपैकी नरेंद्र हे त्यांचे तिसरे अपत्य होते. गरिबीने ग्रासलेल्या घरात त्यांचा जन्म जरी झाला असला तरी त्यांच्या महत्त्वाकांक्षा खूपच मोठ्या होत्या. नरेंद्र मोदी कायम शाळेत वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, पुस्तकांच्या दुनियेत रमायचे. त्यांना पोहण्याची खूपच आवड असल्याने ते वेळ मिळेल तेव्हा नदीवर पोहायला जायचे. (Modi)
नरेंद्र मोदींना बालपणापासूनच देशप्रेमाची प्रेरणा मिळाली. शालेय जीवनात ते राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) चे कॅडेट होते. नरेंद्र मोदी हे लहानपणी वडिलांना रेल्वे स्टेशनवर चहा विकण्यात मदत करायचे. तरुणपणी ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले. भ्रष्टाचारविरोधी नवनिर्माण चळवळीत त्यांनी भाग घेतला. पूर्णवेळ संघटक म्हणून काम केल्यानंतर त्यांची भारतीय जनता पक्षात संघटनेचे प्रतिनिधी म्हणून नामांकन करण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर परीक्षा दिली आणि आरएसएस प्रचारक म्हणून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. (Marathi News)
वयाच्या केवळ १७ व्या वर्षी नरेंद्र यांचे जसोदा बेन चमनलाल यांच्याशी लग्न झाले. जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा जसोदाबेन फक्त १३ वर्षांच्या होत्या. त्यांनी लग्न केले पण ते कधीच एकत्र राहिले नाहीत. लग्नानंतर काही वर्षांनी नरेंद्र मोदी घर सोडून गेले. एका माहितीनुसार नरेंद्र मोदी कुठे गेले याची कुटुंबीयांना काहीच माहिती नव्हती. दोन वर्षानंतर ते अचानक घरी आले. त्यानंतर त्यांनी ते अहमदाबादला जात असल्याचे सांगितले. तिथे त्यांनी काकांच्या कँटिनमध्ये काम केले. (Top Stories)
अहमदाबादला आल्यावर मोदींनी काही काळ काकांच्या कँटिनमध्ये काम केले. त्यानंतर स्वत:चं चहाचे दुकान उघडले. अहमदाबादच्या गीता मंदिर येथे त्यांनी चहाचा स्टोल सुरु केला. या मंदिराच्या गल्लीतूनच आरएसएसच्या स्वयंसेवकांची ये-जा सुरू असायची. मोदीही स्वयंसेवक होते. त्यामुळे त्यांचे इतर स्वयंसेवकांशी चांगले जमायचे. काही काळानंतर लक्ष्मणराव इनामदार यांना मोदींबद्दल समजले. तेव्हा इनामदार यांनी मोदींना संघाच्या केशव भवन या मुख्यालयात येऊन राहण्याचा सल्ला दिला. (Marathi News)
त्यानंतर मोदी केशव भवनमध्ये राहू लागले. केशव भवनची देखरेख करत सर्वांसाठी ते नाश्ताही बनवायचे. केशव भवनची साफसफाई आणि इतर कार्यालयांची साफसफाई करण्याचं कामही ते करत होते. याच केशव भवनमध्ये त्यांनी संघटना बांधणीचे धडे गिरवले. त्याकाळात देशात आणीबाणी होती. आणीबाणीच्या काळात अंडरग्राऊंड झालेल्या कार्यकर्त्यांना प्रचाराचे साहित्य पोहोचवण्याची जबाबदारी मोदींवर होती. आणीबाणी संपल्यानंतर संघाने मोदींवर अजून जबाबदाऱ्या दिल्या. त्यांना संघ आणि इतर संघटनांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे मोदींचा पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश झाला. (Latest Marathi Headline)
आणीबाणीच्या काळात मोदींनी ‘संघर्ष मा गुजरात’ हे पुस्तक अवघ्या २३ दिवसांत लिहिले. तत्कालीन मुख्यमंत्री बाबूभाई जसभाई पटेल यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. ज्यामुळे मोदींच्या लेखन कौशल्याची झलक दिसली. मोदी गुजरातचे चारवेळा मुख्यमंत्री झाले. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणूनही घोषित झाले. त्यांनी २०१४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली. नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसीमधून भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. (Political News)
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी वडोदरा आणि वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांना दोन्ही जागांवर जास्त मोठ्या प्रमाणात मतं मिळाली होती. त्यानंतर त्यांनी वडोदराची जागा सोडली. याच निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आणि केंद्रात संपूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही मोदींची जादू पाहायला मिळाली. ते सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. त्यानंतर २०२४ साली तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले. (Todays Marathi Headline)
पंतप्रधान मोदी यांना पर्यावरणाची, तंत्रज्ञानाही, फोटोग्राफीची खूपच आवड आहे. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात जन धन योजना, मेक इन इंडिया, प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना, अटल पेन्शन योजना, डिजिटल इंडिया मिशन इत्यादी सुमारे १०० नवीन लोककल्याणकारी योजना राबवण्यात आल्या. तसेच पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात २ कोटी शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट आहे. नरेंद्र मोदी २४ तासांपैकी १८ तास काम करतात. (Top Marathi Headline)
नरेंद्र मोदींच्या दिवसाची सुरुवात योगाने होते. नरेंद्र मोदी पूर्णपणे शाकाहारी पदार्थ खातात. मोदी खूप वक्तशीर आहेत, ते दिल्लीत असतील तर सकाळी ९.३० वाजता कार्यालयात पोहोचतात. मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष (भाजप) दरवर्षी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान “सेवा पखवाडा” आयोजित करतो, ज्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. (Marathi Latest News)
=========
हे देखील वाचा : Nepal : या होणार नेपाळच्या पंतप्रधान !
=========
जेव्हा दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ला घडवून देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करताच या कणखर नेतृत्वाने बालाकोटचा ‘सर्जिकल एअर स्ट्राईक’ करून पहिल्यांदाच शञू राष्ट्र पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. नुकतेच ऑपरेशन सिंदूर राबवून त्यांनी पहलगाम येथील दहवाद्यांच्या हल्ल्याचा बदल घेतला. मोदीजींनी ३७० कलम हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आणि जम्मू- काश्मीरपासून लडाखला स्वतंत्र केलं. राम मंदिर- बाबरी मशिदीसारखा जटिल प्रश्नही मोदीजींनी कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊन सोडवला. (Top Trending News)
अनेक दशकांपासून प्रलंबित असे राम मंदिर ही बांधून दाखवले. मुस्लिम महिलांना ‘तीन तलाख’वाला बुरख्यातून बाहेर काढण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. मोदींजी आंतरराष्ट्रीय पातळीवरील “जी 20 समिट” सारखी महत्वाची परिषद भारतात भरवली. त्यांना आजवर देश विदेशातील अनेक लहान मोठ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. आजही मोदी मोठ्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आपले काम करत देशाला पुढे नेण्यास प्रयत्न करताना दिसत आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics