लवकरच शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे. देवीच्या आराधनेचा हा काळ अतिशय पवित्र मानला जातो. या नऊ दिवसांच्या काळात देवी तत्व सर्वात जास्त जागृत असते अशी मान्यता आहे. त्यामुळे या काळात देवीची केली जाणारी उपासनी नक्कीच फळते आणि आपल्याला इच्छित आशीर्वाद मिळतो असे सांगितले जाते. नवरात्रीचा सण अतिशय महत्वाचा असतो. या दिवसांमध्ये देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी लोकं विविध पद्धतीने तिची आळवणी करतात. अनेक लोकं या काळात देवीचे पाठ करतात, घरात घट बसवतात तर बहुसंख्य लोकं नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचा उपवास करतात. (Navratri)
आता प्रत्येकाच्या उपवासाचे स्वरूप खूपच वेगळे असते. काही जणं एकभुक्त करतात आणि रात्री जेवतात. मात्र जेवणात देखील खास पदार्थच खातात. काही जणं दोन्ही वेळेस उपवासाचेच पदार्थ खातात. तर काही जणं केवळ फळं खातात. आता नऊ दिवसांचा उपवास म्हटल्यावर दोन्ही वेळेस काय बनवावे असा प्रश्न घरातील गृहिणींना सतत पडतो. उपवास असल्याने मर्यादित पदार्थ खाता येतात. त्यातही ते पोटभरीचे, हेल्दी आणि शरीराला पुरेल एवढी एनर्जी देणारे असे पदार्थ असावे असे सगळ्यांनाच वाटते. पण नक्की सुचतच नाही काय करावे. तुमचा हाच प्रश्न सोडवण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी नवरात्रीमध्ये खाता येतील अशा काही पदार्थांच्या रेसिपी घेऊन आलो आहोत. (Marathi News)
राजगिरा पुरी
साहित्य –
२ वाटी राजगिऱ्याचे पीठ, १/२ वाटी शिंगाड्याच पीठ, १/२ वाटी शेंगदाण्याचा कूट, ४ ते ५ हिरव्या मिरच्यांची पेस्ट, १ चमचा लाल तिखट, सैंधव मीठ चवीपुरती, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल किंवा तूप.
कृती –
प्रथम राजगिरा पीठ आणि शिंगाड्याच पीठ एकत्र करून चाळून घयावे. आता हे पीठ हलके गुलाबी रंग येई पर्यंत भाजून घ्या. एका ताटलीत हे दोन्ही पीठ घालून वरील सर्व साहित्य मिसळून कणीक मळावी आणि काही काळ तसेच ठेवावे. आता या कणकेचे गोळे करून पुऱ्या लाटून तेलात किंवा तुपात सोडून खमंग असे तळून घ्याव्या. तयार गरम पुऱ्या हिरव्या चटणी, उपवासाची बटाट्याची भाजी किंवा दह्याच्या रायता सोबत खाव्या. (Todays Marathi Headline)
______________________________________________________________________________________________________________________________________
बीटरूट चिप्स –
हे चिप्स बनवण्यासाठी फक्त ताजे बीटरूट घ्यावे. प्रथम बीट पूर्णपणे स्वच्छ धुऊन घ्या. नंतर पातळ पातळ स्लाइस कापून घ्या. आता तूप मध्यम आचेवर गरम होऊ द्या. त्यात चिरलेला बीटरूट घालून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तुपातून चिप्स काढून त्यावर मीठ घालून सर्व्ह करा. (Latest Marathi Headline)
______________________________________________________________________________________________________________________________________
केळी चिप्स
केळीचे चिप्स बनवण्यासाठी सर्वप्रथम पाण्यात हलके खडे मीठ टाका आणि केळी काही वेळ उकळा. त्यानंतर केळीची साल काढून त्याचे पातळ तुकडे करा. येथे कढईत मध्यम आचेवर तूप गरम करा. केळी तळण्याआधी तुपात खडे मीठ टाका. नंतर त्यात केळीचे तुकडे घालून ते कुरकुरीत होईपर्यंत तळा. नंतर बाहेर काढून टिश्यू पेपरवर थोडा वेळ सोडा. (Marathi News)
______________________________________________________________________________________________________________________________________
शिंगाड्याच्या पिठाचा शिरा
शिंगाड्याचे पीठ – १ कप, साखर – ३ ते ४ चमचे, वेलची पावडर – अर्धा चमचा, आवडीचे ड्रायफ्रुटस, पाणी किंवा दूध – आवश्यकतेनुसार
कृती
सर्वप्रथम एक कढई घेऊन त्यात तूप घाला. तूप चांगले तापले की, त्यात शिंगाड्याचे पीठ घालून घालून भाजून घ्या. पीठ गोल्डन ब्राऊन झाल्यावर गरजेनुसार पाणी किंवा दूध घालावे. या मिश्रणाला सतत ढवळत राहा. दूध किंवा पाणी पूर्णपणे सुकल्यावर त्यात साखर घाला आणि ढवळत राहा. तीन-चार मिनिटे शिजल्यानंतर गॅस बंद करा. आता त्यात ड्रायफ्रुट्स बारीक करून टाका. नंतर त्यात वेलची पूड घालून मिक्स करा. (Top Marathi Headline)
______________________________________________________________________________________________________________________________________
साबुदाणा थालिपीठ
१ कप भिजवलेला साबुदाणा, १ मध्यम उकडलेला बटाटा, २ हिरव्या मिरच्या, २ टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट, १/२ टीस्पून जिरे, सैंधव मीठ चवीनुसार, तेल / तूप, कोथिंबीर
कृती
एका मोठ्या बाऊलमध्ये उकडलेला बटाटा, साबुदाणा, हिरव्या मिरची, शेंगदाण्याचा कूट, जिरे आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून हाताने थालिपीठाच्या आकारात पसरवा. तवा गरम करून त्यावर थोडे तेल किंवा तूप लावा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजा. (Latest Marathi News)
______________________________________________________________________________________________________________________________________
बटाट्याचे थालिपीठ
१ कप उपवासाचे पीठ (साबुदाणा, वरई/भगर, राजगिरा, शिंगाडा किंवा तुमच्या आवडीचे पीठ), १ मध्यम उकडलेला बटाटा, २ हिरव्या मिरच्या, १/४ टीस्पून सैंधव मीठ, १/४ कप शेंगदाण्याचा कूट, तेल / तूप, कोथिंबीर (Top Trending News)
कृती
उकडलेला बटाटा चांगला किसून घ्या. एका मोठ्या वाटीत बटाटा,आवडीचे पीठ, हिरव्या मिरची, हळद, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट मिसळा. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून हाताने थालिपीठाच्या आकारात पसरवा. तवा गरम करून त्यावर थोडे तेल किंवा तूप लावा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजा. (Social News)
______________________________________________________________________________________________________________________________________
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics