Home » Coffee History : हे ३ देश चक्क कॉफीमुळे अस्तित्वात आले ?

Coffee History : हे ३ देश चक्क कॉफीमुळे अस्तित्वात आले ?

by Team Gajawaja
0 comment
Coffee History
Share

कॉफी (Coffee)हे आज जगभरात प्यायलं जाणारं एक लोकप्रिय पेय / ड्रिंक आहे. सकाळची झोप उडवण्यासाठी असो, कामाचा स्ट्रेस आल्यावर स्ट्रेस फ्री होण्यासाठी असो किंवा एखाद्या रोमँटिक डेटवेळी असो कॉफी कायमच सोबत असते. काही लोकांना कॉफी जगण्याचा अविभाज्य भाग वाटते, तर काहींना ती अजिबात आवडत नाही. चहाप्रेमी आणि कॉफीप्रेमी यांच्यातल कॉल्डवॉर तर नेहमीच सुरू असतं. पण या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या कॉफीमागे एक असा इतिहास आहे, ज्यामुळे एक अख्खं साम्राज्य लयाला गेलं होतं. आश्चर्य वाटलं असेल ना, की तुम्ही रोज पिता त्या कॉफीमुळे एक अख्खं साम्राज्य कसं लयास गेलं? कोणतं आहे हे साम्राज्य? चला जाणून घेऊ एक रंजक इतिहास.. काय आहे यामागची गोष्ट जाणून घेऊ. (Coffee History)

तर सोळाव्या शतकाच्या सुमारास टर्कीत “कावा” नावाचा कॉफी प्रकार अस्तित्वात होता. त्यावेळी ऑटोमन साम्राज्याचा प्रभाव युरोपपासून पर्शियापर्यंत पसरलेला होता. त्यामुळे कावा हा कॉफीचा प्रकार सर्वदूर पसरला आणि लोकप्रिय झाला होता. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा ऑटोमन साम्राज्याचा पाडाव होण्यास सुरुवात झाली, त्यात या ‘कावा’ कॉफीने छोटा परंतु लक्षणीय वाटा उचलला होता. त्याच झालं असं सुलतान सुलेमानने जेव्हा येमेनमध्ये आपले सरदार पाठवले, तेव्हा त्यांनी “कहावा” नावाची कॉफी चाखली. तिचा स्वाद इतका वेगळा आणि इंटरेस्टिंग वाटला की ती थेट राजधानी कॉन्स्टँटिनोपल, म्हणजेच आजच्या इस्तंबूलमध्ये आणली गेली. लवकरच ती दरबारातून बाहेर पडून लोकांपर्यंत पोहोचली. (Top Stories)

Coffee History

त्याकाळी कॉफी बनवणं हा एक प्रकारचा सन्मान समजला जाई आणि ती कॉफी तयार करणाऱ्या लोकांना ‘कॉफी मास्टर’ म्हणून संबोधले जात असे. या लोकांकडे ८/१० Assistant असायचे. अरेबिका या बियांपासून तयार होणाऱ्या या पेयाची चव कडवट होती, पण हळूहळू तिच्यात नवे प्रयोग सुरू झाले. सुलतान सुलेमानची पत्नी हिने कॉफी पाण्यात मिसळून प्यायली आणि ती पद्धत इतकी आवडली की आजही तुर्कीमध्ये तशीच कॉफी प्यायली जाते.

या कॉफीवरून सुरुवातीला काही धार्मिक वाद निर्माण झाले. मुस्लिमांना या उत्तेजक कॉफीचा आस्वाद घेता यावा यासाठी परवानगी दिली होती, असं लोकांनी गृहित धरलं. पण इस्लामिक दस्तऐवजांमध्ये भाजलेल्या द्रव्याला मनाई होती, त्यामुळे कॉफीवरही बंदी असावी का असा प्रश्न निर्माण झाला. पण लोकांच्या उत्साहावर त्याचा परिणाम झाला नाही. १५५५ साली दोन सीरियन व्यापाऱ्यांनी इस्तंबूलमध्ये पहिलं कॉफी शॉप सुरू केलं आणि पाहता पाहता शहरभरात कॉफी शॉप्स उभी राहिली.(Coffee History)

पण पुढे कॉफी शॉप्स हे फक्त पेय मिळवण्याचं ठिकाण राहिलं नाही. तिथे लोक तासनतास बसून राजकारण, समाजकारण आणि तत्त्वज्ञानावर चर्चा करू लागले. शिक्षण नसलेले लोकसुद्धा या चर्चेतून नवे विचार आत्मसात करू लागले. हळूहळू हीच कॉफी शॉप्स असंतोषाचं आणि बंडखोरीचं केंद्र बनली. अठराव्या शतकात काही शासकांनी त्यावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला, पण कॉफी शॉप्समधून मिळणारा महसूल एवढा मोठा होता की पूर्ण बंदी घालता आली नाही. एकोणिसाव्या शतकात या कॉफी शॉप्सची लोकप्रियता कमालीची वाढली. पूर्व युरोपमधील ख्रिस्तीबहुल भागात राष्ट्रवादी भावना पेट घेऊ लागल्या. ग्रीस, सर्बिया आणि बल्गेरियाच्या स्वातंत्र्य संग्रामांची आखणी ह्याच कॉफी शॉप्समध्ये झाली. पुढे यातूनच १८२१ मध्ये ग्रीस स्वतंत्र झालं, १८३५ मध्ये सर्बियाने स्वातंत्र्य मिळवलं आणि त्यानंतर बल्गेरियानेही स्वतःचा राष्ट्रवाद उभारला. या हालचालींमुळे ऑटोमन साम्राज्याची पायाभरणी हादरली.(Top Stories)

===============

हे देखील वाचा : Ravi Shankar : जेव्हा मुस्लीम घरात ‘सरस्वती’ आणि ‘अन्नपूर्णा देवी’ने जन्म घेतला !

===============

नक्कीच, साम्राज्याच्या लयामागे राजकीय अकार्यक्षमता, परकीय आक्रमणं आणि आर्थिक संकटं अशी अनेक कारणं होती. पण कॉफी शॉप्सनी सामान्य जनतेला एकत्र येण्याचं व्यासपीठ दिलं, विचारांची देवाणघेवाण घडवली आणि बंडखोरीच्या ठिणग्या चेतवल्या. थोडक्यात असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की कॉफीच्या कपातून इतिहास बदलला. ऑटोमन साम्राज्याचं अस्तित्व कमी होत गेलं, पण कॉफीचा प्रवास मात्र थांबला नाही. कावा या पेयाचं वेगवेगळ्या प्रकारात रुपांतर झालं. ग्रीक, क्रोएशियन आणि अरेबिक कॉफी या स्वरूपात ती पुढे पसरली. चीनमध्ये तर लोकांना कॉफी पिणं सोपं व्हावं म्हणून कपचा शोधही लागला. काळानुसार कॉफीच्या असंख्य शैली जगभर पसरल्या. तरीही तुर्की कॉफीचा गडद, कडवट आणि खास स्वाद आजही लोकांना आकर्षित करतो.(Coffee History)

आज कॉफी ही फक्त पेय नसून जीवनशैलीचा भाग बनली आहे. मोठ्या कॅफे चेनपासून ते रस्त्याच्या गल्ल्यांपर्यंत कॉफी सर्वत्र उपलब्ध आहे. लाखो लोक दररोज कॉफीचा आनंद घेतात. पण त्यांना फार कमी लोकांना माहिती असतं की या साध्या दिसणाऱ्या पेयामागे एक अख्खं साम्राज्य धुळीस मिळवण्याचा इतिहास दडलेला आहे. कॉफी फक्त झोप उडवणारी नव्हती, ती विचारांना जागं करणारी, क्रांतीला प्रेरणा देणारी ठरली इतकंच !

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.