Home » ITR : इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? ते भरण्याचे फायदे कोणते?

ITR : इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? ते भरण्याचे फायदे कोणते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
ITR
Share

दरवर्षी भारतातील सर्वच नोकरदार, व्यावसायिक लोकं इन्कम टॅक्स रिटर्न भरतात. अनेकांच्या तोंडून आपल्याला याबद्दल ऐकायला मिळते. ऑफिसेसमध्ये देखील याबद्दल माहिती दिली जाते. काही ऑफिसेसमध्ये तर ऑफिसच कर्मचाऱ्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न भरते. भारतातील एक जागरूक नागरिक म्हणून आपल्याला दरवर्षी इन्कम टॅक्स भरणे आवश्यक आहे. आज १५ सप्टेंबर केंद्र सरकारने वित्त-वर्ष २०२४-२५ साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलैवरून वाढवून १५ सप्टेंबर २०२५ केली होती.

आज हा ITR भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज सर्वच लोकांची इन्कम टक्स भरण्यासाठी नुसती घाई चालू असेल. त्यात इन्कम टॅक्स भरायची साईट स्लो झाल्यामुळे अनेकांची नुसती चीड चीड होत असेल. मात्र नक्की इन्कम टॅक्स रिटर्न असते तरी काय? का दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागतो? आता अनेकांना याबद्दल पूर्ण माहिती असेल तर काहींना पुसटशी कल्पना असेल. आज आपण या लेखातून याबद्दल माहिती जाणून घेऊया. (ITR)

इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय?
इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR नावाचा एक फॉर्म आहे. या फॉर्मद्वारा तुम्ही भारतात केंद्र सरकारच्या आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाविषयी माहिती देता. इन्कम टॅक्स भरणे म्हणजे तुम्ही तुमच्या उत्पन्नावर काही कर असेल तर तो भरतात. यामध्ये करदात्यांच्या वैयक्तिक आणि आर्थिक डेटाशी संबंधित तपशील असतो. आयटीआर बहुतेक इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये दाखल केला जातो. परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी ते मॅन्युअली फाइल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. (Marathi Headline)

करदाता कोण असतो?
करदाता ही एक व्यक्ती, फर्म, ट्रस्ट, कंपनी किंवा समाज देखील असू शकतो. आयकर भरताना व्यक्तीला कोणतेही कागदपत्र जोडावे लागत नाही. करदात्याने दाखल केलेला ITR आधार मोबाईल नंबर किंवा इंटरनेट बँकिंग वापरून तयार केलेल्या OTP द्वारे ई-पडताळणी केली जाते तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते. तुम्ही कराच्या स्वरूपात सरकारला काही अधिक पैसे द्याल किंवा सरकार तुम्हाला काही पैसे परत करेल. (Top Marathi News)

ITR भरणे आवश्यक का आहे?
आयटीआर दाखल करणे म्हणजे केवळ कर भरणे नाही तर ते तुमच्या आर्थिक विश्वासार्हतेचा पुरावा देखील आहे. आयटीआर दाखल केल्याने कर्ज, व्हिसा किंवा क्रेडिट कार्ड मिळवणे सोपे होते. तुम्ही सरकारी योजना आणि अनुदानांचा देखील लाभ घेऊ शकता. जर तुमचे उत्पन्न आयटीआरच्या कक्षेत येत असेल आणि तुम्ही आयटीआर दाखल केला नाही, तर आयकर विभाग दंड देखील आकारू शकतो. (Todays Marathi Headline)

ITR

ITR कोण फाइल करू शकतो?
जर तुमचे वार्षिक उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मूलभूत सूट मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही आयटीआर दाखल करावा. सध्याच्या नियमांनुसार तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही आयकर परतावा भरायला हवा. तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल, तर आयटीआर भरणं गरजेचे असते. तुमचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल म्हणजे तुमचे उत्पन्न करपात्र नसेल, तरीही रिटर्न भरलेला चांगला. (Latest Marathi Headline)

=========

Gemini : Google Gemini Retro फोटो तयार करायचा? मग करा ‘या’ स्टेप फॉलो

=========

करातून सूट कोणाला देण्यात आली?
– एखाद्या व्यक्तीचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपये असेल तर अशा व्यक्तीला कोणताही कर भरावा लागत नाही. या आकड्याची मर्यादा ओलांडणाऱ्या व्यक्तीला आयटीआर दाखल करावा लागेल. (Top Marathi Headline)

– जर एखाद्या व्यक्तीचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आणि ८० वर्षांपेक्षा कमी असेल आणि वार्षिक उत्पन्न ३ लाख असेल तर त्या व्यक्तीलाही कराच्या कक्षेतून बाहेर ठेवले जाईल.

– जर एखाद्या व्यक्तीचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तिचे वार्षिक उत्पन्न ५ लाख असेल तर त्या व्यक्तीला कराच्या मर्यादेतून बाहेर ठेवले जाईल.

ITR कोणी भरावा?
– जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न विहित मर्यादेनुसार असेल परंतु एक किंवा अधिक चालू खात्यांमध्ये एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम किंवा एकूण रक्कम जमा केली असेल तर ती आयटीआरच्या कक्षेत ठेवली जाईल. (Latest Marathi News)

– प्रत्येक कंपनी आणि फर्मला तोटा असो वा नफा असो, त्यांना ITR भरावा लागतो.

– जर एखाद्या व्यक्तीने परदेशात २ लाखांपेक्षा जास्त खर्च केला तर त्याला देखील ITR च्या कक्षेत ठेवले जाईल.

– जर एखाद्या व्यक्तीने वीज वापरावर १ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला तर त्याला देखील ITR भरणे बंधनकारक आहे.

ITR

ITR का भरावा?
– जर तुम्ही ITR भरला नाही तर तुम्हाला ५,००० रुपये दंड होऊ शकतो. यासह, आयकर कायदा १९६१ नुसार, आयटीआर दाखल करण्यास विलंब झाल्यास व्याज लागू केले जाऊ शकते. (Marathi News)

– जर तुम्हाला आयटीआर भरण्यास उशीर झाला, तर तुम्हाला आयटी विभागाकडून नोटीस पाठवली जाईल आणि तुम्ही कायदेशीर अडचणीतही येऊ शकता. नोटिशीला दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आल्यास, तुमच्यावर कायदेशीर कारवाईही केली जाऊ शकते.

– जर तुम्ही नेहमी वेळेवर ITR भरला असेल तर तुम्हाला कर्ज सहज मिळू शकते. (Top Stories)

– अनेकदा, जेव्हा तुम्ही व्हिसासाठी अर्ज करता तेव्हा दूतावासाकडून तुम्हाला आयटीआरची हिस्ट्री सबमिट करण्यास सांगितले जाते. जर तुम्ही वेळेवर ITR भरला असेल तर तुम्हाला व्हिसा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

– कधीकधी मोठे व्यवसाय सौदे, व्यवसाय कर्ज किंवा निविदा मिळविण्यासाठी आयटीआर आवश्यक असू शकते.

– वेळेवर आयटीआर दाखल करून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर देखील मजबूत करू शकता. यावरून तुम्ही एक जबाबदार करदाता आहात हे दिसून येते.

– कधीकधी, मोठी विमा पॉलिसी खरेदी करतानाही आयकर रिटर्नची माहिती मागितली जाऊ शकते. याशिवाय, म्युच्युअल फंड, शेअर बाजार इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देखील आयटीआर आवश्यक असू शकतो. (Top Trending News)

ITR कसा भरायचा?
तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने ITR भरू शकता. ऑनलाइन भरण्यासाठी आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट द्या (https://www.incometax.gov.in/iec/foportal/).

=========

Engineers Day : १५ सप्टेंबरला ‘इंजिनियर्स डे’ का साजरा केला जातो?

=========

कुठला ITR फॉर्म भरायचा?
ITR – 1 : तुम्ही नोकरदार असाल, एकच घर असेल आणि उत्पन्नाचे इतर काही स्रोत असतील आणि कुटुंबाचं एकूण उत्पन्न ५० लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला ITR-1 सहज हा फॉर्म थेट ऑनलाईन भरता येईल.

ITR – 2 : तुमचे उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त असेल, तुम्ही एखाद्या कंपनीचे डायरेक्टर असाल, शेअरविक्रीतून तुम्हाला फायदा-तोटा झाला असेल, तुमची एकापेक्षा जास्त घरं असतील, परदेशात काही मालमत्ता किंवा उत्पन्न असेल, शेतीतून पाच हजारांवर उत्पन्न मिळत असेल तर ITR -2 हा फॉर्म भरायला हवा. (Social News)

ITR-3 : तुम्हाला धंदा किंवा व्यवसायातून उत्पन्न मिळत असेल तर ITR-3 भरायला हवा.

ITR-4 : तुम्ही संभाव्य उत्पन्नावर कर भरणार असाल तर ITR-4 वापरला जातो. खासगी सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींचाही यात समावेश होतो.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.