Home » Ghatstahpana : घटस्थापनेचे शेतीच्या दृष्टीने देखील आहे आगळे वेगळे महत्व

Ghatstahpana : घटस्थापनेचे शेतीच्या दृष्टीने देखील आहे आगळे वेगळे महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ghatstahpana
Share

येत्या २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्राची सुरुवात होत आहे. नवरात्र म्हणजे आदिमाया, आदिशक्ती असलेल्या देवीच्या उपासनेचा काळ. या नऊ दिवसांच्या काळात देवीची आराधना केल्यास नक्कीच देवी पावते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत आपल्याला अपेक्षित आशीर्वाद देखील देते अशी मान्यता आहे. संपूर्ण वर्षातील एक महत्वाचा सण म्हणून नवरात्राला ओळखले जाते. भारतामध्ये खासकरून महाराष्ट्र्र, गुजरात, उत्तर भारत याठिकाणी या उत्सवाचे स्वरूप मोठे असते. (Marathi)

वेगवेगळ्या पद्धतीने, आपल्या परंपरेनुसार नवरात्र साजरे केले जाते. महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्रामध्ये नवरात्रामध्ये घटस्थापना केली जाते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील घरांमध्ये घट बसवले जातात. यादिवशी काळ्यामातीवर कलश ठेवला जातो. या मातीवर सात प्रकारची धान्ये पेरली जातात. कलशावर फुलांची, विड्याच्या पानांची माळ देखील लावली जाते. या घटस्थापनेला धार्मिक महत्व तर आहेच मात्र यासोबतच घटस्थापनेचा संबंध शेतीशी देखील जोडला गेला आहे. (Marathi News)

घटस्थापना किंवा नवरात्र हे पावसाळा संपायच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी पिकांचा हंगाम सुरु होण्याआधी केली जाते. ही कृषी आधारित वैज्ञानिक संकल्पना आहे. बियाणे, माती, पाणी आणि हवामानाची चिकित्सा करणारी पारंपारिक पद्धत आहे. असे असले तरी यातून शास्त्रीय दृष्टीकोण देखील दिसून येतो. घटस्थापना करताना एका पत्रावळीवर शेतातील काळी माती टाकली जाते. या मातीमध्ये विविध प्रकारचे सात धान्य टाकले जाते. त्यावर एक कच्च्या मातीचा घट किंवा कलश ठेवला जातो. या घटामध्ये नऊ दिवस रोज पाणी घातले जाते. नवव्या दिवशी घटाचे विसर्जन केले जाते. (Todays Marathi Headline)

Ghatstahpana

आजकाल शहरात जी माती मिळेल ती घातला वापरण्यात येते. मात्र पूर्वी असे नव्हते. घटासाठी वापरण्यात येणारी माती ही शेतातील काळी मातीच असायची. आजही गावांमध्ये ही परंपरा पाळली जाते. घटासाठी शेतकरी आपल्याच ज्या शेतात तो रब्बी पिक घेणार आहे त्याच शेतातील माती वापरतात. कारण ज्या शेतात तो पिक घेणार आहे त्या शेतातील मातीचे हे परिक्षण असते. घटस्थापनेच्या वेळी या मातीत मिसळलेले जाणारे बियाणे शेतकरी रब्बी हंगामात जे पिक घेणार असतात त्याच पिकाचे बियाणे टाकतो. त्या मागचा हेतू त्याच्या शेतात वापरले जाणाऱ्या बियाणांची उगवण्याची क्षमता किती आहे हे तपासले जाते. (Top Marathi News)

घटामध्ये नऊ दिवस जे पाणी घातले जाते ते पाणी शेतकरी त्याच्या शेतासाठी ज्या जलस्त्रोत्राचे पाणी वापरतो तिथलेच असते. घट हा मातीचा आणि कच्चा भाजलेलाच वापरला जातो. तो इतर कोणत्याही धातुचा वापरायचा नसतो. कारण घटामध्ये ओतलेले पाणी सतत पाझरणे आवश्यक असते. जेणेकरुन त्याच्या खाली शंकू आकारात ठेवलेल्या मातीत आणी त्यात टाकलेल्या बियांना रुजण्यासाठी त्याची उपलब्धता होते. (Latest Marathi News)

=========

Navratra : घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Navratra : शारदीय नवरात्र का साजरे केले जाते?

=========

घट नऊ दिवसच का बसवला जातो यामागे देखील एक कारण आहे. बियांना रुजून अंकुर बाहेर येईपर्यंत आठ दिवसाचा कालावधी लागतो. नवधान्यांची पेरणी करून त्यावर रोज थोडे पाणी शिंपडल्याने त्याला कोंब फुटतात. हे कोंब म्हणजे भविष्यातील भरघोस कृषीचे-उत्पन्नाचे हे सूचक असते. याकाळामध्ये घटामधील बियाणांची उगवण्याची क्षमता रोज तपासली जाते. (Top Trending News)

नवव्या दिवशी घट उचलले जातात. घटामध्ये उगवून आलेल्या पिकाची पहाणी केली जाते. जे पीक जोमाने आले आहे तेच पीक शेतात पेरण्यासाठी निवडले जाते. घटावरील उगवलेले धान्य किंवा पीक काढून त्याचा तुरा शेतकरी, घरातील स्त्रिया त्यांच्या डोक्यात घालतात किंवा त्याची अंगठी करुन हातातही बांधली जाते. घटस्थापनेदरम्यान झालेली पिकांची उगवण आणि वाढ पाहून शेतकरी पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन करू शकतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.