Home » Nepal : सुशीला कार्कींचे पती भारताच्या तुरुंगात का होते ?

Nepal : सुशीला कार्कींचे पती भारताच्या तुरुंगात का होते ?

by Team Gajawaja
0 comment
Nepal
Share

नेपाळच्या अंतरिम प्रमुख होण्याच्या शर्यतीमध्ये माजी निवृत्त मुख्य न्यायाधीश सुशीला कुमारी यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. नेपाळमध्ये सुशीला कार्कीं यांची ओळख भ्रष्टाचार आणि संधीसाधू राजकारणाविरुद्ध घेतलेल्या त्यांच्या निर्णयांनी आहे. शिवाय सुशीला कार्कीं यांची ओळख त्यांच्या पतीच्या नावापासूनही आहे. 1973 मध्ये नेपाळच्या एका विमानाचे अपहरण झाले होते, त्या अपहरणात सुशीला कार्कीं यांचे पती मुख्य आरोपी होते. या गुन्ह्याखाली त्यांनी भारताच्या तुरुंगात 40 वर्षाची शिक्षा भोगली आहे. सुशीला कार्की आणि दुर्गा प्रसाद सुवेदी यांची प्रेमकहाणी एखाद्या बॉलिवूड-हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. 1970 च्या दशकात बनारस हिंदू विद्यापीठातून सुरु झालेली ही प्रेमकहाणी नेपाळच्या लोकशाहीच्या प्रवासातील बळी ठरली. 73 वर्षाच्या सुशीला कार्कीं यांच्या हाती जर आता नेपाळच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व आले, तर या प्रेमकहाणीतला हा पहिला सकारात्मक टप्पा ठरणार आहे. (Nepal)

नेपाळच्या अंतरिम प्रमुख होण्याच्या सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांची प्रेमकहाणी आता चर्चेत आली आहे. ही प्रेमकहाणी सुरु झाली ती भारतातील प्रतिष्ठित बनारस या शहरापासून. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये सुशीला कार्कीं आणि त्यांचे पती दुर्गा प्रसाद सुवेदी हे दोघंही विद्यार्थी होते. नेपाळमधील विराटनगर येथे जन्म झालेल्या सुशील यांचे प्राथमिक शिक्षण विराटनगरमध्येच झाले. त्यांच्या वडिलांना त्यांना डॉक्टर करायचे होते. मात्र सुशीला यांना वकील होण्याची इच्छा होती. त्यामुळे त्या नेपाळमधील शिक्षणानंतर बनारसमधील बनारस हिंदू विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी दाखल झाल्या. (International News)

सुशीला यांनी राज्यशास्त्रात एमए पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. बनारस विद्यापीठात सुशीला या दोन वर्ष होत्या. बनारस विद्यापीठात नेपाळमधील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. 70च्या शतकातही ही संख्या मोठी होती. याच विद्यार्थ्यांमध्ये दुर्गा प्रसाद सुबेदी होते. त्यावेळी नेपाळमध्ये पंचायत राजवट होती. बनारसमध्ये शिकणाऱ्या नेपाळी तरुणांचा एक गट होता. हा गट या व्यवस्थेविरुद्ध लढा देत होता. नेपाळमधील या परिस्थितीला कसे सामोरे जावे, यासाठी हे विद्यार्थी बैठका घेत. विचारांची देवाणघेवाण करीत असत. अनेकवेळा या विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद होत असत. काही विद्यार्थी क्रांतिकारी योजना आखत असत. याच गटात सुशीला कार्की आणि दुर्गा प्रसाद सुबेदी हे दोघंही होते. या दोघांची ओळख झाली. दोघंही मत प्रभावीपणे व्यक्त करीत होते. (Nepal)

ही सुरुवातीची ओळख या प्रभावी विचारांमुळे प्रेमात बदलली. दुर्गा प्रसाद यांचा जन्म धनकुटा येथील एका साध्या शेतकरी कुटुंबात झाल्यामुळे त्यांनी श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरीचा अधिक अनुभव घेतला होता. त्यामुळे त्यांचा ओढा समाजवादी विचारांकडे होता. सुशीला यांनीही दुर्गा यांच्या विचारांना पाठिंबा दिला. पुढे दोघेही बनारस हिंदू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भेटू लागले. या दोघांचे लग्नही बनारसमध्येच झाल्याची माहिती आहे. एका मुलाखतीमध्ये दुर्गा प्रसाद यांनी सांगितले होते की, लग्नाच्यावेळी हारही आणण्याचे पैसे त्यांच्याकडे नव्हते. सुशीला यांनी अत्यंत साधेपणानं हा विवाह केला, आणि दुर्गा यांच्या मागे त्या उभ्या राहिल्या. त्यानंतर हे जोडपे नेपाळमध्ये परतले. नेपाळमध्ये सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून हे जोडपे महत्त्वाचे मानले जाते. सुशीला काठमांडूमधील त्रिभुवन विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेऊ लागल्या. तर दुर्गा नेपाळमध्ये राजकारणात उतरले. (International News)

दुर्गा सुबेदी नेपाळी काँग्रेसच्या एक प्रमुख तरुण नेते म्हणून उदयास आले. त्यांनी नेपाळमधील पंचायत राजवटीविरुद्ध चळवळ सुरू केली. दरम्यान सुशीला यांनी वकीलाचा व्यवसाय स्वीकारला. यातूनच नेपाळची एक निर्भय न्यायाधीश म्हणून त्यांची ओळख झाली. पण दुर्गा प्रसाद यांनी पंचायत राजवटीविरुद्ध आणि लोकशाहीच्या समर्थनार्थ एक वेगळाच मार्ग अवलंबला आणि या दोन प्रेमींमध्ये 40 वर्षाचा दुरावा आला. 1973 मध्ये, वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी, दुर्गा प्रसाद यांनी रॉयल नेपाळ एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले. त्यांनी बिहारमधील फोर्ब्सगंज येथे विमान उतरवले. या विमानात 30 लाख रुपये होते. हे पैसे नेपाळ सरकारचे होते. दुर्गा यांची ही कृती नेपाळमध्ये लोकशाही पुनर्संचयित करण्याच्या लढाईतील एक धाडसी टप्पा मानली गेली. परंतु भारत सरकारने दुर्गा प्रसाद यांना अटक केली आणि त्यांची रावानगी दम दम मध्यवर्ती कारागृहात केली. दम दम कारागृह, ज्याला दम दम मध्यवर्ती कारागृह म्हणूनही ओळखले जाते, ते पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील दम दम येथे आहे. (Nepal)

==========

हे देखील वाचा : Pitrupaksha : पितृपक्षात वापरल्या जाणाऱ्या दर्भाचे महत्व

==========

या तुरुंगात 40 वर्ष काढल्यावर दुर्गा प्रसाद सुबेदी यांना 2013 मध्ये नेपाळला परत बोलावण्यात आले. नेपाळ सरकारने त्यांच्या उपचारांची आणि जीवनाची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली. त्यांचा संघर्ष नेपाळमधील लोकशाहीच्या संघर्षाचे प्रतीक मानला जातो. आता दुर्गा प्रसाद सामाजिक जीवनात फारसे पुढे येत नाहीत. मात्र सुशीला कार्की यांच्या मागे ते कायम उभे राहिले. सुशीलांनी या अजिबगरीब प्रेमकहाणीला कायम जपले. लग्नानंतर दोन वर्षातच या दोघांनाही वेगळे रहावे लागले. दोघांनाही एक मुलगी आहे पण ती सार्वजनिक जीवनापासून दूर राहते. आता सुशीला कार्कीं जर नेपाळच्या हंगामी पंतप्रधान झाल्या तर या प्रेमकहाणीतला हा सुवर्ण टप्पा मानला जाईल. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.