आपण कायमच विविध डे साजरे करत असतो. आज १५ सप्टेंबर रोजी आपण असाच एक खास दिवस साजरा करत आहोत. आज आहे ‘इंजिनियरिंग डे’. इंजिनियर्सशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. आपल्या जीवनातील सर्वच लहान मोठ्या सुखवस्तूंचा शोध हा याच इंजिनीयर्स मंडळींनी लावला आहे. इंजिनीयर्स देशाच्या विकासातील, प्रगतीतील सर्वात मोठा वाटा उचलतात. (Engineer Day)
या लोकांशिवाय देश प्रगतीच करू शकणार नाही. आज जे काही भारतामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचे संपूर्ण श्रेय इंजिनियर्सलाच दिले जाते. याच इंजिनीयर्सचे महत्व आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांचे महत्व संपूर्ण देशाला, विविध पिढयांना समजावे आणि येणाऱ्या पिढयांना आदर्श आणि प्रेरणा मिळवली यासाठी दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस इंजिनियर्स दिवस साजरा केला जातो. (Marathi Top News )
१५ सप्टेंबर हा अभियंता दिन अर्थात इंजिनियर्स डे हा दिवस भारताचे महान अभियंता आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया म्हणजे एम. विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन. ते भारतातील महान अभियंत्यांपैकी एक होते. त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली आणि देशाला नवे रूप दिले. त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात असाधारण योगदान दिले आहे, जे कोणीही विसरू शकत नाही. भारतातील महान अभियंत्यांपैकी एक, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त भारतात दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अभियांत्रिकी दिवस साजरा केला जातो. (Latest Marathi Headline)
आधुनिक म्हैसूर राज्याचे जनक अशी ख्याती असलेल्या मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली आणि देशाला नवे रुप देण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात असाधारण योगदान दिले. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती भारत सरकारने 1968 साली ‘अभियंता दिन’ म्हणून घोषित केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 सप्टेंबरला अभियंता दिन साजरा केला जातो. (Marathi News)
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथील एका सामान्य कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई वडील संस्कृत पंडित होते, त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झाले, नंतर ते उच्च शिक्षणासाठी बंगरुळू येथे गेले. तिथे त्यांनी कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. मात्र त्यांना अजून वेगळे शिकण्याची मोठी इच्छा होती. यासाठी डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग करण्यासाठी पुणे गाठले. तिथेच त्यांनी कॉलेज ऑफ सिविल इंजीनियरिंग मध्ये त्यांचे इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सहाय्यक इंजिनिअर म्हणून नोकरी सुरु केली. त्यांनी १९१२ ते १९१८ या काळात मैसुर संस्थानचे दिवाण म्हणून काम केले. (Todays Marathi Headline)
डॉक्टर विश्वेश्वरय्या यांना वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी त्यांच्या बुद्धिमत्तेतील स्थापत्य विषयातील नैपुण्य लक्षात घेऊन त्यांना तत्कालिन मुंबई इलाख्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती देण्यात आली. त्याचबरोबर १९०४ साली त्यांना बढती मिळून संपूर्ण देशाचे पहिले अभियंता होण्याचा बहुमान देण्यात आला. (Top Headline)
नोकरीच्या कार्यकाळात मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी २४ वर्षे नोकरी केली. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन म्हैसूर संस्थानचे मुख्य अभियंता म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या काळात विश्वेश्वरय्या यांनी कृष्णराज सागर या कावेरी नदीवरील धरणाचे काम पूर्ण केले. या कामाचे बक्षीस म्हणून त्यांना म्हैसूर संस्थानचे दिवाणपद त्यांना बहाल करण्यात आले. डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी कर्नाटकातील १९३२ सालच्या कृष्ण सागर डॅमची निर्मिती केली. हा डॅम त्यांच्या उत्कृष्ट कामाचा मोठा नमुना आहे. (Marathi Headline)
त्या काळात सिमेंट नसल्याने विश्वेश्वरय्या यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने ‘मोर्टार’ ची निर्मिती केली. कृष्ण सागर डॅम हा आशियातील सर्वात मोठा बांध आहे. या ठिकाणीच कावेरी, हेमवती आणि लक्ष्मण तीर्थ या नद्यांचा संगम झाला आहे. मैसुरच्या विकासात डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी भरीव योगदान दिले. त्यांनी या शहराला एक नवीन ओळख दिली म्हणूनच त्यांना ‘फादर ऑफ मॉडर्न मैसुर’ असे म्हटले जाते. इंजिनिअर्स महाविद्यालयात त्यांच्या नावाने आजच्या दिवशी विविध पुरस्कार देखील दिले जातात. (Latest Marathi News)
देशातील रचनात्मक विकासामध्ये एम. विश्वेश्वरय्या यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. एक सिव्हिल इंजिनिअर, विद्वान आणि राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन १९५५ साली त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. सेवानिवृतीनंतर देशभरातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये विविध पदांवर राहून विश्वेश्वरय्या यांनी चाळीस वर्षे अखंड काम केले. (Top Marathi News)
एम. विश्वेश्वरय्या यांनी म्हैसूर विद्यापीठाची स्थापना केली. तसेच भद्रावती येथील लोखंड आणि पोलाद कारखाना हे त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचे उत्तम उदाहरणं आहेत. आज देशात दिसून येणाऱ्या औद्योगिकीकरणाच्या प्रगतीची मुहूर्तमेढ विश्वेश्वरय्या यांनी रोवली. त्यांनी देशाच्या अनेक कामे केली. कृष्ण राजसागर, भद्रावती आयर्न अॅन्ड स्टील वर्क्स, मैसुर सॅन्डल ऑईल अॅन्ड सोप फॅक्टरी, मैसुर विश्वविद्यालय, बॅंक ऑफ मैसुर अशा अनेक महत्वाच्या संस्थांची निर्मिती झाली. त्यांच्या या कार्याचे स्मरण आणि राष्ट्रीय विकासात देशातील इंजिनिअर्सचे योगदान लक्षात घेऊन देशात इंजिनिअर्स डे साजरा केला जातो. (Top Trending News)
=========
Gemini : Google Gemini Retro फोटो तयार करायचा? मग करा ‘या’ स्टेप फॉलो
=========
विश्वेश्वरय्या हे “साधी राहणी आणि उच्च विचारसरणी” असे होते. त्यांचे व्यक्तिमत्त्वही आकर्षित होते. म्हैसुरी पद्धतीचा फेटा आणि साधी वेशभूषा त्यांनी शेवटपर्यंत जपली. डॉक्टर विश्वेश्वरय्या काही बाबतीत परखड होते. विश्वेश्वरय्या यांना अंधश्रद्धा अजिबातच मान्य नव्हती. मानवात देव आहे आणि मानवाची सेवा हिच ईश्वरसेवा आहे, असे त्यांचे मत होते. अशा या महान इंजिनियर विश्वेश्वरय्या यांनी १४ एप्रिल १९६२ रोजी वयाच्या १०१व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर १९६८ मध्ये डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जन्मतारीख भारत सरकारने ‘अभियंता दिन’ म्हणून घोषित केली. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics