सध्या पितृ पंधरवडा सुरु आहे. अतिशय महत्वाचा काळ म्हणून पितृ पक्षाला किंवा पितृ पंधरवाड्याला ओळखले जाते. या पंधरा दिवसाच्या काळात आपले मृत पूर्वज पुन्हा पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्षात मृत व्यक्तींच्या नावाने श्राद्ध, तर्पण करण्याची परंपरा आहे. याकाळात अनेकांच्या घरात श्राद्ध, तर्पण होत असतात. जर तुम्ही हे नीट पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की, श्राद्ध करताना गुरुजी श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला तिच्या हाताच्या बोटात एक खास अंगठी घालण्यास देतात. कोरड्या गवताची असलेली ही अंगठी श्राद्धादी कर्मांमध्ये फारच आवश्यक असते. या अंगठीशिवाय या पूजा सुरूच होत नाही. मग ही अंगठी का घातली जाते? काय आहे तिचे महत्व? कशाची असते ही अंगठी? चला जाणून घेऊया याबद्दलची अधिक माहिती. (Pitrupaksha)
श्राद्ध करताना व्यक्तीच्या हातात जी अंगठी घातली जाते, तिला दर्भाची अंगठी म्हटले जाते. दर्श किंवा कुश हे एक प्रकारचे पवित्र गवत आहे. हिंदू धर्मामध्ये पवित्र पूजा करताना ही अंगठी धारण केली जाते. श्रावण अमावस्या किंवा कुशग्रहिणी अमावस्येच्या दिवशी कुश किंवा दर्भ नावाचे खास गवत गोळा केले जाते आणि वर्षभराच्या धार्मिक विधी आणि श्राद्धात वापरले जाते. (Marathi News)
श्राद्ध पक्षाच्या वेळी तर्पण केले जाते तेव्हा ती उजव्या हाताच्या अनामिकेत अर्थात तिसऱ्या बोटात कुशाची अंगठी बनवून घातली जाते. या अंगठीला ‘पवित्रक’ म्हणतात. तर्पण करताना ही अंगठी घालणे अतिशय महत्वाचे मानले जाते. कुश हे पवित्र गवत आहे जे थंडावा प्रदान करते. पितरांसाठी तर्पण देताना कुशाची अंगठी घातल्याने शुद्धता आणि शीतलता मिळते. पूजा करताना कुश आसनावर असल्यास, शरीरात आध्यात्मिक ऊर्जा तयार होण्यास सुरुवात होते. जर आपण थेट जमिनीवर बसलो तर आपल्याला पूजेतून सकारात्मक ऊर्जा मिळू शकत नाही. वेदांमध्ये, कुश गवत त्वरित परिणाम देणारे, आयुर्मान वाढवणारे आणि वातावरण शुद्ध करणारे मानले जाते. (Todays Marathi Headline)
कुशशी संबंधित पौराणिक माहिती
> मत्स्य पुराणातील कथेनुसार, भगवान विष्णूने वराह रूप धारण केले आणि हिरण्याक्षाचा वध करून पृथ्वीची स्थापना केली. त्यानंतर, त्यांनी त्यांच्या शरीरातील पाणी झटकून टाकले, हे पाणी झटकताना त्यांच्या शरीरातील केस पृथ्वीवर पडले आणि त्या केसांचे कुशात रूपांतर झाले. म्हणूनच कुश पवित्र मानले जाते. (Latest Marathi News)
> महाभारतानुसार, जेव्हा गरुडदेव स्वर्गातून अमृत कलश घेऊन आले तेव्हा त्यांनी तो कलश काही काळ कुशवर ठेवला. कुशवर अमृत कलश ठेवल्यामुळे कुश पवित्र मानले जाऊ लागले.
> महाभारतातील आदि पर्वानुसार, राहूच्या महादशेदरम्यान कुश गवत असलेल्या पाण्याने स्नान करावे. यामुळे राहूच्या अशुभ प्रभावांपासून मुक्तता होते. कर्णानेही आपल्या पूर्वजांच्या श्राद्धात कुश गवताचा वापर केला होता. म्हणूनच, कुश गवत घालून केलेले श्राद्ध पूर्वजांना संतुष्ट करते असे म्हटले जाते.
दर्भाची अधिक माहिती
दर्भ अनेक वर्षे जगणारे गवत आहे. हे दर्भ कोकण प्रांत, नाशिक, गुजरात, काठेवाड, सिंध, हैदराबाद, आदी ठिकाणी जास्त उगवते. दर्भाचे महत्व अनन्यसाधारण आहे; कारण दर्भाला विविध धार्मिक विधीत, भाद्रपद कृष्णपक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये दर्भ मोठ्या प्रमाणात वापरले जाते. दर्भ उष्ण भागात मात्र ओलसर ठिकाणी सापडते. भूरिमूल (अनेक मुळ्यांचा), कुश, सहस्त्रपर्ण आणि शतकंद अशी दर्भाची काही नावे आहेत. दर्भाला होमहवन, श्राद्ध पक्ष आदीमध्ये अपार महत्त्व आहे. ऋग्वेद, तदुत्तर ग्रंथांत दर्भाचा उल्लेख असून अथर्ववेदात ही काही उपयोग सांगितले आहेत. योगासने करण्यासाठी दर्भाच्या चटया, दर्भाची आसने असल्यास असल्यास लाभदायक असते. (Top Trending News)
========
Pitrupaksha : पितृपक्षातील नवमी तिथीचे महत्व
Sarvapitru Amavasya : सर्वपित्री अमावस्याचे महत्व आणि माहिती
========
कुशा गवताचे आयुर्वेदिक फायदे
आयुर्वेदामध्ये कुशा गवत थंड प्रकृतीचे, रक्त शुद्ध करणारे आणि पचनासाठी चांगले सांगितले आहे. दर्भ पित्तदोष शांत करून शरीराला थंडावा देते. याशिवाय, लघवीच्या समस्या, मधुमेह आणि यकृताच्या आजारांमध्येही याचा वापर फायदेशीर ठरतो. उन्हाळ्यात माठात कुश गवत टाकल्यास ते पाणी जास्त थंड होते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics