Home » Sarvapitru Amavasya : सर्वपित्री अमावस्याचे महत्व आणि माहिती

Sarvapitru Amavasya : सर्वपित्री अमावस्याचे महत्व आणि माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sarvapitru Amavasya
Share

पितृपक्ष सुरु होऊन काही दिवस झाले आहेत. पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा काळ असतो. पितृ पक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. आपल्या धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या काळात पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, त्यांना मोक्ष मिळतो. या विधीमुळे पूर्वज खुश होतात आणि आपल्या वंशजांना सुख-समृद्धी भरभराटीचा आशीर्वाद देतात. यंदाचा ‘पितृपक्ष’ ८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर असा आहे. त्यामुळे यावर्षी सर्वपित्री अमावस्या २१ सप्टेंबर रोजी असेल. (Marathi)

कधी आहे सर्वपित्री अमावास्या?
यंदा सर्वपित्री अमावस्येची तिथी २१ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजून १७ मिनिटांनी सुरू होईल. तर २२ सप्टेंबर २०१५ रोजी मध्यरात्री ०१ वाजून २३ मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल. सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध केले जाईल. दरम्यान, २१ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजून २७ मिनिट ते दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांपर्यंत पितरांचे श्राद्ध, तर्पण करणे शुभ असेल. यावेळेस सर्वपितृ अमावस्येला शुभ योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील आहे. वास्तुशास्त्रात ईशान्य दिशा ही पवित्र मानली जाते. कारण ही दिशा देवतांचे स्थान मानली जाते. त्यामुळे या दिवशी या दिशेला एक दिवा लावावा. असे केल्याने घरात सुख- समृद्धी नांदते. तसेच धनलाभ होण्याची शक्यता असते. (Sarvpitri Amavsya)

सर्वपित्री अमावस्या महत्व
सर्वपित्री अमावस्या पितृ पक्षाचा शेवटचा दिवस असतो. यानंतर लगेच शारदीय नवरात्र सुरु होते. सर्वपित्री अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित आहे. या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून आपण पितरांना आदराने निरोप दिला जातो. अशा पद्धतीने सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते. (Marathi News)

========

Pitrupaksha : पितृपक्षातील नवमी तिथीचे महत्व

========

हिंदू मान्यतेनुसार मृत्यूचा देव यम आहे, जो मृत व्यक्तीचा आत्मा पृथ्वीवरून पितृलोकात घेऊन जातो. सर्वपित्री अमावस्या या दिवशी आपले पूर्वज देवलोकात परत जातात. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व शास्त्रात विशेष मानले गेले आहे. सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. अनेक ठिकाणी सर्वपित्री अमावस्येला महालय अमावस्या देखील म्हटले जाते. या दिवशी देखील श्राद्ध तर्पण विधी केले जातात. (Todays Marathi Headline)

Sarvapitru Amavasya

वेगवेगळ्या तिथींना निधन झालेल्या पित्रांचे श्राद्ध करणे जर त्या तिथीला करण्यास जमत नसेल किंवा त्या तिथीला श्राद्ध करण्याचा विसर पडला असेल किंवा इतर कोणतीही अडचण असेल तर अशावेळेस पूर्वजांच्या शांतीसाठी सगळ्या पित्रांचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला केले तरी चालते. शिवाय जर पित्रांच्या निधनाची तिथी माहिती नसेल तर आपण त्यांचे श्राद्ध या अमावस्येला करू शकतो. म्हणूनच या अमावस्येच्या तिथीला सर्वपित्री मोक्ष अमावस्या असे म्हणतात. जर काही कारणास्तव सर्वपित्री अमावस्येलाही श्राद्धविधी करू शकला नाहीत तर या दिवशी आपल्या ऐपतीप्रमाणे, इच्छेनुसार दान केल्याने आपल्या पूर्वजांना समाधान, शांती मिळते आणि ते आपल्यावर प्रसन्न होतात. (Top Marathi Headline)

आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. एवढेच नाही तर वर्षभरात जे कुणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाहीत, इतर अनेक कारणांमुळे जे कुणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकलेले नाहीत. ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध कार्य करू शकतात. तसेच पौर्णिमा, अमावास्या आणि चतुर्दशी या तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्वपित्री अमावास्येला करावे, असे हिंदू धर्मग्रंथात सांगितले आहे. पूर्वजांच्या ऋणातून उतराई होण्यास्तही आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करावा. यादिवशी कावळा, गाय, श्वान यांना काकबळी काढून ठेवावा. (Latest Marathi News)

पितृपक्षातील सर्वांत महत्वाचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या. सर्वपित्री अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित एक धार्मिक कृती आहे. या दिवशी ब्राम्हणांना भोजन घालण्याची पद्धत आहे. ब्राम्हणांना भोजनदान दिल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी देखील मान्यता आहे. यादिवशी आंघोळ करून शुद्ध आचरणाने अन्न तयार करावे. अन्न सात्विक असावे आणि त्यात खीर आणि वडे यांचा प्रामुख्याने समावेश करावा. घरातील पितरांच्या फोटोला हार घालून तुपाचा दिवा लावून श्राद्ध, तर्पण करावे. घरी बनविलेल्या अन्नाचा नैवैद्य दाखवावा. पितरांसाठी पण टाकावे. त्यानंतर पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. (Top Trending News)

=======

Pitrupaksha : पितृदोष म्हणजे काय? या दोषाच्या मुक्तीचे उपाय कोणते?

=======

सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहण
यंदा सर्वपित्री अमावस्येला या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे. या दिवशी रात्री १० वाजून ५९ मिनिटांनी हे सूर्यग्रहण ग्रहण सुरू होणार असून, रात्री ३ वाजून २३ मिनिटांनी समाप्त होणार. या ग्रहणाचा कालावधी ४ तास २४ मिनिटांचा असणार. हे सूर्यग्रहण रात्रीच्या वेळी असल्यामुळे ते भारतात दिसणार नाही. ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे या ग्रहणादरम्यान सुतक कालावधी वैध राहणार नाही आणि सुतक कालावधीचे नियम देखील पाळणे बंधनकारक असणार नाही. शास्त्रानुसार, या सूर्य ग्रहणाचा भारतावर कोणताच परिणाम होणार नाही. त्यामुळे या दिवशी श्राद्ध, पिंडदान अशा कोणत्याच कार्याचा दोष लागणार नाही. (soscial News)

(टीप : या लेखातून आम्ही कोणताही दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.