सध्या पितृपक्ष सुरु असून, प्रत्येक घरांमध्ये आपल्या पूर्वजांच्या निधनाच्या तिथीनुसार श्राद्ध आणि तर्पण केले जात आहेत. पितृपक्षाचा काळ हा केवळ १५ दिवसांचा असतो, मात्र तरीही या दिवसात सर्वच तिथीच्या पूर्वजांचे श्राद्ध केले जातात. मुख्य म्हणजे या दिवसांमध्ये अगदी लहान बाळांपासून ते तरुण, विवाहित, अविवाहित, विधवा, सधवा आदी सर्वांसाठीच तिथी असतात. याच पितृपक्षातील अतिशय महत्वाची तिथी म्हणजे अविधवा नवमी. या दिवशी ज्या स्त्रिया पती जिवंत असताना निधन झाल्या आहेत अर्थात सवाष्ण गेलेल्या स्त्रियांचे श्राद्ध केले जाते. (Top Marathi News)
पितृपक्षातील नवमी तिथी किंवा अविधवा नवमीला मोठे महत्व आहे. यंदा सोमवार १५ सप्टेंबर २०२५ नवमी श्राद्ध अर्थात अविधवा नवमी श्राद्ध केले जाणार आहे. मातृ नवमी ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला येते. या दिवशी परिवारातील विवाहित महिला ज्या सवाष्ण म्हणून मरण पावलेल्या त्या महिलांसाठी पिंड दान केले जाते. अविधा नवमीला ब्राह्मण मुथायदे भोजन खाऊ घातले जाते. अन्नदान केल्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणा दिली जाते. याला मातृ नवमी श्राद्ध म्हणतात. याला नवमी श्राद्ध आणि अविधवा श्राद्ध असेही म्हणतात. पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते, तिच्या शांतीसाठी केलेल्या श्राद्धला अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते. (Latest Marathi News)
सवाष्ण स्त्रीला मरण प्राप्त झाल्यानंतर तिच्यासाठी मुलांनी किंवा तिच्या पतीने पितृपक्षातील नवमीस पार्वणाविधीने ‘अविधवा नवमी श्राद्ध’ करण्याबद्दल आपल्या शास्त्रात सांगितले जाते. सवाष्ण म्हणून मरण आल्यानंतर त्या स्त्रीची गणना सधवा म्हणून होते. तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर देखील ती सधवाच असते. सवाष्ण स्त्रीचे निधन झाल्यानंतर पितृपक्षातील ‘अविधवा नवमी’ तिथीला तिचे श्राद्ध तिचा पती अथवा तिचा मुलगा करू शकतात. मुलाची मुंज झालेली नसली तरी त्याला हे श्राद्ध करण्याचा अधिकार दिला आहे. पतीच्या निधनानंतर मुलं हे श्राद्ध करू शकतात. तर मुलाच्या निधनानंतर त्याच्या मुलाला आपल्या आजीचे श्राद्ध केले नाही तरी चालते. या दिवशी मृत व्यक्तीचा आवडता किंवा घरातील परंपरेनुसार स्वयंपाककरून सवाष्ण जेऊ घातली जाते. तिला साडी, ब्लाउज पीस, कुमकुम, आरसा आणि फुले दिली जातात. (Top Trending News)
=======
Pitrupaksha : पितृदोष म्हणजे काय? या दोषाच्या मुक्तीचे उपाय कोणते?
=======
मातृ नवमीला काय करावे?
सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. नंतर दक्षिण दिशेला टेबलवर पांढरी चादर पसरून, मृत कुटुंबातील सदस्याचा फोटो ठेवावा आणि त्याला हार घालावा. गुलाब अर्पण करावे. फोटोसमोर तेलाचा दिवा लावा आणि त्यात काळे तीळ टाकावे. आता विधीप्रमाणे श्राद्ध करावे. पाहुणे, प्राणी, पक्षी यांना अन्न दान करावे. अविधवा नवमी श्राद्ध कर्म फक्त महिला पितरांसाठीच केले जाते. जर कोणत्याही कारणास्तव, एखादी व्यक्ती अविधवा नवमी विधी करण्यास चुकली तर, श्राद्ध ‘महालय अमावस्येला’ करता येईल. (Social Media)
(टीप : वरील सर्व बाबी माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)