Home » Chocolate History : फक्त चॉकलेटमुळे सैनिक ‘त्या’ युद्धात जिवंत राहिले !

Chocolate History : फक्त चॉकलेटमुळे सैनिक ‘त्या’ युद्धात जिवंत राहिले !

by Team Gajawaja
0 comment
Chocolate History
Share

मम्मी कहती है कोई भी शुभ काम करनेसे पहले कुछ मीठा खाना चाहिये! आजकाल चॉकलेट नामक पदार्थाची इतकी हाइप झालीये की, गर्लफ्रेंड रूसली की चॉकलेट द्यायची प्रथाच झालीये, नाही म्हणजे फक्त सॉरी बोलून चालत नाही ना! आणि त्यात व्हॅलेंटाईन्स डे आला की बिचाऱ्या पोरांचे खिसे रिकामे होतात. पण हा एक गमतीचा भाग झाला! आजकाल सगळीकडे चॉकलेट सहज अवेलेबल होतात. पण तुम्हाला माहित आहे का? चॉकलेटचा शोध खरं तर आपल्या चवीसाठी लागला नाहीये, तर त्याच्या मागे इंटरेस्टिंग इतिहास आहे आणि तोही वर्ल्ड वॉरचा! हो बरोबर ऐकलं.. याच चॉकलेटने युद्धात सैनिकांना जिवंत ठेवलंय.. तर काय आहे या चॉकलेट मागचा खरा इतिहास जाणून घेऊ. (Chocolate History)

Chocolate History

तर १९३७ सालची ही गोष्ट आहे. जग पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर होतं. दुसरं महायुद्ध जवळ येत चाललं होतं आणि अशातच अमेरिकन आर्मीपुढे एक मोठी अडचण निर्माण झाली होती, ते म्हणजे सैनिकांना असं खाणं द्यायचं, जे पचायला हलकं, बराच काळ टिकणारं आणि खूप पौष्टिक असेल, पण त्याची चव काही खास नसली पाहिजे! तर या मागचं कारण होतं की, सैनिकांनी ते फक्त भुकेसाठी खावं, चवीसाठी नाही! आणि मग ही जबाबदारी घेतली Hershey’s लॅबोरेटरीने! त्यांनी हे चॉकलेट बार बनवलं ज्याला नाव दिलं D-Ration. हे खास युद्धासाठी डिझाइन केलेलं, ज्याचं काम होतं सैनिकांचं पोट भरणं आणि त्यांना जिवंत ठेवणं.(Top Stories)

आता D-Ration बार बनलं कसं होतं? तर कोको, साखर, ओट्स आणि काही व्हिटॅमिन्स ज्यात मुख्य करून विटामिन बी 1 चा समावेश होता. थोडक्यात काय तर युद्धात सैनिकांना हे खाल्ल्यामुळे एनर्जी मिळायची. पण एक प्रश्न तर नक्कीच आला असेल की, यासाठी फक्त चॉकलेटच का? दुसरं काही का नाही? तर त्यामागे कारण म्हणजे हे बनवलेले डी रेशन उष्णतेत लवकर वितळणारं नव्हतं, सैनिकाच्या बॅगेत तुटणारं नव्हतं आणि चवीला खास नव्हतं.. म्हणजे सैनिक गरज पडेल तेव्हाच खातील, टाईमपाससाठी खाणार नाही! तेव्हा प्रत्येक सैनिकाला तीन बार दिल्या जायच्या, कारण एका सैनिकचं कॅलरी इंटेक १८०० इतकं होतं आणि एका बारमध्ये तब्बल ६०० कॅलरीज होत्या. तीन बार कठीण परिस्थितीत प्रत्येकाला पुरेशा होत्या आणि युद्धात त्यांना या चॉकलेटने बराच आधार दिला. (Chocolate History)

==============

हे देखील वाचा : Russian Mystery : रशियाची ही विहीर थेट नरकात घेऊन जाते ?

==============

तेव्हा सैनिकांना हे चॉकलेट बार खायला खरं तर कंटाळा यायचा आणि ते या चॉकलेट बार ला brick म्हणजे वीट म्हणायचे. कारण ती दिसायला तशीच होती आणि तिला जरा वजनसुद्धा होतं. मग रोज रोज अश्या चवीचे चॉकलेट खाण्यापेक्षा काही सैनिकांनी ते कॉफीच्या कपात टाकून वितळवलं आणि खाल्लं, त्यांचं म्हणणं होतं असं खाल्लं तर ती जरा टेस्टला बरी लागते. (Top Stories)

पण या D-Ration ची खरी कमाल तर युद्धात दिसली. म्हणजे जिथे खाण्याची सोय नव्हती, सैनिकांपर्यंत रेशन पोहोचणं शक्य नव्हतं, तिथे ह्या छोट्या चॉकलेट बारने सैनिकांना जिवंत ठेवलं. मग ती युरोपातलं Battle of Normandy असो, किंवा Pacific Theater of World War II, ह्या चॉकलेट बारने सैनिकांना एनर्जी आणि आधार दिला. त्यात हे बनवणं खूप सोपं होतं आणि याची प्रॉडक्शन कॉस्टसुद्धा कमी होती. १९४० ते १९४५ या काळात हरशी कंपनीने ३ अब्ज पेक्षा जास्त D-Ration आणि ट्रॉपिकल बार तयार केले. (Chocolate History)

दुसरं महायुद्ध संपलं तोवर या D-Ration मुळेच पोर्टेबल, पौष्टिक आणि टिकाऊ खाण्याचा विचार जगासमोर आला आणि यातूनच पुढे एनर्जी बार्सची संकल्पना तयार झाली. माउंटन क्लायंबर्स, अ‍ॅथलिट्स आणि अगदी अंतराळवीरांसाठीही अशा प्रकारचे एनर्जी बार बनवायला सुरुवात झाली आणि आज आपण जे प्रोटीन बार्स किंवा एनर्जी बार्स खातो, त्याची मूळ कल्पना इथूनच आली. तर असा होता चॉकलेटचा इतिहास! आज जे चॉकलेट आपण चवीने खातो त्याच चॉकलेटने त्याकाळी युद्धात सैनिकांना जिवंत ठेवलं होतं.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.