नुकतीच गणेशोत्सवाची समाप्ती झाली. गणेशोत्सव म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचा उत्सव. गणेशोत्सवाच्या समाप्तीनंतर आज पहिली संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाच्या आराधनेचा मुख्य दिवस. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. प्रत्येक महिन्यात एक अशा वर्षभरात १२ आणि ज्या वर्षी अधिकमास असेल त्या वर्षी १३ संकष्टी चतुर्थी येतात. संकष्टीच्या दिवशी चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग असतो. संकष्टी चतुर्थीचा अर्थ म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी. (Sankashti Chaturthi)
भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथी १० सप्टेंबर रोजी दुपारी ३:३७ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२:४५ वाजता संपेल. उदय तिथीनुसार, चतुर्थीचे व्रत बुधवार, १० सप्टेंबर रोजी ठेवले जाईल. हिंदू दिनदर्शिकेनुसार, बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ०८ वाजून ३४ मिनिटांनी चंद्रोदय आहे. संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी वृद्धी आणि ध्रुवासह शिवयोग तयार होत आहेत, जे अत्यंत शुभ मानले जातात. ब्रह्म मुहूर्त – सकाळी ०४:३१ ते ०५:१८ पर्यंत, विजया मुहूर्त – दुपारी ०२:२३ ते ०३:१२ पर्यंत, गोधुली मुहूर्त – दुपारी ०६:३२ ते ०६:५५ पर्यंत तर निशिता मुहूर्त – दुपारी ११:५५ ते १२:४१ पर्यंत. (Todays Marathi Headline)
संकष्टी चतुर्थीचे व्रत
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची तसेच चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी भक्तगण व्रताचा संकल्प करतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे, त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. पाटावर कापड पसरून गणेशमूर्तीची स्थापना करा. यानंतर त्यांना फुले, सुगंध आणि दिवा अर्पण करा. आरती करा, मंत्र आणि गणेश चालीसा पठण करायला हवे. गणपतीला मोदक किंवा तिळाचे लाडू अर्पण करा. संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडावा. या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. पुढील श्लोक म्हणून गणपतीचे ध्यान करावे. (Top Marathi Stories)
रक्तांग रक्तवस्त्रं सितकुसुमगणै: पूजितं रक्तगंधै:॥
क्षीराब्धो रत्नदीपे सुरतरुविमले रत्नसिंहासनस्थम् ॥
दोर्भि: पाशांकुशेष्टा भयध्रुतिरुचिरं चंद्रमौलिं त्रिनेत्रं ॥
ध्यायेच्छांत्यर्थमीशं गणपतीममलं श्रीसमेतं प्रसन्नम् ॥
नंतर पुढे दिलेले “संकष्ट चतुर्थी महात्म्य” वाचावे. पुढे २१ मोदकांचा नेवैद्य दाखवून आरती करावी. आरती झाल्यावर – अशुद्धमतिरिक्तं वा द्रव्याहीनं मया कृतम् । तत सर्व पूर्णतां यातु विप्ररुप गणेश्वर ॥ असे म्हणून साष्टांग नमस्कार घालावा. नंतर चंद्रोदयाची वेळ पंचांगांत दिलेली असते ती बघून चंद्रदर्शन करुन, चंद्राला अर्घ्य, गंध, अक्षता, फुले वाहून त्याची पूजा करावी. “रोहिणीनाथाय नम:” म्हणून नमस्कार करावा. (Top Marathi Trending News)
========
Chhattisgarh : या मंदिराला ‘एक दिवसाचे मंदिर’ म्हणतात !
========
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी उपवास केल्याने श्रीगणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते. धार्मिक मान्यतेनुसार संततीप्राप्तीसाठीही संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. हे व्रत करुन चंद्र दर्शन केल्यानंतर गणेश पूजन करुन ब्राह्मण भोजन द्यावे. याने अर्थ- धर्म-काम-मोक्ष अभिलाषित पदार्थ प्राप्त केले जाऊ शकतात, असे खुद्द गणपतीने म्हटले आहे. (Marathi Top HEadline)
संकष्टी चतुर्थीची कथा
एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले. तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हासला. ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की “आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल!” शेवटी चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. (Top Marathi News)
पण वर्षातून एक दिवश “भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी” तुझे तोंड कोणी पाहणार नही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? तेव्हा गणपतीने सांगितले की, त्याने “संकष्ट चतुर्थी व्रत” करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. (Latest Marathi Headline)
गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खॊटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने “संकष्ट चतुर्थी व्रत” केल्यामुळे गेला, अशी कथा आहे. त्या कथेनुसार फार पूर्वी यादवकुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने शंभर वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्यमंतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा. (Top Marathi Headline)
सत्राजिताकडील स्यमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली. परंतु स्त्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला. पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधु प्रसेन हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारुन तो स्यमंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला. इकडे प्रसेन स्यमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्णकारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला. (Latest Marathi News)
प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय? एके ठिकाणी प्रसेनमरुन पडलेला. जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्यमंतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली. गोकुळात नंद-यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्रीगणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले. श्रीगणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंताने स्यमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात, द्वारकेत सगळीकडे आनंदीआनंद झाला. (Top Trending News)
========
Ekadshi : पितृपक्षात येणारी, पितरांना मोक्ष प्रदान करणारी इंदिरा एकादशी
========
श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात. पूर्वी भाद्रपदात गणेशचतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्यापाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्रीगणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. (Top Stories)
म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्रीगणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्वाची मानतात. दर महिन्यात चतुर्थी करणे शक्य नसल्यास प्रत्येकाने निदान वर्षांतून या दोन तरी अवश्य कराव्या. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics