आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला मानसिक आणि शारीरिक शांतता मिळणे खूपच आवश्यक असते. मात्र ही शांतता इतकी सहजासहजी मिळत नाही. आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवले तरी डोक्यात कुठे तरी विचार सुरूच असतात. अशावेळी लाभदायक ठरते ते योगा. योगा आपल्या केवळ उत्तम शरीर देण्यासाठीच नाहीतर मानसिक आरोग्य आणि शांती देण्यासाठी देखील फायदेशीर आहे. याच योगामुळे मानसिक लाभ तर होतातच सोबतच शारीरिक लाभ देखील भरपूर होतात. (Marathi News)
मनुष्याच्या शरीरातील असा कोणताही विकार नसेल जो योगामुळे बरा होऊ शकत. असा हा योगा पोटच्या आरोग्यासाठी देखील कमालीचा फायदेशीर आहे. आजच्या काळातील मंडळी पोटाच्या जवळपास सर्वच विकारांनी त्रस्त आहेत. जेवण न जाणे, जेवणाचे पचन नीट न होणे, गॅसेस, बद्धकोष्ठ, ऍसिडिटी आदी अनेक पोटाच्या समस्या लोकांना सर्रास भेडसावत आहेत. यासाठी सतत विविध औषधं घेण्यापेक्षा योगा करणे कधीही सोपे आणि सहज आहे. आता योगा म्हटल्यावर अनेकांना टेन्शन आले असेल. योगामध्ये खूप अवघड आसानं असतात. आमच्याकडून कुठे होणार आहे? असाच विचार अनेक लोकं करतात. मात्र असे नाही योहामध्ये जशी अवघड आसनं आहेत, तशी सोपी देखील आहे. यातलेच एक पोटाच्या विकारासाठी सोपे आसन म्हणजे. ‘वज्रासन’. (Latest Marathi Headline)
वज्रासनाबद्दल अनेकांनी ऐकले असेल, पाहिले असेल किंवा वाचले असेल. मात्र या आसनाबद्दल आज आम्ही तुम्हाला अधिक माहिती सांगत याचे फायदे सांगणार आहोत. योगाभ्यास करण्यापूर्वी छोटी, सोपी योगासनं करणे अत्यंत आवश्यक आहे. रोज योगासनं केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि शरीराची ताकद आणि लवचिकताही वाढते. आपण नेहमीच असे ऐकतो की व्यायाम किंवा योगा जेवल्यानंतर कधीही करू नये. मात्र वज्रासन’ याला अपवाद आहे. हे एक असे आसन आहे, जे तुम्ही जेवणानंतर लगेचच करू शकता. यामुळे अन्नाचे पचन सहजरीत्या होण्यास मदत होते. वज्रासन केल्याने शरीर मजबूत आणि स्थिर होते. (Top Marathi Headline)
वज्रासन करण्याची पद्धत
– वज्रासन करण्यासाठी सर्वप्रथम पाय वाकवावा आणि गुडघ्यावर बसावे. त्यानंतर तुमच्या पायांचे पंजे उलट्या स्थितीत मागे खेचा. त्यांना एकत्रीत जोडा आणि पायाचे अंगठे एकमेकांवर क्रॉस करून ठेवा.
– त्यानंतर हळूहळू तुमचे शरीर अशा प्रकारे खाली करा की तुमचे नितंब पायाच्या घोट्यावर राहील आणि तुमच्या मांड्या तुमच्या पोटरीच्या स्नायूंवर स्थिरावतील. (Top Marathi News)
-त्यानंतर तुमचे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. तसेच डोके सरळ ठेवा आणि तुमची नजर एकदम समोर ठेवा.
– योग करताना श्वासावर लक्ष ठेवा. श्वास घेताना आणि बाहेर सोडताना श्वासांवर काळजीपुर्वक लक्ष ठेवा.
– त्यानंतर आपले डोळे बंद करा आणि आपल्या श्वासांच्या हालचालीकडे लक्ष द्या. हळू हळू आपले मन आणि डोक्यातल्या सर्व गोष्टी काढून टाकून, फक्त श्वास आत घेण्यावर आणि श्वास बाहेर सोडण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
– हे आसन सुरुवातीला किमान ५ मिनिटे आणि जास्तीत जास्त १० मिनिटे करता येते. तुम्हाला याची सवय झाली की तुम्ही ३० मिनिटांपर्यंत वेळ वाढवू शकता. (Latest Marathi News)
वज्रासन करण्याचे फायदे कोणते?
– हे आसन केल्याने आपल्या नितंब, पाय, घोट्या, गुडघे आणि मांड्या यांच्या स्नायूंची लवचिकता सुधारण्यास मदत होते.
– वज्रासन हे ध्यानासाठी चांगले आसन आहे. श्वासोच्छवासाच्या व्यायामासह वज्रासन केल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो.
– जेवणानंतर वज्रासन केल्याने अन्न नीट पचते आणि अपचन, गॅस, आणि ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. पोटाच्या समस्या त्वरित दूर होतात. बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. (Top Trending News)
– वज्रासन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच इन्सुलिन उत्पादनात सुधारणा होते.
– बऱ्याच लोकांना पाठदुखीची समस्या असते. परंतु वज्रासन केल्याने ही समस्या दूर होईल.
– वज्रासन हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वज्रासन केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय रोगाचा धोका कमी होतो.
– गरोदरपणात वज्रासन केल्याने Pelvic Area मजबूत होतो. (Social News)
========
Health : ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचे आरोग्याला होतात अनेक फायदे
========
वज्रासन योग कोणी करु नये
– गुडघ्यांचा त्रास होत असेल किंवा गुडघ्यांचे कोणतेही ऑपरेशन झाले असेल तर हा योग करु नये.
– बरगडीचा त्रास असल्यास हे आसन करु नये
– जर बरगडीच्या हाडांमध्ये किंवा खालच्या बरगड्यांमध्ये काही त्रास असेल तर हे आसन करु नये.
(टीप : कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics