नुकताच पितृपक्षाचा काळ सुरु झाला आहे. हिंदू धर्मात या पितृ पंधरवाड्याला मोठे महत्व आहे. कारण या काळात आपण आपल्या पूर्वजांची आठवण काढत त्यांच्या नावाने श्राद्ध, पिंडदान करत असतो. आपल्या धर्मातील शास्त्रानुसार मनुष्य हा त्याच्या आयुष्यात जे काही यश अपयश मिळवत असतो ते केवळ देवाच्या कृपेतून होत असते. यासोबतच त्याचे कर्म देखील या गोष्टीस कारणीभूत असते. पण आपल्या शास्त्रात अजून एक गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे आपल्या वर्तमान काळात जे काही घडते चांगले, वाईट त्यात जेवढा देवाचा हात असतो, कर्माचा हात असतो तेवढाच आपल्या पूर्वजांचा देखील हात असतो. (Marathi News)
तुम्ही जर नीट पाहिले असेल तर अनेक शुभ कार्यामध्ये आपल्या पितरांसाठी देखील आधी पूजा केली जाते. याचंच अर्थ आधी पूर्वजांना मान दिला जातो, मगच शुभ करायची सुरुवात होते. पूर्वजांचा आपल्यावर आशीर्वाद असणे आवश्यक असते. त्यांच्या आशिर्वादाशिवाय आपण जिवंत सुख समृद्धी, यश मिळवू शकत नाही. आपले पूर्वज देखील आपल्या आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टींसाठी कारणीभूत असू शकतात. आणि जर तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज असतील तर नक्कीच तुमच्या आयुष्यात अडचणी, अडथळे, संकटं, अपयश येऊ शकतात. (Todays Marathi Headline)
तुम्ही जर तुमच्या पूर्वजांची वारंवार अवज्ञा केली तर तुमच्यावर पितृदोषही लागू शकतो. सध्या चालू असलेल्या पितृ पक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात, त्यामुळे त्यांना श्राद्ध करून मोक्ष प्राप्त होतो. असे मानले जाते की ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष चालू आहे त्यांनी काही उपाय करून या समस्येपासून मुक्ती मिळू शकते. पितृ दोष म्हणजे नक्की काय?, असा दोष लागला तर काय होते?, या दोषावर उपाय कोणते? आदी सर्वच गोष्टींची आपण माहिती जाणून घेऊया. (Top Marathi Headline)
पितृ दोष म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, विधीनुसार त्याचे अंतिम संस्कार झाले नसतील किंवा एखाद्याचा अकाली मृत्यू झाल्यास, कुटुंबातील एखाद्या सदस्याने केलेली चूक, श्राद्ध इत्यादी विधी न केल्याने मयत व्यक्तीशी संबंधित कुटुंबातील सदस्यांना पितृदोषाचा त्रास पुढील अनेक पिढ्या सहन करावा लागतो. मरण पावलेल्या व्यक्तीलाही दु:ख भोगावे लागते. त्याच्या दुःखामुळे आणि नाराजीमुळे कुटुंबातील सदस्यांना, खासकरून कुटुंबप्रमुखांना पितृदोषाचा सामना करावा लागतो. (Latest Marathi News)
याशिवाय पितृदोष येण्याचे दुसरे कारण म्हणजे पितृदोष जन्मकुंडलीतही दिसतो. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत जर केतू सूर्यासोबत दुसऱ्या भावात, आठव्या भावात आणि दहाव्या भावात असेल तर पितृदोष तयार होतो. अशी धार्मिक श्रद्धा आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पितृदोष दूर करण्यासाठी उपाय केले नाहीत तर हा दोष पिढ्यानपिढ्या राहतो. अशा स्थितीत पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध, तर्पण, हवन-पूजा असे धार्मिक विधी अवश्य करावेत. (Top Marathi News)
पितृ दोषाची लक्षणे
– मुले नसणे
– तोट्यात असणे
– कुटुंबात मतभेद
– आजारी असणे
– अविवाहित, विवाहात अडथळे
– अपघात घडतो
– गर्भधारणेत समस्या
– गर्भपात
– मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या विकलांग मुलं
– मुलांचा अकाळी मृत्यु
– दांपत्य जीवनात क्लेश
– वाईट सवयी
– नोकरीत समस्या
– कर्ज (Top Trending News)
=======
Pitrupaksha : पितृ पक्षात कावळ्यांना जेवू का घालतात?
Pitrupaksha : श्राद्ध विधींची सुरुवात सर्वप्रथम कोणी केली?
=======
पितृदोषासाठी उपाय
– पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितरांच्या मृत्यूच्या तिथीला किंवा श्राद्ध पक्षात सर्व पितृ अमावस्येला तर्पण करावे आणि ब्राह्मणाला भोजन अर्पण करावे. जमेल तेवढे दान करा.
– संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावा. रोज शक्य नसेल तर पितृपक्षात अवश्य लावावा.
– जर कुंडलीत पितृदोष असेल तर यासाठी कुमारी मुलीचे लग्न लावा. लग्न करता येत नसेल तर गरीब मुलीच्या लग्नात मदत करा.
– पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी दक्षिण दिशेला पितरांचे चित्र ठेवा आणि रोज त्याचे स्मरण करा. यामुळे पितरांची नाराजी कमी होते आणि पितृदोषाचा प्रभावही कमी होऊ लागतो. (Social News)
– पितूदोष असेल तर प्रत्येक अमावास्येला आपल्या घरी श्रीमद्भागवतातील गजेंद्र मोक्ष अध्यायाचे पठण करावे.
– दुपारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. यासोबतच फुले, अक्षत, दूध, गंगाजल आणि काळे तीळ अर्पण करून पितरांचे स्मरण करावे.
– पितरांचे श्राद्ध केल्यानंतर काळे तीळ, मीठ, गहू, तांदूळ, गाय, सोने, वस्त्र, चांदी यांचे दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करीत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics