आज संगीत क्षेत्रातील अतिशय बुलंद आवाज असणाऱ्या आशा भोंसले यांचा आज ९२ वा वाढदिवस. आशा भोंसले यांच्याबद्दल काय आणि किती सांगावे असे होते. भारतीय संगीतसृष्टी या नावाशिवाय कायम अपूर्ण राहील असे महान कर्तृत्व आशा भोंसले यांनी गाजवले. आजही वयाच्या ९२ वर्षी त्यांचा उत्साह, एनर्जी, काम करण्याची इच्छा भल्याभल्याना मागे टाकताना दिसते. (Marathi News)
आशा भोसले यांनी अनेक हिट चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. ‘मेलोडी क्वीन’ नावाने ओळखल्या जाणारी आशा ताईंनी १००० हून अधिक चित्रपटांमध्ये २० भाषांमध्ये १२००० हून अधिक गाणी गेली आहेत. हिंदी मराठीच नाही तर बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन या भाषांमधील अनेक गाणी आशा भोसले यांनी गायली. त्यांनी विविध जॉनर्सची हजारो गाणी गायली आहेत. आज आशाताईंच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींबद्दल जाणून घेऊयात… (Asha Bhosle Birthday)
आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे झाला. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी त्यांचे पहिले गाणे गायले. या पहिल्या गाण्याचा देखील एक किस्सा होता. हा किस्सा आशा ताईंनी स्वतः एकदा सांगितला होता. त्या म्हणाल्या, “मी १० वर्षे वयाची असताना, १९४३ साली कोल्हापुरमध्ये पहिले गाणे गायले. त्यावेळी मी खूप घाबरले होते, मी थरथर कापत होते. वाटत होते की इथून मी पळून जावे. तरीही मी त्या वेळी गायले. कारण पळून गेले असते तर घरच्यांनी मला मारले असते. १९४६ सालापासून मी हिंदी चित्रपटांमध्ये गाणे गायला सुरुवात केली.” (Marathi News)
आशा भोसले या गायिका लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहीण. त्यांचे वडील प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडीत दीनानाथ मंगेशकर यांचा वारसा सगळ्या भावंडांनी पुढे चालवला. संगीताचे बाळकडू आशा ताईंना घरातूनच मिळाले. वडिलांच्या निधनानंतर लाल दीदींनी सर्व घराची जबाबदारी घेतली. आशा ताईंनी देखील दीदींना मदत करण्यास सुरुवात केली. (Todays Marathi Headline)
६० आणि ७० च्या दशकात लता मंगेशकर खूप प्रसिद्ध व्हायला लागल्या. त्यांचं अकामाचा व्याप वाढू लागला. त्यामुळे लता दीदींनी त्यांचे सर्व काम पाहण्यासाठी एक सचिव नियुक्त केले होते. त्यांचे नाव होते गणपतराव भोसले. दीदींमुळे गणपतरावांचे त्यांच्या घरी येणे जाणे होऊ लागले. अशातच आशा ताई गणपतरावांच्या प्रेमात पडल्या. त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला पण कुटुंबियांनी या लग्नाला कडाडून विरोध केला. दोघांनीही घरातून पळून जाऊन लग्न करण्याचे ठरवले. त्यावेळी आशा भोसले या फक्त १६ वर्षांच्या होत्या, तर गणपतराव ३१ वर्षांचे होते. (Top Marathi Headline)
या दोघांनीही आपल्या पसंतीने लग्न केले खरे पण हे लग्न फार काळ टिकले नाही. आशा ताईंनी एकदा सांगितलेले होते की गणपतरावांच्या कुटुंबियांनी त्यांना स्वीकारले नाही. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता. अखेर गणपतरावांनीच आशा भोसले यांना एक दिवस घराबाहेर हाकलून दिले. सासरच्या घरातून हाकलून दिल्यानंतर त्या आपल्या हेमंत आणि वर्षा या दोन मुलांसह माहेरी परतल्या. (Latest Marathi News)
पुढे त्यांचे नाव संगीतकार ओ.पी. नय्यर यांच्यासोबत देखील जोडले गेले. त्यांचे आणि नय्यर यांचे नाते जवळपास १४ वर्ष चालले. मात्र नंतर आशा भोसले यांनी या नात्यातून काढता पाय घेतला. त्यानंतर काही काळाने त्यांच्या आयुष्यात आर. डी. बर्मन यांची एन्ट्री झाली. तिसरी मंझिल चित्रपटादरम्यान आरडी बर्मन यांनी आशा भोसले यांना गाण्यासाठी संपर्क साधला. आशा ताईंसारखाच पंचम दा यांचाही तेव्हा घटस्फोट झाला होता. पंचम दा त्यांची पहिली पत्नी रीता पटेलपासून वेगळे झाले होते. (Top Marathi News)
आशा भोसले यांनी पंचम दा यांच्या सिनेमांसाठी अनेक गाणी गायली. याकाळात ते एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले. पंचम दा यांनी १९८० मध्ये आशा भोसलेंशी लग्न केले. मात्र दुर्दैवाने त्यांचे हे लग्न देखील जास्त टिकले नाही आणि लग्नाच्या १४ वर्षानंतर ४ जानेवारी १९९४ रोजी वयाच्या ५४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने पंचम दा यांचे निधन झाले. (Top Trending News)
=============
Chhattisgarh : या मंदिराला ‘एक दिवसाचे मंदिर’ म्हणतात !
==============
आशा भोसले यांना तीन मुले आहेत. आशा भोसले यांच्या कन्या वर्षा यांनी ८ ऑक्टोबर २०१२ मध्ये आत्महत्या करत स्वतःचे जीवन संपवले. तर आशा भोसले यांच्या मोठ्या मुलाचे निधन झाले असून, त्यांचा दुसरा मुलगा आनंद भोसले लाइमलाईटपासून दूर असतो. आशा भोसले यांना गाण्यासोबतच कुकिंगमध्ये देखील एक्सपर्ट आहेत. त्या नेहमी म्हणतात की जर त्या गायिका नसत्या तर त्यांनी स्वतःचे हॉटेल उघडले असते आणि त्या शेफ झाल्या असत्या. आशा ताईंचे दुबई आणि कुवेत येथे आशा यांचे ‘आशाज’ नावाचे हॉटेल आहे. तसेच आबुधाबी, दोहा, बहरीन येथे देखील आशा भोसले यांचे रेस्टॉरंट आहेत. या हॉटेल्समध्ये मिळणारे भारतीय पदार्थ लोक आनंदाने आणि चवीने खातात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics