Home » Chandrgrahan : चंद्रग्रहणात गरोदर स्त्रियांनी ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी

Chandrgrahan : चंद्रग्रहणात गरोदर स्त्रियांनी ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Chandrgrahan
Share

आपल्या देशात धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर ग्रहण हे गर्भवती महिलांसाठी कायम वाईटच सांगण्यात आले आहे. ग्रहण, ग्रहणाचे वेध आदी सर्वच गोष्टी गर्भवती महिलांसाठी वाईट असतात. एकूणच काय तर ग्रहणकाळ गरोदर स्त्रियांसाठी अशुभ मानला जातो. ग्रहणाचा गर्भवती महिलेच्या पोटातल्या बाळावर दुष्परिणाम होतो, अशी पूर्वापार चालत आलेली समजूत आहे. (Chandragrahan 2025)

या काळात जर स्त्री बाहेर फिरली तर बाळाच्या शारीरिक वाढीवर ग्रहण थेट परिणाम करते असे घरातील जुनी जाणती माणसं सांगतात. त्यामुळेच ग्रहण असेल आणि घरात गरोदर स्त्री असेल तर खूपच काळजी घेतली जाते. आजच्या काळात अनेकांना याबद्दल तितकीशी माहिती नसते म्हणून आज आम्ही तुम्हाला ग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यायची याची माहिती देणार आहोत. (Marathi News)

चंद्रग्रहणाची वेळ आणि तारीख
या वर्षी चंद्रग्रहण उद्या अर्थात रविवार, ७ सप्टेंबर रोजी रात्री ८:५८ वाजता सुरू होणार आहे. हे चंद्रग्रहण ८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा १:२५ वाजता संपेल. रात्री ११:०१ ते १२:२३ पर्यंत पूर्ण चंद्रग्रहण असेल. तर चंद्रग्रहणाचा सुतक काळ ७ सप्टेंबर रोजी ९ तास आधी अर्थात दुपारी १२:५७ वाजता सुरू होईल. तो रात्री उशिरा १:२५ वाजता संपेल. त्यावेळी चंद्रग्रहण देखील संपेल. चंद्रग्रहणाचा सुतक काळ ९ तास आधी सुरू होतो आणि ग्रहणासोबत संपतो. (Latest Marathi Headline)

चंद्रग्रहणात गर्भवती महिलांनी काय करावे?
घरीच रहा
मान्यता आहे की जर गर्भवती महिला ग्रहणाच्या वेळी चंद्रप्रकाश किंवा सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात आली तर तिचा तिच्या बाळावर नकारात्मक परिणाम होतो. कोणाचा यावर विश्वास असो किंवा नसो मात्र एक दिवस घरात राहिल्याने काहीही वेगळे घडत नाही. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी घरातच राहा. शेवटी, ही फक्त काही तासांची बाब आहे. विज्ञान अशा कल्पनेवर विश्वास ठेवत नाही. (Todays Marathi Headline)

आरोग्याचीही काळजी घ्या
गर्भवती महिला काही नियमांचे पालन करून स्वतःला गोंधळापासून दूर ठेवू शकतात आणि त्यांच्या कुटुंबाच्या श्रद्धा देखील पाळू शकतात. पण यासोबतच, तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्या. (Top Marathi Headline)

Chandrgrahan

डॉक्टरांचा सल्ला घ्या
धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या वेळी पाणी पिऊ नये असे देखील म्हटले जाते. परंतु जर तुम्ही गर्भवती असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही तुमची काळजी घेणे जास्त गरजेचे असते. जास्त वेळ पाणी न प्यायल्याने आणि उपाशी राहिल्याने गर्भवती महिलांना त्रास होऊ शकतो. जर असे काही घडले तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Top Marathi News)

धारदार वस्तूंचा वापर टाळावा
ग्रहण दरम्यान चाकू, कात्री, सुई इत्यादी कोणत्याही प्रकारच्या धारदार वस्तूंचा वापर करू नये. या काळात, शक्य असल्यास, काहीही खाऊ नका. शक्य असल्यास, घराच्या खिडक्यांना पडदे लावा जिथून प्रकाश येतो. असेही मानले जाते की ग्रहणाच्या आधी जे काही अन्न शिजवले जाते ते बाहेर फेकून द्यावे. ग्रहणानंतर स्नान करावे. (Latest Marathi News)

चंद्रग्रहण थेट पाहू नका
गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण थेट पाहू नये. ग्रहणाच्या काळात चंद्राच्या किरणांना अशुद्ध मानले जाते. जे गर्भात असलेल्या बाळावर वाईट परिणाम करु शकते. (Top Trending News)

धार्मिक ग्रंथांचे वाचन, जप
ग्रहण काळात शांतीने घरात राहा आणि धार्मिक मंत्रांचे जप करा. हनुमान चालीसा, गायत्री मंत्र यांचा उच्चार करणे शुभ मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर पवित्र जलाने स्नान करा, शक्य असल्यास गंगाजल वापरा. स्वच्छ, नवीन वस्त्र परिधान करा. ग्रहण संपल्यानंतर दानधर्म करा, ज्यामुळे शुभ फळ प्राप्त होतात. ग्रहण संपल्यानंतर पाण्यात गंगाजल मिसळून पवित्र स्नान करावे. या काळात गर्भवती महिलांनी भगवान शिव आणि विष्णूचे ध्यान करत राहावे. सर्व खायच्या प्यायच्या वस्तूंवर तुळशीची पाने टाका. (Social News)

चंद्रग्रहणात गर्भवती महिलांसाठी मंत्र
१. रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्यरक्षकं।
भक्तानामभयं कर्ता त्राता भव भवार्णवात्।।

२. ॐ श्रीकृष्णाय शरणं मम।
या कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः।

=========

ChandraGrahan : २०२५ सालातले शेवटचे चंद्रग्रहण कधी आहे?

=========

३. ॐ देवकीसुत गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः||

४. जननी सर्वभूतानां, बालानां च विशेषतः।
नारायणीस्वरुपेण, बालं मे रक्ष सर्वदा॥
भूतप्रेतपिशाचेभ्यो, डाकिनी योगिनीषु च।
मातेव रक्ष बालं मे, श्वापदे पन्नगेषु च॥

(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.