सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला दम देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे महिला आयपीएस अधिकारी यांना फोनवरून दमदाटी करताना दिसत आहेत. त्यांना धमकीवजा आदेश देखील त्यांनी या कॉल वर त्यांना दिला. मात्र या आयपीएस अधिकारी अजितदादांना जशास तसे प्रत्युत्तर देत असल्याचे दिसले. थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर न डगमगता त्यांना व्हिडिओ कॉल करण्यास सांगणारी या निडर महिला आयपीएसचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर देखील अनेक लोकं त्यांच्याबद्दल माहिती घेताना दिसत आहे. चला तर जाणून घेऊया, या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा कोण आहेत? (Marathi News)
नेमकं प्रकरण काय?
रस्त्याच्या कामासाठी मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजेच DYSP अंजना कृष्णा व्ही. एस. यांना मिळाली. त्यानंतर हे बेकायदा उत्खनन थांबविण्यासाठी अंजना कृष्णा यांनी घटनास्थळी आल्या. अंजना कृष्णा यांनी सुरुवातीला संबंधितांकडे मुरूम उत्खननाची रॉयल्टी पावती मागितली. मात्र, त्यांना पावती दाखवता आली नाही. त्यामुळे अंजना कृष्णा यांनी हे मुरूम उत्खनन बेकायदेशीर असल्याचे सांगत काम थांबवण्यास सांगितले. यादरम्यान नागरिक आणि अंजना कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता असलेल्या बाबा जगताप याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला आणि अंजना कृष्णा यांच्या हातात तो फोन दिला. मात्र अंजना कृष्ण यांना अजित पवारांचा आवाज ओळखता आला नाही. (Todays Marathi Headline)
अजित पवारांनी यावेळी दोनवेळा मी उपमुख्यमंत्री बोलत आहे असे सांगितले. ‘मै DCM बोल रहा हू. ‘ये कारवाई बंद करो…मेरा आदेश हैं..’, असे अजित पवारांनी कृष्णा यांना सांगितले. त्यावर अंजली कृष्णा म्हणाल्या, “मेरे फोन पर कॉल करे”. त्यावर अजित पवार रागावून म्हणले की, “तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी. मेरा चेहरा तो पहचानोगी ना”. यानंतर अजित पवारांनी व्हिडीओ कॉल केला. अंजना कृष्णा यांनी बांधावर जाऊन पवारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी त्यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. माझा फोन आला आहे, तहसीलदारांना सांगा असे पवार म्हणाले. (Top Marathi News)
अंजना कृष्णा कोण आहेत?
अंजली कृष्णा यांचा जन्म १२ डिसेंबर १९९७ रोजी केरळच्या तिरुवनंतपुरम येथील मलयंकीजू गावात झाला होता. त्यांचे वडील बीजू यांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे. तर त्यांची आई सीना या कोर्टात टायपिस्ट म्हणून नोकरीवर आहेत. अंजली या एका सर्वसामान्य कुंटुंबातून आल्या आहेत. अंजना कृष्णा या मूळच्या केरळच्या आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण पूजापुरा येथील सेंट मेरीज सेंट्रल स्कूलमधून आणि उच्च शिक्षण तिरुअनंतपुरम येथील एचएचएमएसपीबी एनएसएस कॉलेज फॉर वुमनमधून झाले. त्यानंतर त्यांनी नीरामंकराच्या NSS कॉलेजमध्येच BSC गणित म्हणून पदवी शिक्षण घेतले होते. (Latest Marathi News)
२०२३ मध्ये त्या यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यांची पहिलीच पोस्टींग केरळच्या त्रिवेंद्रममध्ये झाली. २०२४ मध्ये सोलापूर ग्रामीणमध्ये त्यांची बदली झाली. अंजना कृष्णा सामाजिक कार्यातही सक्रीय आहेत. यूपीएससीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींना त्या मार्गदर्शन करतात. सध्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे पोलिस उपअधीक्षक (DSP) म्हणून कार्यरत आहेत. अंजली कृष्णा यांची गणना कुशाग्र आणि प्रामाणिक आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. (Top Trending News)
========
America : पीटर नवारो…भारताचा खलनायक !
========
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि हे माध्यमांत हे वृत्त आल्यानंतर आता त्या गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या सोलापुरातील कुर्डू इथल्या १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये, बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांच्यासह अनेक ग्रामस्थांचा समावेश आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार दिली होती. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics